Showing posts with label BAHIN. Show all posts
Showing posts with label BAHIN. Show all posts

Saturday, January 18, 2014

BABY GIRL SISTER

ही कविता खास ज्यांना बहिण नाही त्याच्यासाठी..................

लहानपणी वाटे, एक बहिण असावी..
एक गोळी तीला चिमणीच्या दाताने तोडून द्यावी,
उरलेली अर्धीही तीलाचं द्यावी..

एक बहिण असावी..
पाठीशी तीला घालताना आईची बोलणी खावी,
नंतर मात्र तीलाचं एक ठेऊन द्यावी..

एक बहिण असावी..
चीडवायला तीला फार मजा यावी,
पण रडू ती लागताचं जिवाची घालमेल व्हावी..

एक बहिण असावी.....
पहिल्या माझ्या पगारात तीला छान गिफ्ट आणावी,
आणि गिफ्ट हातात पडताचं तिने वर पार्टीही उकळावी..

एक बहिण असावी..
असेचं आणि बरेचं नेहमी मला वाटे,
एक बहिण असावी.. पण ?????

मला बहिण का नसावी ?
त्यामुळे राखी पोर्णिमा माझी सूनीसुनी जावी..

आणि अचानक आयुष्यात माझ्या एक छोटुकली यावी..
सख्खी नसेल तरीही सख्ख्याहून सख्खी वाटावी..

एक बहिण यावी.. तीच्याशी बोलताना माझीसुःख दुःखे सांगावी,
सांगता सांगता तीचीही जाणून घ्यावी..

खरचं घर मुलीशिवाय अपूर्ण असतं...!