Showing posts with label Marathi sandesh. Show all posts
Showing posts with label Marathi sandesh. Show all posts

Sunday, February 27, 2022

गावकरी



गावकरी : काय रे गावच्या यात्रेला येतोस का गावी?
नोकरीवाला : नाय हो! रजा जास्त झाल्यात पहिल्या दिवशी येईल, नंतर जमेल असे वाटत नाही.

गावकरी : काय रे! होळीला येतोयस का गावी?
नोकरीवाला : पोरांना सुट्टी नाय हो! उगीच शाळा कशाला बुडवायची.

गावकरी : काय रे! दसऱ्याला येतोयस का गावी?
नोकरीवाला : नाय हो! तब्येत बरी नाय नाय जमणार.

गावकरी : काय रे! दिवाळीला येतोयस का गावी?
नोकरीवाला : आलो असतो पण ऑफिस मध्ये एकटाच आहे.

गावकरी : काय रे! या वर्षी कुणाच्याच लग्नाला आलास नाही?
नोकरीवाला : आई-बाबा आहेत ना ही पण म्हणाली सगळीच कशाला, मग नाही आलो.

गावकरी : अरे! त्या दिवशी मयतावर आलास नाही?
नोकरीवाला : निघालो होतो पण ट्रॅफिक इतकी होती की, मौत भेटलीच नसती.

गावकरी : अरे! यंदा आवणीला येशील ना?
नोकरीवाला : साहेबानी सांगितलय, रविवारी पण कामावर यायला लागेल.

गावकरी(फोनवरुन) :
अरे! ऐकलस, काय! विमानतळमध्ये गेलेल्या जमिनी नोटीस आल्यात, पंधरा दिवसात पैसे भेटणार आहेत पण सहीसाठी यायला जमेल काय तुला, दादा पण यायला निघालाय?
नोकरीवाला :
दहा मिनिटांत ऑफिस मधुन निघतो, एकटाच आलो तरी चालेल की सगळी येऊ! दादाला सांग दोन तासात पोहोचतो आणि हो मोठ्याबाबांना विचार घरी येऊ का डायरेक्ट तहसीलदार ऑफिसला येऊ. मी पंधरा दिवसाची रजा टाकूनच येतो?

'विनोदाचा भाग बाजूला ठेवा पण ही सत्य परिस्थिती आहे.'
लोकांमध्ये Professionalism आणि स्वार्थ इतका वाढलाय की आपलं गाव, गावपण, जुन्या रीती, भुतकाळ, परंपरा गुंडाळून ठेवल्या जात आहेत.

जरूर विचार करा आणि बदल घडवुन आणण्यासाठी प्रयत्न करुया.

Saturday, May 1, 2021

" निसर्ग मित्र व्हा "

 भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल. 

🌳एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.

🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.

🌳एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.

🌳एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.

🌳एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.

🌳एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.

🌳एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.

🌳एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.

🌳एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.

🌳एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.

🌳एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.

🌳एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.

🌳एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.


एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.

🌳आता नाही तर कधीच नाही.

🌳तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.

🌳जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने

पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.

🌳 मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.

🌳तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.

🌳म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.

।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।।

 " निसर्ग मित्र व्हा "

Friday, July 24, 2020

फोटोग्राफर

मोबाईल ने घातला फोटोग्राफर वर घाव
त्यातच खेळला करोनाचा डाव 
किरकोळ कामे झाली हद्दपार 
नसे कोणाला काम
रोज येती नित्य नवे कॅमेरे
व्हा अपडेट मिळतील कामे
ऋण काढून सण साजरे करणे
घेऊन नवे कॅमेरे  तरी 
म्हणती आम्ही रिकामटेकडे 
असेल काही काम तर 
सांगा आम्हा पटकन
ज्युनिअर सिनिअर सगळे बसले 
एका पंक्तीत मागाया काम
मांडेल कैफियत सरकार दरबारी 
फोटोग्राफर असोसिएशन 
जुगारुन असोसिएशन रेट
लावती मनमानी थेट
भरली आपली खळगी दाखवू रूबाब वरती
नसे त्यांच्यात एकी म्हणून मरती उपाशी 
हीच खरी व्यथा आहे एका सच्या फोटोग्राफरची

     सौ. रोहिणी अमोल पराडकर 
           कोल्हापूर 8208890678

Tuesday, May 12, 2020

जकातचे इस्लाम धर्मातील स्थान काय आहे?



जकात एक उपासना असून इस्लाम धर्माचा महत्वाचा स्तंभ आहे. प्रेषितांचे सहकारी अब्दुल्लाह बिन उमर [रजी] म्हणतात, अल्लाहचे प्रेषित मुहम्मद [स.] म्हणाले, इस्लामचे पाच स्तंभ आहेत - १] अल्लाहच्या एकत्वाची आणि मुहम्मदांच्या प्रेषितत्वाची साक्ष देणे, २] नमाज अदा करणे, ३] जकात अदा करणे, ४] रमजानच्या रोजांचे पालन करणे आणि ५] अल्लाहच्या उपासनागृहाचा हज करणे. [बुखारी, किताबुल इमान, कथन ८]
इस्लाममध्ये अल्लाहच्या उपासनेच्या काही पद्धती निर्धारित करण्यात आल्या आहेत. नमाज, रोजा, जकात, हज, कुर्बानी आणि उमरा या अल्लाहच्या उपासना पद्धती आहेत. यापैकी एकही उपासना जाणीवपूर्वक नाकारणारी व्यक्ती मुस्लिम असू शकत नाहीत. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीवर अल्लाहची उपासना करणे अनिवार्य आहे. नमाज आणि रोजा शारीरिक आणि मानसिक उपासना आहेत तर जकात एक आर्थिक उपासना आहे. हज, उमरा आणि कुर्बानी समर्पणभाव व्यक्त करणाऱ्या प्रतिकात्मक उपासना आहेत.
या उपासना अल्लाहच्या आदेशानुसार आपल्या मूळ स्वरूपात अदा केल्या जातील. उपासनांपैकी एकाचेही स्वरूप बदलण्याचा अधिकार अल्लाहशिवाय अन्य कोणालाच नाही. जकात ही आर्थिक उपासना अल्लाहच्या आदेशाने त्याच प्रकारे केली जाईल, ज्याप्रकारे अदा करण्याचा आदेश अल्लाहने दिला आहे.