Showing posts with label india. Show all posts
Showing posts with label india. Show all posts

Thursday, August 7, 2025

मोहम्मद शाह



आज के दिन ही, 7 अगस्त 1702 ई. के दिन गजनी (अफगानिस्तान) में मोहम्मद शाह की पैदाइश हुई थी। मोहम्मद शाह औरंगजेब के परपोते थे, उस समय हिंदुस्तान में औरंगजेब की ही हुकूमत कायम थी। मुहम्मद शाह का दौर-ए-हुकूमत कई मायनों में बहुत अहम् माना जाता है, उनके दौर में मुगलिया हुकूमत लगातार अपने जवाल की ओर बढ़ती रही। 1739 में नादिरशाह के हमले के बाद से ही मुगलिया सल्तनत का सूरज डूबने लगा था।
मिर्जा नासिर-उद-दीन मुहम्मद शाह रोशन अख्तर 15वें मुग़ल बादशाह थे उन्होंने 1719 से 1748 तक हिंदुस्तान पर हुक्मरानी की थी। उनका दौर-ए-हुकूमत कई मायनों में बहुत अहम् माना जाता है, जंहा एक ओर उनके दौर में मुगलिया सल्तनत मोतियों की माला की तरह टूट कर बिखर गयी तो वहीं उनके ही दौर में उर्दू शायरियों दौर अपने ओरुज पर था।
मुग़लों की दरबारी और शाही ज़बान तो फ़ारसी थी, लेकिन जैसे जैसे दरबार की गिरफ़्त आम लोगों की ज़िंदगी पर ढीली पड़ती गई, लोगों की ज़बान यानी उर्दू उभरकर ऊपर आने लगी बिलकुल ऐसे ही जैसे बरगद की शाख़े काट दी जाएं तो उसके नीचे दूसरे पौधों को फलने फूलने का मौक़ा मिल जाता है। इसलिए मोहम्मद शाह रंगीला के दौर को उर्दू शायरी का सुनहरा दौर कहा जा सकता है।
उस दौर की शुरूआत ख़ुद मोहम्मद शाह के तख़्त पर बैठते ही हो गई थी जब बादशाह के साल-ए-जुलूस यानी 1719 में वाली-ए-दक्कनी का दीवान दक्कन से दिल्ली पहुंचा। उस दीवान ने दिल्ली के ठहरे हुए अदबी झील में ज़बरदस्त तलातुम पैदा कर दिया और यहां के लोगों को पहली बार पता चला कि उर्दू (जिसे उस ज़माने में रेख़्ता, हिंदी या दक्कनी कहा जाता था) में यूं भी शायरी हो सकती है।
ज़ाहिर है कि बाबर, अकबर या औरंगजेब के मुक़ाबले मोहम्मद शाह कोई फौजी जरनल नहीं थे और नादिर शाह के खिलाफ करनाल के अलावा उन्होंने किसी जंग में फौज की कयादत नहीं की थी। न ही उनमें जहांबानी व जहांग़ीर की वो ताक़त और तवानाई मौजूद थी जो पहले मुग़लों की खासियत थी।
मुहम्मद शाह एक मर्द-ए-अमल नहीं बल्कि मर्द-ए-महफिल थे और अपने परदादा औरंगज़ेब के मुक़ाबले में युद्ध की कला से ज़्यादा लतीफ़े की कला के प्रेमी थे।
क्या मुग़ल सल्तनत के जवाल की सारी ज़िम्मेदारी मोहम्मद शाह पर डाल देना सही है? हमारे ख़्याल से ऐसा नहीं है। ख़ुद औरंगज़ेब ने अपनी जुनूनी सोच, सख्त इन्तिज़ामी और बिला-वजह फौज बढ़ाने से तख़्त के पांव में दीमक लगाने की शुरुआत कर दी थी।
जिस तरह सेहतमंद शरीर को संतुलित भोजन की ज़रूरत होती है, वैसे ही सेहतमंद समाज के लिए ज़िंदा दिली और ख़ुश तबियत इतनी ही ज़रूरी है जितनी की ताक़तवर फौज। औरंगज़ेब ने तलवार के पलड़े पर ज़ोर डाला तो उनके परपोते ने हुस्न और संगीत वाले पर नतीजा वही निकलना था जो सबके सामने है।




Tippu sultan tiger of Karnataka


 

Sunday, July 27, 2025

Jama Masjid



The view of Red Fort from Jama Masjid in the 1870s vs 2010s
The top image from the 1870s shows the Red Fort and Jama Masjid surrounded by open grounds and sparse vegetation. Fast forward to the present day, and the bottom image reveals a bustling urban landscape with dense buildings and greenery.
These historic sites continue to stand tall, reflecting the rich heritage and dynamic evolution of Delhi.
The first photo was captured by European photographer John Edward Saché.




Thursday, July 24, 2025

हमको मिटा सके ये ज़माने में दम नहीं हमसे ज़माना ख़ुद है ज़माने से हम नहीं



हमको मिटा सके ये ज़माने में दम नहीं
हमसे ज़माना ख़ुद है ज़माने से हम नहीं
बे-फ़ाएदा अलम नहीं बे-कार ग़म नहीं
तौफ़ीक़ दे ख़ुदा तो ये नेमत भी कम नहीं
मेरी ज़बाँ पे शिकवा-ए-अहल-ए-सितम नहीं
मुझ को जगा दिया यही एहसान कम नहीं
या रब हुजूम-ए-दर्द को दे और वुसअ’तें
दामन तो क्या अभी मिरी आँखें भी नम नहीं
शिकवा तो एक छेड़ है लेकिन हक़ीक़तन
तेरा सितम भी तेरी इनायत से कम नहीं
अब इश्क़ उस मक़ाम पे है जुस्तुजू-नवर्द
साया नहीं जहाँ कोई नक़्श-ए-क़दम नहीं
मिलता है क्यूँ मज़ा सितम-ए-रोज़गार में
तेरा करम भी ख़ुद जो शरीक-ए-सितम नहीं
मर्ग-ए-‘जिगर’ पे क्यूँ तिरी आँखें हैं अश्क-रेज़
इक सानेहा सही मगर इतना अहम नहीं

जिगर मुरादाबादी





Monday, June 30, 2025

Daily Routine— Women drawing water and chatting at the village well near Ratnagiri, 1930s.


 

A masterpiece not built, but carved from a single mountain. India's ancient spirit, unshaken across centuries."



1839 – A timeless vision captured in a sketch.

2016 – Still standing, weathered but proud.

2025 – Restored, revered, and radiant in the golden light.

A masterpiece not built, but carved from a single mountain.
India's ancient spirit, unshaken across centuries."



लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित विनम्र अभिवादन.

 शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ ला निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.
त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाता खाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. १८९६ चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.
शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्म निरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले. आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले.
महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली. गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले. अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या, अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.
अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.
मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधित अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.
त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमल बजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठाधनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.
तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारी पासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.
गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारलेे. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "दलितांचा नेता" व "भारतीय अग्रणी नेता" म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असं आवाहनही महाराजांनी केलं. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला, यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.
शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.
महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.
शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.
महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे :
* व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१)
* दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१)
* वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६)
* मुस्लीम बोर्डिंग (१९०६)
* मिस क्लार्क होस्टेल (१९०८)
* दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८)
* श्री नामदेव बोर्डिंग (१९०८)
* पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२)
* श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५)
* इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५)
* कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५)
* आर्यसमाज गुरूकुल (१९१८)
वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.
शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला. नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले.
राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.
शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात दिला जातो.
*संकलन:-मंगेश नामदेव गायकवाड, पुणेशहर, पेरणेकर.



Wednesday, June 18, 2025

हैदराबाद की उस्मानिया यूनिवर्सिटी के स्टूडेंट साल 1944 में कुछ इस तरह दिखते थे।


 

जागतिक मल्लखांब दिवस










आज जागतिक मल्लखांब दिवस. मल्लखांब हा अस्सल भारतीय मातीतला लाकडी खांबावर किंवा लवचिक दोरीवर केला जाणारा परिपूर्ण असा व्यायामप्रकार! शारीरिक चपळता, लवचिकता, मानसिक एकाग्रता, पोटातील शक्ती या साऱ्याची सुरेख गुंफण असणारा हा पारंपरिक व्यायामप्रकार आपल्या पूर्वजांनी कित्येक शतकांपूर्वी निर्माण केला. मल्लखांबाच्या इतिहासाचे आपल्याकडे प्राचीन, मध्ययुगीन, ब्रिटिशकालीन आणि आधुनिक असे चार भाग पडतात. या चारही कालखंडात मल्लखांबाबद्दलच्या विविध नोंदी आपल्याला लिखित आणि चित्रित स्वरूपात सापडतात. प्रसृत समजांनुसार अठराव्या शतकात बाळंभट्ट देवधरांशी याचा इतिहास जोडला जात असला तरी वास्तविक मल्लखांबाचा इतिहास त्याहून कित्येक शतके मागे जातो. आज मल्लखांब दिनाच्या निमित्ताने या पारंपरिक व्यायामप्रकाराचा एक मागोवा घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.
मल्लखांबाचे ऐतिहासिक संदर्भ भारतीय इतिहासात वेगवेगळ्या कालखंडांच्या तुकड्यांमध्ये सापडतात. संदर्भांची ही मालिका काही काळात तुटक झालेली दिसते (पण अर्थात, ही संशोधनातली दरी..क्रीडा सातत्यातली नाही). १९५७ ते १९६८ याकाळात आशुतोष म्युझिअम ऑफ इंडियन आर्ट या संस्थेकडून पश्चिम बंगालच्या विद्याधारी नदीजवळच्या ‘चंद्रकेतूगढ’ (२४ परगना जिल्हा) गावामध्ये उत्खनने झाली. या उत्खननांमध्ये इसवी सन पूर्व तिसरे शतक ते इसवी सनाचे पाचवे-सहावे शतक या काळातले मातीच्या वस्तूंचे अवशेष मोठ्या प्रमाणात सापडले. यातल्या तिसऱ्या-चौथ्या शतकातल्या एका मातीच्या भांड्यावर एका खांबावर कसरत करणाऱ्या व्यक्तीचे चित्रण आढळून आले होते. भारतातल्या मल्लखांबाचा हा आतापर्यंतचा सर्वात प्राचीन संदर्भ म्हणता येईल.
भारतातले खेळ, कसरती, व्यायाम यांच्याबद्दल परकीय प्रवाशांनी केलेल्या नोंदी कायमच महत्वपूर्ण स्रोत ठरल्या आहेत. सातव्या शतकात भारतात आलेला चीनी प्रवासी ह्यूएन त्सांग हा अतिशय महत्वाच्या प्रवाशांपैकी एक. ह्यूएन त्सांगने इसवीसन ६२९ ते ६३९ याकाळात वाराणसीला मुक्कामी असताना तत्कालीन मल्लखांबाबद्दल नोंद करताना लिहिले आहे, “इथल्या नदीच्या मध्ये एक स्तंभ रोवलेला आहे. सूर्यास्ताच्या वेळी साधक या खांबावर चढून एक हात आणि एक पायाने हा खांब पकडून दुसऱ्या हात आणि पायाने यावर वेगाने कसरती करतात. हे दृश्य फारच मनोहारी दिसते”. अशा प्राचीन लिखित संदर्भांमधून विशिष्ट खेळ, व्यायामप्रकार कसा विकसित होत गेला याची ससंदर्भ माहिती आपल्याला मिळत जाते.
मधल्या काळातल्या काही तुटक संदर्भांनंतर ‘मल्लखांब’ समोर येतो ते बाराव्या शतकातल्या कल्याणी चालुक्य राजा सोमेश्वर तृतीय याने लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ ग्रंथामध्ये, तेही अगदी विस्तृतपणे! मानसोल्लास ग्रंथाचे काही भाग युद्ध, शस्त्र यांच्यासोबतच सैनिकांनी युद्धासाठी आणि शारीरिक श्रमांसाठी करण्याच्या व्यायामांचेही वर्णन करतात. यात सैनिक, विशेषतः मल्लांनी स्तंभावर व्यायाम करण्याच्या ‘स्तंभ श्रम’ अर्थात मल्लखांबाचे वर्णन केलेले आहे. यात राजा सोमेश्वराने स्तंभश्रम करताना “स्तंभ हातात पकडण्यायोग्य, उंच, खोल भूमीमध्ये गाडलेला, चंदनाने लिप्त असावा. स्तंभावर चढताना उडी मारून मांड्यांनी स्तंभ पकडावा किंवा हात, छाती आणि पायांचा वापर करून त्यावर चढावे. स्तंभाला हातांनी आणि पायांनी पकडून विविध आवर्तन-विवर्तने (दशरंग हात) करून स्तंभश्रम करावेत”, अशा अनेक बारकाव्यांनिशी तत्कालीन मल्लखांबाची माहिती दिलेली आहे.
मल्लखांबाबद्दल इतक्याच विस्तृतपणे माहिती देणारा दुसरा महत्वपूर्ण संदर्भ म्हणजे ‘मल्लपुराण’. मल्लपुराणाच्या नेमक्या कालखंडाबद्दल प्रवाद असले तरी सर्वसाधारण या ग्रंथाचा कालखंड इसवी सनाचे तेरावे ते सतरावे शतक यादरम्यानचा मानला जातो. मल्लपुराणामध्ये मल्लविद्येसोबतच मल्लविद्येला पूरक व्यायामप्रकारांची सविस्तर माहिती देताना त्यात स्तंभश्रम, अर्थात मल्लखांबाच्या नियमित सरावाने खांदे रूंद होतात, तळहात, जांघा, मांड्या यांची पकड वाढते, अंग लवचिक राहते, हात, कंबर, पाय, घोटे यांची शक्ती वाढते, संपूर्ण शरीरात शक्तीचा संचार होतो हे मल्लखांबाचे फायदे नोंदवलेले आहेत.
मल्लखांबाचे जसे लिखित पुरावे बाराव्या ते सतराव्या शतकापर्यंत सापडतात तसेच ते विविध चित्र स्रोतांमधूनही दिसून येतात. सोळाव्या-सतराव्या शतकात भारताच्या विविध भागात तयार झालेल्या ‘राग-रागिणी’ चित्रांमध्ये, विशेषतः ‘देसख्य’ / ‘देसख’ रागिणी चित्रांमध्ये मल्लखांबावर कसरती आणि व्यायाम करणारे मल्ल, खेळाडू दिसून येतात. यातली महत्वाची बाब म्हणजे या चित्रांमध्ये स्त्रियादेखील मल्लखांब खेळताना दाखवलेल्या आहेत. अगदी सार्वत्रिक नसले तरी हा खेळ शिकण्यास, खेळण्यास मनाई नव्हती असे या चित्रांमधून स्पष्ट दिसून येते. यातल्याच काही चित्रांमध्ये खांबासोबतच दोरीचा मल्लखांब सुद्धा दिसून येतो, त्यामुळे दोरीचा मल्लखांब हादेखील मूळ मल्लखांबाइतकाच प्राचीन आहे असे वाटते.
ब्रिटिशकाळात सशस्त्र क्रांतीला आळा घालण्यासाठी इंग्रजांनी भारतात शस्त्रबंदी लागू करण्यासोबतच पारंपरिक युद्धकला, मर्दानी खेळ यांवर बंदी आणली. यात भारताच्या अनेक समृद्ध शस्त्र आणि युद्ध परंपरांना कायमची ओहोटी लागली. मल्लखांब मात्र या तडाख्यात सुदैवी ठरला. मल्लखांब रूढार्थाने ‘व्यायामप्रकार’ म्हणून प्रचलित असल्याने आणि त्यात शस्त्रांचा थेट समावेश नसल्याने मल्लखांबाचा प्रसार ब्रिटिशकाळातही चालू राहिला. पुढे मल्लखांबांच्या व्यायामशाळांचा आधार घेवून अनेक सशस्त्र क्रांतीकारकांनी व्यायामाच्या पडद्याआड शस्त्रप्रशिक्षण चालू ठेवले.
ब्रिटिश काळात मल्लखांबाचा तारू तोलणाऱ्यांमध्ये अध्वर्यू होते ते म्हणजे ‘बाळंभट्ट देवधर’! बाळंभट्ट देवधर हे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या पदरी असणारे व्यायाम, शस्त्रविद्या यांचे गाढे अभ्यासक आणि प्रशिक्षक होते. तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या अनेक क्रांतीकारकांचे बाळंभट्ट हे गुरू! दुसरे बाजीराव पेशवे १८१८ नंतर जेव्हा बिठूर, वाराणसीला राहायला आले तेव्हा तेथपर्यंत येतेसमयी त्यांनी देवधरांच्या सहाय्याने पुणे ते वाराणसी या मार्गात अनेक आखाड्यांची स्थापना केली आणि पारंपरिक व्यायाम आणि शस्त्रविद्या यांचा प्रचार, प्रसार चालू ठेवला आणि यामध्ये मल्लखांबाचे प्रशिक्षण आणि सराव केंद्रस्थानी होता. बाळंभट्ट देवधर आणि त्यांची तीन मुले रामजी, लक्ष्मण आणि नारायण यांनी उत्तर भारतात, विशेषकरून गुजरातमध्ये मोठा शिष्यवर्ग निर्माण केला. बाळंभट्ट देवधरांचे पट्टशिष्य टक्के जमाल यांनी ‘जुम्मादादा’ यांना देवधरांच्या मल्लखांब आणि शस्त्रविद्येचा वारसा दिला ज्यांनी बडोद्यामधल्या प्रसिद्ध ‘जुम्मादादा आखाडा’ (नंतरच्या काळातील श्री जुम्मादादा व्यायाम मंदिर) महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या राजाश्रयामध्ये चालू केला. बाळंभट्ट देवधरांचे दुसरे शिष्य ‘दामोदर गुरू मोघे’ यांनी वेतावरच्या मल्लखांबाचा शोध लावला आणि त्याचा प्रसार मध्यप्रदेश मधल्या उज्जैन, इंदोर आणि इतर अनेक भागांमध्ये केला.
बाळंभट्ट देवधरांचे मल्लखांबासाठीचे सर्वात मोठे योगदान म्हणजे अनेक ठिकाणांच्या आखाड्यांच्या स्थापनेतून त्यांनी मल्लखांब व्यायामप्रकार सर्वसामान्यांसाठी ‘accessible’ केला. देवधरांच्या आधी भारताच्या विविध भागात स्थानिक स्वरूपात असणाऱ्या या खेळाला देवधरांमुळे एक व्यापक आणि एकसंध स्वरूप मिळाले. भारतभरात मल्लखांबाचे प्रचलित असलेले अनेक प्रकार, शैली, पद्धती यांना एका छताखाली आणून एकप्रकारे ‘standardization’ करण्याचे महत्वपूर्ण काम बाळंभट्ट देवधरांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केले. पुढे १९३०-४० च्या काळात दत्तात्रय चिंतामण करंदीकर (मुजुमदार) यांनी ‘व्यायाम ज्ञानकोशा’ तून मल्लखांब प्रशिक्षण आणि सरावाच्या तत्कालीन पद्धतींचे लिखित दस्तऐवजीकरण केल्याने स्वातंत्र्योत्तर काळात मल्लखांबाला राष्ट्रीय पातळीवरील खेळाचे स्वरूप आणि स्थान प्राप्त करून देण्यामध्ये मोलाची मदत झाली.
भारतातल्या प्राचीन मल्लखांबाचा प्रवास ब्रिटिशकाळात, अगदी तत्कालीन भारतीय सैन्यामध्येही चालू होता. मल्लखांब भारताच्या अनेक भागात खेळला जात असला, तरीही भारतीय सैन्यामध्ये याची ओळख निर्माण झाली ती तत्कालीन मराठा बटालियनमुळे. १७६८ साली 1st Batallion, Bombay Sepoys मधून स्थापन झालेल्या रेजिमेंटमध्ये (ज्यात कालांतराने वेगेवगेळे युनिट्स जोडले जात Maratha Light Infantry तयार झाली) रेजिमेंटचे स्थानिक व्यायाम, खेळ म्हणून मल्लखांब, दांडपट्टा, भालाफेक यांची प्रात्यक्षिके आणि सराव निमित्तांनी सादर केले जात असल्याच्या नोंदी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या लिखाणात तसेच छायाचित्रांमध्येही सापडतात. बॉम्बे जिम्नॅस्टिक्स इंस्टिट्यूटचे कॅप्टन डॉ. कल्याणपूरकर यांनी इन्स्टिट्यूट मधले आणि अमरावतीच्या हनुमान प्रसारक मंडळातले विद्यार्थी यांना सोबत घेवून मल्लखांबाची प्रात्यक्षिके १९३६ मध्ये बर्लिनमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये हिटलरच्या समोरही सादर केली होती. १९२० ते १९४० याकाळात अमरावतीच्या हनुमान प्रसारक मंडळाने जर्मनी, फ्रान्स, इराण, जपान, फिनलँड अशा अनेक देशांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करून मल्लखांबाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली.
मल्लखांबासारख्या पारंपरिक व्यायामप्रकाराने अनेक शतके परकीय आक्रमणे, मर्दानी खेळांवरील बंदी या सर्वांतून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र काही दशके या खेळाला, व्यायामप्रकाराला शासकीय पातळीवर मोठी अनास्था आणि अवहेलना सहन करावी लागली. अण्णासाहेब खानविलकर, एस. रत्नम, अ. य. साठे, पंडित विश्वनाथ यादव, सरदार पृथ्वीसिंग आझाद, रामदास कल्याणपूरकर, शशिकांत व्यास, सुहास पाठारे, लीलाधर कहार अशा अनेक मल्लखांबाला समर्पित व्यक्तींच्या आणि आखाडे, व्यायामशाळा यांच्या एकत्रित प्रयत्नातून सरकारदरबारी मल्लखांबाला राष्ट्रीय पातळीवरील खेळ म्हणून ओळख मिळवून देण्यात दोन-तीन दशकात यश आले. आजच्या काळात मल्लखांब त्याच्या विविध प्रकारांसह (दोरी, वेत, तरंगता इ.) देशभरात आणि देशाबाहेरही अभिमानाने खेळला जातो. कित्येक शतकांची समृद्ध परंपरा असणाऱ्या या व्यायाम + खेळाचा प्रेरक इतिहास लिखित, audio-visual माध्यमातून नव्या पिढीपुढे मांडणे, त्यांना हा पारंपरिक खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देणे हेच या पारंपरिक खेळासाठी दिलेले योग्य आणि शाश्वत योगदान असेल.

गिरिजा दुधाट

संदर्भसूची:

1] Ghosh, A. (ed.) (1957). ‘Indian Archaeology, 1956-57: A review’, Department of New Delhi: Archaeology.
2] Shrigondekar, G.K. (ed.) (1925). Manasollasa Vol. I to III, Vadodara: Gaekwad Oriental Series.
3] Sondesara, B.J. (ed.) (1964). Mallapuarana: A rare sanskrit text on Indian wrestling especially as practised by the Jyesthimalla. Vadodara: Gaekwad Oriental Series.
4] Watters, T. (1904). Davids, T.W. (ed). On Yuan Chwang’s travels in India: 629 to 645 AD. London: Royal Asiatic Society.
5] बाठे, मनिषा (२०१६). एक होता बाळंभट. पुणे: समर्थ मीडिया सेंटर.
6] मुजुमदार, द. चिं. (१९४२). व्यायाम ज्ञानकोश: खंड २. बडोदा: शासकीय मुद्रणालय.

Friday, June 13, 2025

किल्ले रायगडाचा आजपर्यत पाहीलेला सर्वांग सुंदर फोटो


 

𝐓𝐨𝐦𝐨𝐫𝐫𝐨𝐰 𝐢𝐬 𝐧𝐞𝐯𝐞𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐢𝐬𝐞𝐝.

Pratik Joshi had spent the last six years in London, working hard as a software professional, holding on to a dream — to one day bring his wife and three young children from India to join him and build a better life together abroad.
That dream was finally coming true. Just two days ago, his wife, Dr. Komi Vyas, a respected doctor in Udaipur, resigned from her job. The family had packed their bags, said their goodbyes, and looked ahead with hope in their hearts.
This morning, filled with excitement, they boarded Air India flight 171 to London. They took a selfie, smiling wide, and sent it to their loved ones — a snapshot of a new beginning.
But they never made it.
The plane crashed. No one survived.
In an instant, a lifetime of plans, dreams, and love was gone. A harsh, heartbreaking reminder that life is painfully fragile. Everything we hold dear — our families, our futures, our happiness — can disappear in a blink.
So while you still can, live fully. Love deeply. Be present. Don’t keep waiting for the perfect time to start living.
Because tomorrow is never promised.








School In India in 1862


 

Friday, June 6, 2025

Tarikh-i Hind تاریخِ ھند #TarikhiHind










Situated atop the rugged hills of Bijapur, India, this imposing cannon, known as the Malik-e-Maidan, was forged from one piece of copper in the late 16th century during the reign of the Muslim Adil Shahi dynasty. As one of the largest surviving medieval cannons.