Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

धडा - डोंगर दादा

 डोंगरदादा फारच दुःखी होता. एकटेपणामुळे कष्टी होता. तो सारखा विचार करायचा, काय करावे ? आपल्याला कुणाची सोबत नाही. संगत नाही. कोणी नाही बोलायला, कोणी नाही हसायला, कोणी नाही खेळायला.

एकदा एक नवलाची गोष्ट घडली. एक छोटेसे रोपटे डोंगरदादाच्या कुशीतून हळूच वर आले. डोंगरदादापाशी उभे राहिले. टकमक टकमक पाहायला लागले. डोंगरदादाला जरा घाबरलेच, पण धीर करून डोंगरदादाला त्याने विचारले, “डोंगरदादा, डोंगरदादा, राहू का मी इथं ? मला देशील का तू आसरा ?" डोंगरदादाला खूप आनंद झाला. तो म्हणाला, "वा ! वा ! राहा की खुशाल. तुझं इथं स्वागतच आहे. '
रोपटे डोंगरदादाच्या मांडीवर जाऊन बसले. डोंगरदादाने त्याला खाऊपिऊ घातले. रोपट्याचे मोठे झाड झाले. मग दुसरी रोपटी आली. तीही डोंगरदादाने वाढवली. डोंगरदादाकडे आता खूप झाडे झाली.
काही दिवसांनी धिटुकल्या वेली आल्या. झाडांच्या भोवताली जमल्या. हातात हात धरून फेर धरू लागल्या. मग काही बुटकी झुडपे आली. माना डोलावत उभी राहिली. त्यांच्यासोबत होते इवले इवले गवत. फारच होते लाजत. ते हळूच बिलगले डोंगरदादाला. गवताचा मऊ स्पर्श झाला, डोंगरदादाला गुदगुल्या झाल्या.
काही दिवसांनी डोंगरदादा झाडाझुडपांनी भरला. गवतवेलींनी सजला. रंगीबेरंगी फुलांनी नटला. खूपच शोभून दिसू लागला. डोंगरदादाचे जंगल झाले दाट, मग काय विचारता त्याचा थाट! डोंगरदादाचे जंगल सिंहाच्या दृष्टीस पडले. तो डोंगरदादाकडे आला. आयाळ झुलवू लागला. डोंगरदादाच्या कुशीत होती झाडेझुडपे गाढ झोपलेली. सिंहाने गर्जना केली, तेव्हा झाडे, झुडपे, वेली, फुले थरथरली. खडबडून जागी झाली.
डोंगरदादाने सिंहाकडे पाहिले. त्याला विचारले, “काय झालं रे बाबा ? एवढ्या मोठ्याने असा का ओरडतोस ? " सिंह म्हणाला, “डोंगरदादा, क्षमा करा. पाहिलं तुमचं रान आणि हरपलं माझं भान; म्हणून केली मी गर्जना. इथं दाट झाडी आहे. हवा कशी थंड आहे. राह का मी इथं ?"
डोंगरदादा म्हणाला, “हो, हो, अगदी आनंदानं. ही पाहा ऐसपैस गुहा. यात तू खुशाल राहा."
सिंह खूश झाला. तो गुहेत राहायला लागला. जंगलात रुबाबात फिरायला लागला.
डोंगरदादाचे जंगल पाहून अनेक पशू यायला लागले. डुलत डुलत आली वाघोबाची स्वारी. सोंड हालवत आला हत्ती. मान वळवत जिराफ आला. शेपूट उभारत कोल्हा आला. डोळे मिचकावत अस्वल आले. पळत लांडगे आले. सुंदर सुंदर हरणे आली, तुरुतुरु धावायला लागली. गोजिरवाणे ससे आले, टुणटुण उड्या मारायला लागले. पळत वाकुल्या दाखवत माकडे आली, फांदयांवर झोके घेऊ लागली..
डोंगरदादाने सगळ्यांना आसरा दिला. सगळ्या प्राण्यांचा गलबला सुरू झाला. डोंगरदादाला आनंद झाला.
डोंगरदादाने सगळ्या प्राण्यांना बजावले. भांडणतंटा करू नका. दंगामस्ती करू नका. हिरव्यागार जंगलात सगळे राहा आनंदात. हळूहळू जंगलातील झाडे फळाफुलांनी बहरली. त्यांचा घमघमाट सगळीकडे पसरला. दूरदूरच्या पक्ष्यांपर्यंत पोचला. सारे पक्षी वेगाने आले, घिरट्या घालायला लागले. घरटी बांधून आनंदाने राहू लागले. पक्ष्यांची झुंबड उडाली. त्यांची किलबिल सुरू झाली.
पशुपक्ष्यांना कळून आले - झाडे आपल्या उपयोगी पडतात, गोड फळे खायला देतात, गार जागा राहायला देतात. त्यांनी झाडांची फळे खाल्ली. त्यांच्या बिया दुसरीकडे नेल्या. तिकडच्या मातीत त्या रुजल्या. आणखी झाडे तयार झाली. आनंदाने डोलू लागली. डोंगरदादाचा एकटेपणा संपला. तो अगदी आनंदून गेला.
मग काय झाले, डोंगरदादाजवळ ढग आले. डोंगरदादाने त्यांना जवळ घेतले. अंगाखांद्यावर आंजारले, गोंजारले, खेळवले. ढगांना खूप आनंद झाला. त्यांच्यातून पाऊस पडायला लागला. ढग गडगडले आनंदाने, झाडे भिजली पावसाने. पाऊस पडला धो धो धो, जंगल हसले खो खो खो. डोंगरदादा गाऊ लागला, जंगलाने मग ताल धरला.
या पक्ष्यांनो या सगळे
खुशाल खा या गोड फळे
मधुर मध हा फुलांतला तुमच्यासाठी साठवला
पाऊस भरपूर पडायला
जंगल हवे राखायला.
लेखक - श. त्र्यं. पाटील
धडा - डोंगर दादा





भीती ही शत्रू नाही, ती एक गुरू आहे.

 भीतीचं मूळ समजलं, तर तिचं रूपांतर चांगल्या ऊर्जेत करणे शक्य होईल, म्हणून या लेखात भीतीचे मूळ समजून घ्या.

भीती ही केवळ भावनाच नाही, ती एक आतून देणारी सिग्नल आहे. पण आपण बहुतेकवेळा भीती टाळतो, लपवतो किंवा तिच्याशी झगडतो. खरंतर, भीतीचं मूळ समजून घेतलं, तर ती आपल्याला रोखणारी नाही तर पुढे नेणारी शक्ती ठरू शकते.
आपल्या आयुष्यात अनेकदा आपण जाणीवपूर्वक नाही, तर भीतीपोटी निर्णय घेतो. कुणाचं मत काय असेल, अपयश मिळालं तर काय होईल, इतरांनी नाकारलं तर? — या आणि अशा असंख्य विचारांच्या मुळाशी असते भीती. पण खरंतर, ही भीती नकारात्मक नसून आपल्याला अंतर्मुख करणारी संधी असू शकते — जर आपण तिला योग्य प्रकारे समजून घेतलं, तर.
1️⃣ भीतीचं मूळ कुठं असतं?
1. बालपणातल्या आठवणी
– लहानपणी अपमान, शिक्षा किंवा दुर्लक्षित होण्याचे अनुभव मनात खोलवर घर करून जातात. त्यातून “मी पुरेसा नाही” ही भावना निर्माण होते.
2. सामाजिक दबाव
– ‘लोक काय म्हणतील?’ ही सर्वात मोठी भीती. आपलं खरं स्व स्वतः लपवून ठेवण्यामागचं हे एक मोठं कारण असतं.
3. अपयशाचं स्मरण
– पूर्वीचा एखादा अपयश अनुभव मनात खोल रुतलेला असतो. त्याच्या आठवणींच्या सावलीतच आपण नवीन संधी टाळतो.
2️⃣ भीतीचं रूपांतर कोणत्या भावनेत!
– निर्णय टाळणं
“थांब पाहू, वेळ येऊ दे.” असं म्हणत आपण निर्णयच घेत नाही.
– राग, चिडचिड
भीती थेट न दाखवता, रागाच्या रूपात बाहेर पडते.
– सततची चिंता
भविष्यात काय होईल, याचा अति विचार म्हणजे disguised fear.
3️⃣ भीतीशी संवाद कसा कराल?
✅ तिला ओळखा
तुम्ही नेमकं कशाला घाबरता? अपमान, नकार, एकटेपणा, की अपयश?
✅ तिला लिहून काढा
भीतीला शब्दात उतरवलं, की ती धूसर होत जाते.
✅ कृती करा — लहान पावलं
लहान लहान कृतींनी भीतीच्या मर्यादा ओलांडता येतात.
✅ श्वसन आणि ध्यान
शांत, सुस्पष्ट विचारांची सुरूवात श्वासाच्या जागरूकतेतून होते.
4️⃣ बदलाची वाट
भीती टाळण्याचं नाही, तर तिच्यातून जाण्याचं नाव आहे प्रबुद्धता.
ती आपल्याला खऱ्या ‘स्व’कडे घेऊन जाते — जिथं आपली अस्सल ओळख, ताकद आणि शांती आहे.
निष्कर्ष:
भीती ही शत्रू नाही, ती एक गुरू आहे — आपल्याला दर्शवणारी, की आत कुठे अधुरं आहे.
तिच्याशी जर प्रेमाने संवाद केला, तर ती आपल्याला शांततेच्या आणि विकासाच्या मार्गावर नेत असते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात, प्रत्येकाच्या मनात एखादा कोपरा असा आहे जिथं भीती वसलेली असते — पण तिथंच, त्या अंधारातच, शांततेचा प्रकाश दडलाय.



भगतसिंह



फाशीच्या एक दिवस आधी म्हणजे २२ मार्च १९३१ ला आपल्या जवळच्या मित्रांना भगतसिंह ह्यांनी लिहिलेलं हे पत्र दुर्दम्य आशावाद आहे ह्या पत्रात मृत्यूलाही आव्हान होती ही माणसं...
जिवंत राहण्याची महत्त्वाकांक्षा नैसर्गिकरित्या माझ्यातही असायला हवी मी ती लपवू इच्छित नाही पण माझं जिवंत राहणं सशर्त आहे मी अटक होऊन किंवा जखडून जिवंत राहू इच्छित नाही...
माझं नाव हिंदुस्तानी इंकलाबी पार्टीचं मध्यवर्ती निशाण बनलं आहे आणि इन्कलाब पसंद पार्टीचे आदर्श आणि बलीदानांनी मला प्रचंड उंचीवर नेलंय एवढ्या उंचीवर की जिवंत राहून मी ह्याहून उन्नत कदापी होऊ शकणार नाही...
आज माझ्या कमजोरी लोकांसमोर नाहीत जर मी फाशी पासून स्वतःला वाचवलं तर मात्र त्या जगजाहीर होतील आणि इन्कलाबचं निशाण निस्तेज पडेल किंवा कायमचं नष्टही होईल परंतु माझी टेचात निर्भयपणे हसत हसत फाशीपर्यंत जाण्याची उमंग पाहून हिंदुस्तानी माता स्वतःच्या पोटच्या गोळ्यात भगतसिंह पाहतील आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची संख्या एवढी टिपेला पोहोचेल की इन्कलाब थांबवणं साम्राज्यवाद्यांच्या सर्वतोपरी प्रयत्नांच्याही हातात राहणार नाही...
होय, एक विचार मात्र आजही (मनाला) चुटपुट लावून जातो देश आणि मानवतेसाठी ज्या काही तीव्र इच्छा माझ्या मनात होत्या त्याचा हजारावा हिस्साही मी पूर्ण करू शकलो नाही जर जिवंत राहू शकलो असतो तर बहुतेक त्यांना पूर्ण करण्याची संधी मला मिळाली असती आणि त्या इच्छा मी पूर्ण करू शकलो असतो...
ह्या शिवाय कोणतंही लालूच माझ्या मनात फाशीपासून वाचून राहण्यासाठी कधी आलंच नाही माझ्यापेक्षा जास्त सौभाग्यशाली कोण असेल ? मला अश्यात स्वतःचा प्रचंड अभिमान वाटतो आताश्या प्रचंड अधीरतेनं शेवटच्या परीक्षेची मी वाट बघतोय इच्छा आहे ती अजून जवळ यावी...
―――――――――
#भगतसिंह

छ.संभाजी महाराज



"#छ.संभाजी महाराजांची झालेली नाहक बदनामी.."!
#चर्चेला उधाण आलं की इतिहास तुम्हा आम्हा समोर ठेवावा लागतो ही चांगली बाब आहे..
#मुळात छ. संभाजी महाराजांचं चरित्रहणन करूनच ही मंडळी थांबली नाही. त्यांनी त्यांच्या खऱ्या असणाऱ्या ओळखीला पुसून चुकीची बिरुदावली लावली गेली.. ती म्हणजे "धर्मवीर"...
#छ. शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील हे इथल्या "मुस्लिम अन् इथल्या प्रजेचं श्रध्देचं ठिकाण. अन् ते शाश्वत असतील ही.
#ज्या अर्थी आम्ही "टिपू सुलतान" अन् संभाजी महाराजांना आपलं आदर्श मानतो त्या अर्थी त्यांच्यावर झालेला अन्याय, अत्याचार अन् चारित्र्यावर झालेल्या हल्ल्याला प्रत्यूत्तर देणं आपली नैतिक अन् सामाजिक जबाबदारी आहे असं मी समजतो...
#त्याकाळच्या पेशवाई व्याभिचाराला प्रतिष्ठा देण्यासाठी छ. संभाजी राजांना बदनाम करण्यात आलं हे इतिहास लिखित आहे.
#इ. स. नोव्हेंबर १६८१ साली औरंगाजेबचा मुलगा अकबर हा संभाजी महाराजांना येऊन मिळाला. तेंव्हा त्यांना संपवण्यासाठी त्या काळच्या ब्राम्हण मंत्र्यांनी अकबराशी पत्र व्यावहार केला की तु संभाजीला विषप्रयोग करून संभाजीला संपवावं... ज्याच्या मोबदल्यात आम्ही तुला आम्ही अर्धराज्य देऊ.
#शेवटी अकबर आपल्या मित्राच्या मिठाला जागला अन् सर्व हकीकत छ. संभाजी राजंला जाऊन सांगितली... तेंव्हा राज्याच्या या राजद्रोही असणाऱ्या ब्राम्हण मंत्र्यांना संभाजी महाराजांनी बाळाजी आवजी चिटणीसांसह कटात सामील असणाऱ्यांना देह दंडाची शिक्षा ठोठावली .
#त्याचा बदला म्हणून छ. संभाजी महाराजांच यांनी चारित्र्यहणन केले...
#अनामिक

हूर म्हणजे नेमक्या कोण?


जगात जीतकेही मुस्लिमसदृश दहशतवादी आहेत, ते फक्त ७२ हूर मिळविण्याकरिताच स्फोट करत असल्याचा आरोप केला जातो, विशेष करून सोशल मीडियावर हा आरोप वारंवार केला जातो. यासाठी काही अनधिकृत हदिस (प्रेषितवचन)चाही संदर्भ दिला जातो. हा या हदिसी किती अधिकृत आणि किती अनधिकृत आहेत, याची मिमांसा करण्यापूर्वी एक तात्विक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक उदाहरण घेऊ या. मागील अनेक दशकांत काही सुरक्षा अधिकार्‍यांकडून फेक एन्कान्टर केले गेल्याची माहिती समोर आली होती. सुवर्ण पदके किंवा बढती मिळविण्याकरिता ते फेक एन्काउन्टर घडविल्याचा आरोप केला जातो. आता हे जर खरं असेल तर यावर  उपाय काय? फेक एन्काउन्टर्स करणार्‍यांवर कडक कारवाई हा उपाय आहे की, मूळात सुवर्ण पदके पुरस्कार देण्याची पद्धतच बंद करणे हा उपाय आहे? फेक एन्काउन्टर्ससाठी जबाबदार काय आहे? त्या सुरक्षा अधिकार्‍यांची स्वार्थी वृत्ती की सुवर्ण पदके? यावरून स्पष्ट होते की, एखाद्या कामगीरीसाठी घोषित केलेले बक्षिस हे चांगली कामं जास्तीत जास्त करावीत यासाठी असतो, त्या चांगल्या कामाच्या नावाने वाईट कामं करण्यासाठी नव्हे.
अगदी याचप्रमाणे सत्याच्या बाजुने असत्याविरूद्ध सरकारी सैन्यात सामील होऊन युद्धभूमीवर शहीद होणार्‍या शूर सैनिकांसाठी अल्लाहने जन्नतमध्ये बक्षिस म्हणून अनेक देणग्या घोषित केलेल्या आहेत. त्याचपैकी एक म्हणजे काही सुंदर महिलांशी त्यांचं लग्न लाऊन दिले जाईल. त्याच सुंदर महिलांना हूर संबोधलेले आहे. आता हे बक्षिस मिळावं म्हणून जर खरंच कुणी एखाद्या सार्वजनिक बससमध्ये कुणी बाँब पेरून ठेवत असेल आणि स्फोटानंतर त्यातले अनेक लहान मुलं, महिला, वृद्ध आणि निरपराध लोकं तडफडून मरण पावले तर तो बाँब पेरणारा कसा काय जन्नतमध्ये जाऊ शकतो? कारण ़कुरआनात तर एक जीव घेणे हे समस्त मानवतेचा जीव घेण्याइतकं पाप मानलं गेलंय. आता हे बाँब पेरणारे खरंच मुस्लिम असतात की आणखी कुणई हा वाद वेगळा, तो आपला इथे विषय नाहिये, पण खरंच असं कुणी करत असेल तर त्यासाठी ़कुरआनात घोषित केलेल्या बक्षिसांच्या तरतुदीचा काय दोष? असं असेल तर मग फेक एन्काउन्टर्ससाठी सुवर्ण पदकांना दोष देणार की ते देणार्‍या सरकारला दोष देणार? मूळात निर्दोषांचा जीव घेणारे अतिरेकी जन्नतमध्येच जाणार नाहीत, तर त्यांना हूर मिळण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांना जन्नतमध्ये पत्नी म्हणून हूर मिळणार आहेत, ते सत्यासाठी शहीद झालेले सैनिक असतील, क्रांतीकारी असतील, अतिरेकी नव्हे. पण असले आरोप करणार्‍यांचा तर्क, सदसदविवेकबुद्धी यांच्याशी काडिमात्र संबंध नसतो, तर ते इस्लामविषयी पूर्वग्रहदुषित झालेले असतात.
मूळात खरंच ़कुरआन किंवा हदिस ग्रंथांत ७२ हूरांचा उल्लेख आहे का? संबंधी जमाअत ए इस्लामी हिंदचे प्रसिद्ध इस्लामी विचारवंत मौलाना ऱजी उल इस्लाम यांनी जे म्हटलं आहे, ते जशास तसं आम्ही इथे हिंदीत देत आहोत –
‘‘क़ुरआन में हूरों की संख्या का कहीं उल्लेख नहीं है। कुछ प्रामाणिक हदीसों से मालूम होता है कि हर ईमानवाले को जन्नत में दो हूरें मिलेंगी (संदर्भ: हदिसग्रंथ बुख़ारी शरीफ, हदिस क्र. ३२४५, हदिसग्रंथ मुस्लिम शरीफ, हदिस क्र. २८३४) मुहद्दिसीन (हदीसों के विशेषज्ञों) ने लिखा है कि जैसे क़ुरआन में दो जन्नतों और दो चश्मों (जलस्रोतों) का उल्लेख है उसी तरह हदीस में दो बीवियों का ज़िक्र किया गया है। जहाँ तक ७२ हूरों का सम्बन्ध है, इसका उल्लेख किसी प्रामाणिक हदीस में नहीं है। हदीसों के मशहूर विशेषज्ञोंने यह बात स्पष्ट रूप से कही है, उदाहरण के लिये अल्लामा इब्ने-तैमिया (मजमउल-फ़तावा : ६/४३२), अल्लामा इब्ने-कसीर  (२०/३४१), अल्लामा इब्ने-हजर (फ़तहुल-बारी : ६/३२५) आदि अल्लामा इब्ने-क़य्यिम अल्जौज़िया की एक किताब है ‘हादिअल-अरवाह लिबिलादिल-अफ़राह’। इसमें जन्नत और उस की इनामात का उल्लेख बहुत विस्तार से किया गया है। इसमें अल्लामा इब्ने-क़य्यिम ने स्पष्ट किया है कि, प्रामाणिक हदीसों में दो पत्नियों से ़ज्यादा का उल्लेख नहीं है। (पृ॰१५७) यह बात सही है कि बहुत-सी हदीसों और उल्लेखों में ७२ हूरों का उल्लेख है। यही नहीं, बल्कि कुछ हदीसों में सौ, पाँच सौ, चार हज़ार, बल्कि आठ हज़ार हूरों का उल्लेख है, लेकिन ये तमाम हदीसें ज़ईफ़ (अप्रमाणित), बल्कि उनमें बहुत सी मौज़ू यानी मनगढ़न्त हैं। इस्लाम दुश्मन लोग क़ुरआन में तो फेर-बदल न कर सके और उसका एक अक्षर भी बदलने पर समर्थ न हो सके तो उन्होंने निराधार और मनगढ़न्त हदीसें फैला दीं।’’
(संदर्भ: मौलाना ऱिजउल इस्लाम यांच्या सोशल मीडियावरील पेजवरून साभार)
एक गोष्ट लक्षात घ्या की, जन्नतमध्ये काही फक्त आधुनिक युगातलेच लोकं जाणार नाहीयेत, तर लाखो वर्षांच्या प्रचंड मोठ्या कालखंडातले विविध युगांतले, पृथ्वीच्या विविध प्रदेशातील विविध संस्कृतीतील इमानवंत जाणार आहेत. म्हणून एकपत्नीवाद हा अगदी अलिकडची संकल्पना आहे. प्राचीनकाळी भारतासहीत जगभरात हे फार अपवादानेच सापडते. म्हणून जन्नतमध्ये जणु सगळे युग एकत्रितच येणार आहेत.
बरं सवतीचा इर्ष्या किंवा सांसारिक आवड निवड, प्रेमात वाटेकरी अथवा घरगुती स्वयंपाक वगैरे तिथे नसेल. पुरूषांना हवी तितकी लैंगिक शक्ती तिथे उपलब्ध असतील. थोडक्यात म्हणजे बहुपत्नीत्वामुळे इथ्ो ज्या काही तथाकथित संभावित समस्या काही ठिकाणी उपस्थित होण्याची शंका काही जणांना उपस्थित होण्याची भीती वाटत राहते, तशी कोणतीही समस्या तिथं राहणारच नाही. म्हणून या लौकिक जगातल्या आधुनिक युगाच्या चष्म्यातून जन्नतचीही अगदी तशीच व्यवस्था असेल अशी कल्पना करणे योग्य नाही.
जन्नतमध्ये हूरशी लग्न लाऊन दिले जाईल, या बक्षिसाच्या आकर्षणाचा फायदा असा झाला की, तिथल्या हूरसाठी इथल्या हूरचा आदर ठेवणे ही अट असल्याने वेश्यावृत्तीच्या आहारी गेलेले मोठमोठे ठरकी लोकं हे तौबा (पश्चाताप) व्यक्त करून नीतीमान पाच वेळचे नमाजी बनले, आपल्या पत्नीशी प्रामाणिक राहू लागले, महिलांचा सम्मान करू लागले. त्यानंतर त्यांना कळले की, जन्नतची खरी देणगी हूर नसून अल्लाहचं दर्शन, त्याचा साक्षात्कार आहे, जो अल्लाह सर्व इमानवंतांना जन्नतमध्ये देणार आहे. त्याचं दर्शन सर्व सुखांपेक्षा जास्त सुख देणारं आहे. त्याशिवाय इतर सुखांचं दाखविलेले आकर्षण तर लौकिक जीवनातील चंगळवादातून माणसाला बाहेर काढण्यासाठी आहे, पण ते आकर्षण खोटं नसून ते मिळणार नक्कीच इन्शाल्लाह, पण फक्त इमानवंतांनाच! महिलांना जन्नतमध्ये  अनेक पती का नाही? असा प्रश्न विचारला जातो. तर जन्नतमधील देणग्या या नितीमान मानवी स्वभावानुसार आहे. अन्यथा अल्लाहनं क़ुरआनात स्पष्ट म्हटलेले आहे की,

‘‘अन् त्यांना तिथे (जन्नतमध्ये) हवं ते मिळेल.’’
(संदर्भ : क़ुरआन, अध्याय ५० ; अध्याय क्र. ३५)

पण आपल्याला दोन दोन किंवा त्यापेक्षा जास्त पुरूष हे पती म्हणून मिळावे असं कोणत्या ‘नीतीमान’ महिलेला वाटेल? तुम्हाला खरंच दोन नवरे हवे का, असं मजाकितही कुणी एखाद्या नीतीमान महिलेला विचारलं तर ती ती भयंकर चिडून रागावू शकते. त्यामुळे हा प्रश्नच काल्पनिक ठरतो.
इस्लाम व्यतिरीक्त काही विचारधारांमध्ये ‘अप्सरा’चा उल्लेख आढळतो. या अप्सरा नृत्यांगणा होत्या, असं सांगितलं जातं. अनेक चित्रपट, धारावाहिक, नाटकं व कादंबर्‍यांमध्ये त्या अप्सरा फक्त काही जणांचं मनोरंजन करत असल्याचं दाखविण्यात आलं. अनेकवेळा त्या अप्सरा कमी कपड्यांत, अतिशय मादक हालचाली करून काही जणांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही दाखविण्यात आलेलं आहे. त्या अप्सरांचं रीतसर विवाह होऊन त्या सुखवस्तु घरंदाज महिलांसारखं कौटुंबिक जीवन जगत असल्याचा फारसा जास्त उल्लेख सापडत नाही. काही हिंदी चित्रपटांतही परी, हूर वगैरेंची पात्र अशीच मोठमोठे पंख असलेली आणि मादक नृत्य करत असलेली दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हा गैरसमज दृढ होण्यास मदत मिळाली की हूर म्हणजेच या परी किंवा अप्सरा वगैरे असतात की काय म्हणून. उपरोक्त संदर्भात सांगितल्याप्रमाणे या हूर म्हणजे दुसर्‍या तिसर्‍या काही नसून याच लौकिक जीवनातील पुण्यवान महिला असतील, ज्यांचा सहवास एकतर त्यांच्याच पुण्यवान पतीसोबत असेल, पण जर पती नरकात गेलेला असेल तर मग त्यांचं लग्न इतर दुसर्‍या पुण्यवान पुरूषांसोबत केले जाईल. प्रसिद्ध इस्लामी विचारवंत मौलाना अबुल आला मौदुदी यांनी त्यांचे ़कुरआनावरील प्रसिद्ध भाष्य ‘तफहिम-उल-़कुरआन’च्या तळटिपांत यासंबंधी अनेक भाष्ये केलेली आहेत. त्यापैकी काही इथे संदर्भ देत आहोत –
‘‘असे असेल त्यांचे (जन्नतमधील लोकांचे) वैभव. आणि आम्ही गोर्‍यापान मृगनयनी स्त्रियांशी (हूरांशी) त्यांच्या जोड्या बनवू (विवाह करून देऊ).’’
– ़कुरआन (४४:५४)
भाष्य:  
‘‘अरबी शब्द आहे ‘हुरून-ईन’ हूर बहुवचन आहे ‘हौरा’चे आणि हौरा अरबी भाषेत ‘गोर्‍या स्त्री’ला म्हणतात. ‘ईन’ बहुवचन आहे ‘ऐना’चे आणि हा शब्द मोठमोठ्या डोळ्यांच्या (मृगनयनी) स्त्रीसाठी वापरला जातो.’’
– तळटिप क्र. ४२ (संदर्भ: तलखीस तफहिमुल ़कुरआन, भाग २, भाष्यकार: मौलाना अबुल आला मौदुदी, भाषांतर: प्रा. अब्दुल रहमान शेख, प्रकाशक: इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंबई, आवृत्ती २०१३ पान नं. ८१८)

‘‘या ऐश्वर्यादरम्यान लाजाळू नजरवाल्या असतील, ज्यांना या स्वर्गस्थ (जन्नती) लोकांच्या अगोदर कधी कोणा मानवाने अथवा जिन्नाने स्पर्श केलेला नसेल’’
– ़कुरआन (५५:५६)
भाष्य:
‘‘याचा अर्थ  जगाच्या जीवनात एखादी स्त्री कुमारीका म्हणून मृत्यु पावली असेल किंवा कुणाची पत्नी राहिली असेल, तरूणी अथावा वृद्धा असतांना मृत पावली असेल. जेंव्हा पारलौकिक जीवनात या सदाचारी स्त्रिया जन्नतमध्ये दाखल होतील तेंव्हा तरूण व कुमारिका बनविल्या जातील. तिथे त्या नेक (पुण्यवान) स्त्रीला ज्या नेक पुरूषाची जीवन साथी बनविले जाईल ती जन्नतमध्ये दुसर्‍या पुरूषाच्या उपभोगात पत्नी म्हणून आली नसेल.’’
– तळटिप क्र. ४६ (संदर्भ: तलखीस तफहिमुल ़कुरआन, भाग २, भाष्यकार: मौलाना अबुल आला मौदुदी, भाषांतर: प्रा. अब्दुल रहमान शेख, प्रकाशक: इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंबई, आवृत्ती २०१३ पान नं. १०११)

‘‘निश्चितच ईशपरयाणांसाठी यशाचे एक स्थान आहे. उद्याने आणि द्राक्षे आणि समवयस्क नवयुवती’’
– ़कुरआन (७८:३३)
भाष्य:
– तळटिप क्र. २० (संदर्भ: तलखीस तफहिमुल ़कुरआन, भाग २, भाष्यकार: मौलाना अबुल आला मौदुदी, भाषांतर: प्रा. अब्दुल रहमान शेख, प्रकाशक: इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंबई, आवृत्ती २०१३ पान नं. १३०५)
हे तर या लौकिक जीवनाच्या दृष्टीने माणसाला काही आकर्षणं सांगितली गेली आहेत, जेणेकरून त्याने सदाचारांकडे वळावं. जन्नतमध्ये नक्वâीच अनेक देणग्या मिळतील, पण सर्वात मोठी देणगी कोणती? त्या सृष्टिकर्त्याचा साक्षात्कार … त्याचं दर्शन … हे कोणत्याही हूरपेक्षा किंवा मोठ्यात मोठ्या देणगीपेक्षा कितीतरी जास्त पटिने महान देणगी आहे, शाश्वत सुख देणारं आहे. जन्नती लोकांना अल्लाह आपलं दर्शन घडवणारा आहे, दुसर्‍या शब्दांत सांगायचं म्हणजे तो त्याच्या अस्तित्त्वाची वास्तविकता स्पष्ट करणार आहे. (संदर्भ: हदिसग्रंथ बुखारी शरीफ, हदिस (वचन) क्र. ६०६८, हदिसग्रंथ मुस्लिम शरीफ, हदिस क्र. २६७ तसेच बुखारी शरीफ, हदिस क्र.  ६८८३, मुस्लिम शरीफ, हदिस क्र. १००२)
त्याच्या दर्शनासाठी माणसाने इमानेइतबारे त्याचे आज्ञापालन केले पाहिजे, तोच खरा सदाचार आहे. त्यासाठी ़कुरआनात त्याच्या आज्ञा कोणत्या आहेत, ते समजून उमजून अभ्यासने गरजेचे आहे. ज्यांनी असा अभ्यास केला आहे, त्यांनी ते इतरांना सांगणेही गरजेचं आहे, तेंव्हाच कुठे हुरांविषयी जसे गैरसमज आहेत, तसे इतर गैरसमजही दूर होतील इन्शा अल्लाह!

– नौशाद उस्मान, औरंगाबाद

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय...

 मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय

धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय


रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय

नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपलं नाव लिहायचय

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय


मधली सुट्टी होताच वाटर बॅग सोडुन नळाखाली हात धरून पाणी प्यायचय

कसाबसा डबा संपवत तिखट मीठ लावलेल्या चिंचा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय

सायकलच्या चाकांचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेळायचंय,

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय


उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिलेल का हा विचार करत रात्री झोपी जायचय

अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनंदासाठी मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

घंटा व्हायची वाट का असेना मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचय

घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय


कितीही जड असुदे, जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराच ओझ पाठीवर वागवायचय

कितीहि उकडत असू दे, वातानुकूलित ऑफिसपेक्षा पंखे नसलेल्या वर्गात खिड्क्या उघडून बसायचय

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.....

 मी साधारण ९ वर्षा चा असेन. एकदा माझ्या वडिलांच्या जवळच्या मित्राचे निधन झाले. त्या वेळी माझ्या वडिलांनी मला जबरदस्तीने त्यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी स्मशानभूमीत नेले. मी तर त्यांच्या मित्राला ओळखत देखील नव्हतो.

ज्या वेळी मी स्मशानभूमीत गेलो त्या वेळी सर्व कार्य चालू असताना एका कोपऱ्यात उभा राहिलो व होणारे विधी पहात राहिलो. तेवढ्यात एक जण माझ्या कडे आला व म्हणाला बाळा कायम सुखी राहण्याचा प्रयत्न कर, आनंदात आयुष्य जगून घे. माझ्याकडे बघ. माझ्याकडे सर्व साधने असताना सुद्धा मी आयुष्याचा उपभोग घेऊ शकलो नाही. एवढे बोलून माझ्या डोक्यावरून हात फिरवून तो निघून गेला.
थोड्यावेळाने माझ्या वडिलांनी मला पार्थिवाला नमस्कार करण्यास बोलविले. मी नमस्कार करताना पार्थिवाच्या चेहेऱ्याकडे बघितले व हादरलोच.... अरे हा तर तोच माणूस होता जो थोड्यावेळापूर्वी माझ्याशी बोलत होता.
या घटनेचा माझ्यावर भयंकर परिणाम झाला. मी त्या नंतर कित्येक वर्षे नीट झोपू शकलो नाही. बऱ्याच वेळा रात्री दचकून उठत असे. मला मानसिक त्रास सुरू झाला व बरीच वर्षे त्यावर उपाय सुरु होते. मला रात्री एकटे व दिवे बंद करून झोपायला भीती वाटत असे. माझ्या उमेदीची बरीच वर्षे यात निघुन गेली.
कित्येक वर्षांनी एक विस्मयकारक घटना अशी कळली की ज्याने माझे आयुष्यच बदलले
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्या माणसाला एक जुळा भाऊ होता.
आयचा घो त्या भावाच्या...

व्यवसाय साक्षर व्हा...

 पैशासाठी बिजनेस करायचा नसतो असं म्हटलं कि बऱ्याच जणांचं पित्त खवळतं. अस्मितेला धक्का लागला असावा अशा प्रकारे चिडचिड होते. आपण ज्या ज्या प्रकारे विचार करतोय त्याच्या अगदीच विरुद्ध कुणी विचार करतोय म्हटल्यावर तो कसा मूर्ख आहे हे सांगण्याची प्रचंड इच्छा होते, आणि ती व्यक्त केली जाते सुद्धा... २०-२५ वयाची मुलं स्टाईल मधे पैसा है तो सबकुछ है असा डायलॉग मारतातच... पण तिशीनंतर, पैसा तर मिळतोय पण तरीही समाधान लागत नाहीये, नक्की चुकतंय कुठं, असाही प्रश्न पडायला लागतो...

व्यवसाय पैशासाठी करायचाय ? मग व्यवसायच का? नोकरी पण करू शकता कि.... नोकरीमध्येही अशा कित्येक संधी आहेत जिथे महिन्याला १०-२० लाखाचे पॅकेज मिळू शकते. व्यवसायात संपुर्ण आयुष्य गेलेल्या कित्येकांना आजही एवढे उत्पन्न वर्षाला सुद्धा मिळत नाही. मग व्यवसाय हा पैशासाठीच केला जतो हा गैरसमज नाही का? सामान्यपणे आपण आसपासचे लोक काय बोलतात यावरून आपली मते ठरवत असतो. व्यवसायाच्या बाबतीतही असेच आहे. खास मोटिव्हेशनल लेक्चर्स ऐकून तर पैसा कमावण्यासाठीच व्यवसाय करायचा असतो हे आपल्या डोक्यात घट्ट बसलेलं असतं... पण खरं सांगतो व्यवसाय पैशासाठी करत नसतात... पैसा हा व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे, आपण ज्यावेळी व्यवसाय यशस्वी करण्यासाठी धडपडतो तेव्हा पैसा आपोआपच आपल्याकडे यायला लागतो. तो मिळावा यासाठी धडपड करायची गरज नसते. तो आपोआपच येतो...
मग, व्यवसाय का करायचा ? व्यवसाय करायचा असतो तो स्वातंत्र्यासाठी...
व्यवसायातून आपल्याला स्वातंत्र्य मिळतं... निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, विचार करण्याचं स्वातंत्र्य, आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य,भविष्य पाहण्याचं स्वातंत्र्य, भविष्य आपल्या मनाप्रमाणे घडवण्याचं स्वातंत्र्य, वेळेचा वापर करण्याचं स्वातंत्र्य, आपल्या संकल्पनांवर काम करण्याचं स्वातंत्र्य, आपला मार्ग तयार करण्याचं स्वातंत्र्य... हे स्वातंत्र्य आपल्याला व्यवसायातून मिळतं. या स्वातंत्र्यासाठी आपल्याला व्यवसाय करायचा असतो... आपला खरा विकास या स्वातंत्र्यातूनच होत असतो. फक्त पैशातून विकास होत नाही .पैशाने फक्त इमारती उभ्या राहू शकतात, त्यात समाधानाने राहण्यासाठी स्वातंत्र्य महत्वाचं असतं.
पैसा हा व्यवसायाचा परिणाम आहे... तो मिळतोच... पण पैशाला कधीच साध्य समजायचं नसतं, ते साधन असतं... आपल्या अनेक साधनांपैकी एक साधन आहे आपलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचं... त्याला साध्य समजून वाटचाल केली तर त्यातून फक्त नैराश्य हाती येतं, कारण ते कधीच हाती ना लागणारं साध्य ठरण्याचीच शक्यता जास्त असते. तुम्हाला पैसा कमवायचा आहे, मग तुम्ही व्यवसाय यशस्वी करण्याकडे लक्ष द्या. दररोज उत्पन्नाची आकडेवारी मांडत बसाल तर आपले उद्दिष्ट साध्य का होत नाहीये या विचाराने नैराश्यात जाल. नैराश्यात गेलात कि आपोआपच बिजनेस बंद पडणार आहे... काय फायदा झाला? आता तुम्ही ग्राहक जास्तीत जास्त कसे वाढतील याकडे लक्ष द्या, ग्राहक वाढले कि नफा आपोआपच वाढणार आहे, म्हणजेच पैसा वाढत जाणार आहे. ग्राहकच पैसे घेऊन येत असतो.
वयाच्या किशी-चाळीशीनंतर नंतर बरेच जण पैसा मिळतोय पण समाधान का नाही, असा जेव्हा विचार करतात, त्यामागे हेच कारण असतं. त्यांनी पैशाला साध्य समजून काम केलेलं असत, आणि ते साध्य साधण्याच्या नादात स्वातंत्र्य गमावलेलं असतं..
व्यवसाय पैशासाठी करायचा नसतो म्हणजे पैसा कमवायचा नसतो असं नसतं, किंवा पैशाला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न नसतो, तर व्यवसााचा खरा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न असतो.
पैसा मलाही हवाय, अगदी कित्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप सारा पैसा हवाय, जो अजूनही आवाक्याबाहेर आहे. पण त्यामुळे मला नैराश्य येत नाही... कारण माझं मुख्य साध्य आहे स्वातंत्र्य... ते मी मिळवलेलं आहे. वेळेअभावी माझं काही काम राहतंय असं मला वाटत नाही, मला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही असं मला कधीच वाटत नाही, मला माझ्या मनाप्रमाणे जगता येत नाहीये असं मला कधीच वाटलं नाही, याच कारण मी व्यवसायात पदार्पण करून स्वातंत्र्य मिळवलं आहे... हे स्वातंत्र्य मी टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करतोय... हे स्वातंत्र्य टिकवून, मला जो पैसा मिळेल त्यातून माझी स्वप्ने पूर्ण करणार आहे... म्हणजे मी स्वातंत्र्य उपभोगत, आणि माझी स्वप्नेसुद्धा पूर्ण करण्यासाठी झटतोय... आपलं अंतिम उद्दिष्ट हे समाधानी आयुष्य जगण्याचे असावे... हे समाधानी आयुष्य व्यवसायातून आलेल्या स्वातंत्र्यामुळे मिळतं...
मी आजघडीला मला वर्षातून जास्तीत जास्त १०० दिवस काम करायचं आहे या दृष्टिकोनातून माझी लाइफस्टाइल तयार करत आहे. मी माझं स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसून काम करण्यात मला बिलकुल स्वारस्य नाहीये. तेच करायचं असतं तर मग मी नोकरी केली असती. विना टेन्शन पैसे मिळाला असता. पण मी माझं स्वातंत्र्य गमावलं असतं... हि माझी स्वातंत्र्याची व्याख्या आहे. प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते.
पैसा कमवा भरपूर कमवा, पण ते व्यवसायाचे साध्य नाही हे लक्षात ठेऊन कमवा. व्यवसायाचं अंतिम ध्येय्य हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच आहे हे लक्षात असू द्या. व्यवसाय मोठा करण्यासाठी प्रयत्न करा. व्यवसाय ग्राहकांनी मोठा होतो. पैसा ग्राहकांसोबत आपोआपच येतो....
व्यवसाय साक्षर व्हा...
_
© श्रीकांत आव्हाड

LAUGHTER SHOW

 


पेशंट : "डॉक्टर, या प्रिस्कीप्शनमधे तुम्ही जी औषधं लिहून दिलीत, त्यातल्या सर्वात वरच्या गोळ्या मिळत नाहीयेत.... 


डॉक्टर: "अहो त्या गोळ्या नाहीयेत. 

मी पेन चालतंय की नाही ते बघत होतो...!!!


पेशंट: अबे बयताडा... त्या गोळीच्या नादात 52 मेडिकल फिरलो ना मी बोक्या 

तरीपण एक - मेडिकल वाला म्हणला उद्या मागवून देतो . 

" निसर्ग मित्र व्हा "

 भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल. 

🌳एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.

🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.

🌳एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.

🌳एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.

🌳एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.

🌳एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.

🌳एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.

🌳एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.

🌳एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.

🌳एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.

🌳एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.

🌳एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.

🌳एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.


एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.

🌳आता नाही तर कधीच नाही.

🌳तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.

🌳जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने

पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.

🌳 मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.

🌳तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.

🌳म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.

।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।।

 " निसर्ग मित्र व्हा "

How various marathi wifes fight with their husbands



Pilot's wife : Jaasta udu naka...


Teacher's wife : Mala shikau naka...


Painter's wife : Thobaad rangvin...


Dhobi's wife : Changli dhuvun kadin...


Actor's wife : Natak karu naka...


Dentist's wife : Daat todun haatat deyin...


CA's wife : Hishobaat rahaa...


Engineer's wife : Nut bolt halvun taakin...


Electrician's wife : Fuse udaala ahe ka...


And the best One...


Pandit's wife : Kana khaali ganpati kadhin...

फोटोग्राफर

मोबाईल ने घातला फोटोग्राफर वर घाव
त्यातच खेळला करोनाचा डाव 
किरकोळ कामे झाली हद्दपार 
नसे कोणाला काम
रोज येती नित्य नवे कॅमेरे
व्हा अपडेट मिळतील कामे
ऋण काढून सण साजरे करणे
घेऊन नवे कॅमेरे  तरी 
म्हणती आम्ही रिकामटेकडे 
असेल काही काम तर 
सांगा आम्हा पटकन
ज्युनिअर सिनिअर सगळे बसले 
एका पंक्तीत मागाया काम
मांडेल कैफियत सरकार दरबारी 
फोटोग्राफर असोसिएशन 
जुगारुन असोसिएशन रेट
लावती मनमानी थेट
भरली आपली खळगी दाखवू रूबाब वरती
नसे त्यांच्यात एकी म्हणून मरती उपाशी 
हीच खरी व्यथा आहे एका सच्या फोटोग्राफरची

     सौ. रोहिणी अमोल पराडकर 
           कोल्हापूर 8208890678

जकातचे इस्लाम धर्मातील स्थान काय आहे?



जकात एक उपासना असून इस्लाम धर्माचा महत्वाचा स्तंभ आहे. प्रेषितांचे सहकारी अब्दुल्लाह बिन उमर [रजी] म्हणतात, अल्लाहचे प्रेषित मुहम्मद [स.] म्हणाले, इस्लामचे पाच स्तंभ आहेत - १] अल्लाहच्या एकत्वाची आणि मुहम्मदांच्या प्रेषितत्वाची साक्ष देणे, २] नमाज अदा करणे, ३] जकात अदा करणे, ४] रमजानच्या रोजांचे पालन करणे आणि ५] अल्लाहच्या उपासनागृहाचा हज करणे. [बुखारी, किताबुल इमान, कथन ८]
इस्लाममध्ये अल्लाहच्या उपासनेच्या काही पद्धती निर्धारित करण्यात आल्या आहेत. नमाज, रोजा, जकात, हज, कुर्बानी आणि उमरा या अल्लाहच्या उपासना पद्धती आहेत. यापैकी एकही उपासना जाणीवपूर्वक नाकारणारी व्यक्ती मुस्लिम असू शकत नाहीत. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीवर अल्लाहची उपासना करणे अनिवार्य आहे. नमाज आणि रोजा शारीरिक आणि मानसिक उपासना आहेत तर जकात एक आर्थिक उपासना आहे. हज, उमरा आणि कुर्बानी समर्पणभाव व्यक्त करणाऱ्या प्रतिकात्मक उपासना आहेत.
या उपासना अल्लाहच्या आदेशानुसार आपल्या मूळ स्वरूपात अदा केल्या जातील. उपासनांपैकी एकाचेही स्वरूप बदलण्याचा अधिकार अल्लाहशिवाय अन्य कोणालाच नाही. जकात ही आर्थिक उपासना अल्लाहच्या आदेशाने त्याच प्रकारे केली जाईल, ज्याप्रकारे अदा करण्याचा आदेश अल्लाहने दिला आहे.

मैत्री

शाळेच्या गेटच्या बाहेर उभा राहून आपली वाट बघणारा मित्र...
जेव्हा एक गोळी रुमालात गुंडाळून... दातांने तोडून झाल्यावर बोलायचा...  कुठली पण घे, दोन्ही सारखेच आहेत. त्या निरागस मनाची आणि मैत्री ची सर... आजच्या #चॉकलेट डे ला नाही.

नोकरीला वैतागलात?

नोकरीला वैतागलात? 
?
?
.
.

.

.

.

.

.

आता हे करून बघा

.

.

.

फक्त काही व्यवसायांची यादी

.
.
.

01.कृषी सल्ला व सेवा  केंद्र 
02. पिण्याच्या पाण्याचे जार पुरवठा करणे 
03. फळ रसवंती गृह 
04. कच-यापासून बगीचा 
05. आय. क्यू. एफ. प्रकल्प 
06. एम.सी.आर. टाईल्स 
07. पी.व्ही.सी. केबल 
08. चहा स्टॉल 
09. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा 
10. वडा पाव 
11. शटल कॉक 
12. कुक्कुट पालन 
13.शेळी  पालन 
14. खवा तयार करणे 
15. हात कागद तयार करणे 
16. चार चाकी वाहनांसाठी सेवा केंद्र 
17. आटा चक्की 
18. पान दुकान 
19. भात खरेदी करणे 
20. ऑटो लॉक्स कास्टिंग 
21. जॉब वर्क्स 
22. रीळ मेकिंग 
23. सौर उपकरणे विक्री दुकान 
24. ऑटो टयूब्ज फ्लॅप्स 
25. खडू उत्पादन 
26. रबर गास्केट 
27. वीट उत्पादन 
28. केश कर्तनालय 
29. दोर निर्मिती 
30. रबर स्टॅम्प्स 
31. सौर कूकरमध्ये खारवलेले शेंगदाणे 
32. कमी अंतराकरीता कुरीअर सेवा 
33. वेब डेव्हलपमेंट 
34. माल वाहतूकीसाठी स्वयंचलित वाहन 
35. इडली 
36. चकली 
37. ढाबा 
38. साइल व वाटर टेस्टिंग लॅब 
39. केबल टी.व्ही. 
40. आवळा चहा 
41. पिको फॉल 
42. सोया दूध पनीर उत्पादन 
43. मिनी कॉल सेंटर 
44. आवळा सरबत 
45. काजू सरबत 
46. कोकम सरबत 
47. धोबी सेवा 
48. मंडप सेवा 
49. शेळी पालन 
50. वराह पालन 
51. तयार कपडे व गांधी टोप्या 
52. गादी तयार करणे 
53. मोजे तयार करणे 
54. सोलर वॉटर हिटर 
55. मिनी डेअरी 
56. कृषि बाजार व माहिती केंद्र 
57. चिंच पावडर तयार करणे 
58. मँगो ज्यूस तयार करणे 
59. सुके अंजीर तयार करणे 
60. कॉइन बॉक्स टेलिफोन बूथ 
61. ऑफीस फाईल्स 
62. पापड बनविणे 
63. वॉटर फिल्टर कम कूलर 
64. चिकन विक्री केंद्र 
65. वॉटर फिल्टर कॅंडल्स 
66. पोहे प्रकल्प 
67. झिंक फास्फेट 
68. विमा व्यवसाय सेवा 
69. कॉईल वाईंडींग 
70. जनरल इंजिनियर 
71. टॉफी निर्मिती 
72. मिनी लायब्ररी 
73. एग्ज अल्बुमीन फेल्क्स 
74. काजू प्रक्रीया 
75. शुगर ग्लोब्युल्स 
76. अल्प गुंतवणुकीतून नॅडेप सेंद्रिय खत 
77. ब्लो-मोल्डींग प्लास्टीक वस्तू 
78. आमचूर 
79. फरसाण 
80. बिंदी 
81. बेकरी 
82. हॅचरी 
83. फॅक्स व ई-मेल प्रक्षेपण  
84. आळंबी व नॅडेप सेंद्रिय खत 
85. डोअरी व नॅडेप सेंद्रिय खत 
86. ऊसाचे गु-हाळ 
87. कापूर वडी
88. ब्रास बँड 
89. हरभरा डाळ 
90. सुरभी बॅग व इतर वस्तू तयार करणे 
91. आमलेट पाव गाडी 
92. क्रेन सेवा 
93. लिंबू सरबत 
94. सायबर ढाबा 
95. फिरते कापड व कपडे विक्री दुकान 
96. मसाले तयार करणे 
97. लोणचे तयार करणे 
98. ब्रेक ड्रम कास्टिंग 
99. कच्चा चिवडा 
100. कांडी कोळसा
101. गोल्ड फिंगर तयार करणे 
102. स्वीस क्रिस सिमेंट कौले 
103. रेशीम उद्योग 
104. बाजार माहिती केंद्राची स्थापना करणे. 
105. कापडी पिशव्या 
106. क्रिम सेपरेटर 
107. चक्का श्रीखंड 
108. लाकडी फर्निचर 
109. शेवया उत्पादन 
110. घडयाळ दुरूस्ती 
111. छोटया बल्बच्या सजावटी माळा 
112. मोटार रिवायडींग 
113. टाकाऊ शेतमालाचा उपयोग 
114. पावडर ऑसिडॅक्टरीन 
115. भांडी घासण्यासाठी सफाई पावडर 
116. राजगि-याच्या वड्या 
117. सायकल, पान व कॅरम दुकान 
118. अडूळसा 
119. चिक्की 
120. बॉलपेन 
121. कुल्फी व कॅंन्डी तयार करणे 
122. बुढ्ढी के बाल 
123. गांडूळ खत तयार करणे 
124. किराणा माल व भाजीचे दुकान 
125. साडीचा फॉल तयार करणे 
126. अंबाडी सरबत 
127. चिक्कू मेवा 
128. टेलर्स लेबल 
129. टोमॅटो केचप 
130. तेलाची घाणी 
131. पेप्सी कोला 
132. शतावरी कल्प 
133. लिफाफे तयार करणे 
134. दुचाकी वाहन धुलाई केंद्र 
135. साडीला पिको-फॉल करणे 
136. भाताची गिरणी 
137. किराणा दुकान व पिठाची गिरणी 
138. केळीचे वेफर्स 
139. घरगुती खानावळ 
140. नर्सरी प्रकल्प 
141. वायनरी प्रकल्प 
142. फळांचा मुरांबा तयार करणे 
143. वनौषधी वनस्पती लागवड 
144. लाह्या उत्पादन प्रकल्प 
145. आधुनिक सुतारकाम 
146. बॅटिंग ग्लोव्हज उत्पादन करणे 
147. स्प्रे प्रिंटींग 
148. घरगुती उपकरणांची दुरुस्ती 
149. एलपीजी सिलेंडरसाठी ऑल्युमिनियम सील 
150. फुलशेती 
151. बाकरवडी 
152. मुरमुरे 
153. शिकेकाई 
154. शीतगृहे 
155. टायपिंग  
156. स्थानिक व दूरस्थ डाटा एन्ट्री करणे 
157. एरंडीचे तेल 
158. जाहिरात कला
159. लिक्वीड सोप तयार करणे 
160. कुक्कुट पालन 
161. नाचणीचे सत्व 
162. लोकरीचे कपडे 
163. विद्युत सेवा तज्ञ 
164. झेरॉक्स सेंटर 
165. द्रवरूप फिनेल तयार करणे 
166. फॅशनेबल चप्पल तयार करणे 
167. ग्रामीण गोदाम योजना 
168. मेटॅलीक वॉशर्स 
169. टेलिकॉम संबधित फॉर्म विक्री, बीले भरणे व सेवा 
170. कॉक्रिट मिक्सर सेवा 
171. टेलिकॉम संबधित सेवा 
172. वनस्पती शाम्पू तयार करणे 
173. सुगंधित सुपारी प्रकल्प 
174. विद्युत उपकरणे दुरूस्ती 
175. सुधारित निर्धूर चूल 
176. इव्हेंट मॅनेजमेंट 
177. फिरत्या ग्राहकांसाठी फॅक्स व ई-मेलची सेवा 
178. बिस्कीटे 
179. अगरबत्ती 
180. दूरध्वनी बुथ 
181. माक्याचे तेल तयार करणे 
182. लॅंटेक्स रबर कंडोम्स 
183. आक्झालिक असिड 
184. कशिदाकाम करणे 
185. चुन्याची पूडी 
186. सेंटरींग सेवा  
187. पशुखाद्य तयार करणे 
188. पापकार्न तयार करणे 
189. व्हिडीयो सेंटर 
190. वैयक्तिक संगणक देखभाल कंत्राट 
191. छंदामधून विविध व्यवसाय
192. व्हिडीयो शूटींग सेवा 
193. भाजीपाला सुकविणे 
194. इंजेक्शन मोल्डेड शूज ( बूट ) 
195. धान्याची प्रतवारी ठरविणे 
196. वैयक्तिक संगणकाची वार्षिक देखभाल 
197. डोसाभट्टी 
198. फोटोफ्रेम 
199. मळणीयंत्र 
200. कांदाचाळी
201. धाग्यांचे रीळ 
202. निरगुडीचे तेल 
203. कपड्यांचा साबण 
204. पुरूषांचे तयार कपडे 
205. आईस्क्रीस चर्नर 
206. ऑटोमोबाईल गॅरेज 
207. प्रिंटींग प्रेस 
208. फरश्यांना पॉलिश करणे 
209. बांबूच्या वस्तू तयार करणे 
210. प्लॅस्टिक पार्टस 
211. बटाट्याचे वेफर्स 
212. रोपवाटिका संगोपन 
213. कॉंक्रिंट मिक्सर सेवा 
214. स्वयंचलित दुचाकी वाहन दुरूस्ती व देखभाल 
215. वनसंपत्ती माहिती केंद्र 
216. कर्बयुक्त शीतपेये ( सोडा वॉटर ) 
217. प्लास्टीक मोल्डींग 
218. नारळाच्या पानापासून झाडू तयार करणे 
219. स्वयंचलित वाहनांमध्ये ग्रीस भरणे 
220. छायाचित्रण
221. फोटोग्राफी 
222. खरबूजाच्या व सूर्यफूलाच्या बिया 
223. द्राक्षाचे सरबत 
224. मधुमक्षिका पालन 
225. सुतळ्यांची पोती तयार करणे 
226. कडबाकुट्टी यंत्र 
227. कॉंक्रीटचे ठोकळे 
228. बांगडयांचे फिरते दुकान 
229. वाहनांसाठी धुलाई केंद्र 
230. मोबाईलसाठी निकेल कॅडमियम बॅटरी 
231. बैलांकरीता घांगरी पट्टा 
232. आयुर्वेदिक सुगंधी तेलाचे उत्पादन 
233. टाचण्यांचे उत्पादन 
234. फॅब्रिकेशन वर्कशॉप 
235. कॉम्प्युटर भाडयाने देणे 
236. आयुर्वेदिक रोपांची नर्सरी 
237. आयुर्वेदिक प्रसाधने 
238. कॉम्प्युटर प्रशिक्षण देणे 
239. पत्रावळ्या-द्रोण 
240. व्यायामशाळा 
241. रसायनविरहीत गुळ 
242. भुईमूगाच्या शेंगा फोडणे 
243. डिहाड्रेटेड कॅरेट श्रेडस् 
244. व्हर्च्युअल पर्सनल व ऑफिस असिस्टंट 
245. हार्टीकल्चर क्लिनिक 
246. प्लॅस्टिकचे ज्वेलरी बॉक्स तयार करणे 
247. वाळविलेल्या माश्यांची विक्री करणे 
248. ब्युटीपार्लर 
249. कागदपत्रांचे ई कागदपत्रांमध्ये रूपांतर करणे. 
250. चामड्यापासून विविध वस्तू बनविणे 
251. कॉम्प्युटरवर अकौंटस् लिहणे 
252. कडधान्यांपासून डाळ 
253. डिस्ट्रीब्युशन बोर्ड 
254. द्राक्षांपासुन मनुके तयार करणे
___________

       मला खात्री आहे यातल एकही काम तुम्हाला जमणार नाही.
        इतकेच कशाला तुम्ही वरची संपूर्ण यादी वाचण्याचे कष्ट ही घेतले नसणार.

मुकाट्याने आपापली नोकरी करा. त्याच्या इतकं सोपं काम जगात नाही...

भारत माझा

स्वप्नांत आला भारत माझा
भारत माता रडली आता 
बघ माझी हिरवी साडी 
झाली आता तांबूस काळी   
बघ माझे पाणीदार डोळे 
झाले ते काळे निळे 
श्वास हा माझा काळाधूर जसा  
अरे कोपला आता निसर्ग हा 
स्वप्नातील सुंदर स्वच्छ भारत  
अरे आठवा  स्वप्न महान क्रांतिवीरांचे  
स्मरूनी त्यांच्या बलीदानास 
ध्यानी मनी जागवा देशप्रेम  
नका विकू स्वाभिमान देशद्रोहींना 
पेटवा मशाली सुवर्ण भारताच्या 
करू या विकास स्वातंत्र्य भारताचा 
हिच खरी श्रद्धांजली अर्पूनी छ. महाराजांना  
घेऊ प्रेरणा त्यांच्या अनमोल विचारांची 
नको नुसते कानात डूल कपळावर चंद्र कोर   
मिळूनी सारे घडवू स्वप्नातील भारत छान 
करू विकास भारताचा 
धरु प्रगतीची आस 
तरच खऱ्या अर्थाने होईल 
   भारत माझा महान

|| भारत माता की जय ||  

   सौ. रोहिणी अमोल पराडकर 
               कोल्हापूर

शब्द

शिर्षक   शब्द 

शब्दा ने शब्द वाढतो
शब्द वाढला तर होतो वाद 
शब्द जर निःशब्द झाला. 
तर होते मौन 
शब्दात शब्द मिसळला 
तर संवाद खुलतो 
जुळला शब्द तर 
संवाद  फुलतो. 
शब्द जर ह्रदयात घुसला 
तर प्रेम जुळते
अन् शब्द जर डोक्यात घुसला 
तर नाते तुटते
शब्दाचे मोल
जपून बोल
   
      सौ. रोहिणी अमोल पराडकर 
                     फोटोग्राफर
                                                  Mrs. Rohini Amol Paradkar, Kolhapur.