Monday, April 24, 2023

Khuda Baksh Khan







A Bibliophile, a collector of rare manuscripts; initially established a Private Library in 1880. Which later in the year 1891 opened for public. He acquired 1400 rare manuscripts from his father Mohammad Bakhsh; and later added 2600 to make it one of the rarest collection of Persian, Arabic and Urdu manuscripts in the world. The library was declared an institution of National importance by the Government of India in 1969.
Impressed with his rich collection, at one occasion The British Library offered him very handsome amount to buy his collection. Which he refused by saying that “I am a poor man. The money that has been offered is a Princely fortune. But how can I ever part for money with that to which my father and I have dedicated our lives.”
He later said about book collection; “The art of collection is one that soars above and defies the provisions of the penal code.
There are three classes of blind men- those who are bereft of sight; those who (lend) valuable books even to a friend; and those who return such volumes, once they have passed into their possession”
Below is a real photograph of Khuda Bakhsh Khan
(Founder of Khuda Bakhsh Oriental Public Library - Patna Bihar, India.)


@History of Indian subcontinent

Wednesday, April 19, 2023

अतीकची अति झाली मला मान्य आहे...



अतीकची अति झाली मला मान्य आहे,
पण पोलीसांच्या ताफ्यात त्याचा खुन व्हावा
मारेकऱ्यांच्या धाडसाची अन्
सरकारच्या षंढपणाची
कमाल आहे!!
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
त्याने धरले असेल का हो
दर वेळी जनतेला बंदुकीच्या
धारेवर?
का मतदान करताना नसेल लोकांचे डोके
थाऱ्यावर??
एवढे कसले दबाव असेल हो साऱ्यांवर???
पाचवेळा त्याला निवडुन दिले
लोकांची कमाल आहे!
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
अतीक ची अती झाली मला मान्य आहे!!
एवढे गुन्हे करुन सुद्धा तो
तो निर्दोष सुटुन येतो?
एवढे धडधडीत पुरावे असताना देखील
न्यायासन त्याला सोडुन देतो??
का मग पेटी,खोके आणि मलाईची धमाल आहे??
न्यायालय,न्यायासन, न्यायधिशांची सुद्धा कमाल आहे!
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
अतीकची अती झाली मला मान्य आहे!!
पाच पाच वेळा त्याला उमेदवारी मिळते
आमदारकी,खासदारकी दिली जाते
जेलमधुन सुद्धा निवडणुक लढविली जाते
तिकीट देणाऱ्या
पक्षांची पण कमाल आहे!!
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
अतीकची अति झाली मला मान्य आहे!!
एवढ्या सराईत गुंडाला इतके काळ
पोलीसांनी सोडले कसे असेल हो वाऱ्यावर??
की मिठाईच्या पेट्या आणि नोटांच्या बॅगा
जात असतील त्यांच्या वाड्यावर??
अत्ताच अचानक कशी कर्तव्यदक्षता
जागी झाली
पोलीस प्रशासनाची कमाल आहे!
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
अतीकची अती झाली मला मान्य आहे!!!
चला अता देशाची सुटका झाली
अतीक च्या तावडीतुन!
सारीकडे शांतीची प्रस्थापना झाली
श्री रामाचे नाव घेऊन
बंदुकीच्या गोळीतुन!
पण संसेदत जे रामाचा मुखवटा धारण करुन रावण बसलेत
मग देशाला कसे सोडवणार त्यांच्या बेडीतुन???
का तुमच्या मते
सारेच स्वच्छमन,निष्कलंक,निष्पाप लोकांचेच हे सरकार आहे ???
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
का फक्त अतीकचीच अति झाली होती
हेच तुम्हाला मान्य आहे???
प्रा.डॉ.शहेजादी शेख