Thursday, August 23, 2012

Govind Vinayak Larandikar

इतिहासात आज दिनांक.. २३ ऑगस्ट १९१८

ज्ञानपीठविजेते कविवर्य गोविंद विनायक ऊर्फ विंदा करंदीकर यांचा जन्म. कवी, गद्यलेखक, अनुवादक, समीक्षक, लघुनिबंधकार या नात्याने त्यांनी साहित्यक्षेत्राला योगदान दिले. रत्नागिरी जिल्हय़ातील धालवड (ता. देवगड) या गावी त्यांचा जन्म झाला. मॅट्रिक व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. त्यांची प्राध्यापकीय कारकीर्द बागलकोट, कागल, रत्नागिरी, मुंबई या क्रमाने झाली. ‘स्वेदगंगा’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. स्वेदगंगा, मृद्गंध, धृपद, जातक, विरूपिका, अष्टदर्शने या त्यांच्या गाजलेल्या कृतींपैकी होत. त्यांनी तालचित्रे, गझल, मुक्त सुनित, विरूपिका, अभंग असे प्रयोग काव्यात केले. २००३ चा ज्ञानपीठ पुरस्कार, राज्य शासनाचे १० पुरस्कार, सीनिअर फुलब्राईट पुरस्कार, जनस्थान, सोव्हिएत लँड, जनपथ, कबीर, साहित्य अकादमी पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले. यातून मिळालेली रक्कम त्यांनी सामाजिक कार्यास, व्याख्यानमालांना, साहित्योपयोगी उपक्रमांना तात्काळ देऊन टाकली. ‘परंपरा आणि नवता’, ‘अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र’ हे करंदीकरांचे गद्यलेखन. गटेच्या ‘फाउस्ट’चा अनुवादही त्यांनी केला.


No comments:

Post a Comment