Saturday, January 18, 2014

MARATHI VEENOD

(इंजिनिअरिंगचा मुलगा एका मुलीला प्रपोज करायला जातो.)
.
मुलगा: आय लव्ह यु..
मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तू फक्त बोल..
तुझ्यासाठी काही पण...
.
.
मुलगी: बरं मग तू मला सगळे विषय ATKT शिवाय सोडवून दाखव.
.
.
मुलगा: येतो ताई... काळजी घे!




एकदा एक पैलवान नोकरी करण्यासाठी शहरात येतो,
पण शिकलेला नसल्यामुळे त्याला कोणीच नोकरी देत
नाही..
त्यामुळे त्याचे जेवणाचे वांदे होतात..
तेव्हा रस्त्यात त्याला एक केळेवाला दिसतो..
पैलवान लगेच त्याला बद्डून
३-४ डझन केळी घेउन खायला लागतो..
त्याचवेळी तिथून प्राणिसंग्रहालय ाचा मालक जात
असतो..
तो पैलवानाला बाजुला घेउन विचारतो
“अरे,
किति दिवस असा चोरुन खाणार आहेस..??
माझ्याकडे काम कर,
दिवसाचे १०० रुपये आणी पाहिज...े
तेव्हढे जेवण मिळेल..
मग पैलवान त्याच्याबरोबर zoo मध्ये जातो,
तिथे त्याला एक गोरिलाची कातडी मिळते
जी त्याला, दिवसभर पांघरुन रहायचई असते..
असाच एका दिवशी,
तो पिंजऱ्याला टेकुन उभा राहिला असताना,
पिंजऱ्याची भिंत तुटते
आणी तो सिंहाच्या पिंजऱ्यात जाउन पडतो..
त्याबरोबर,
तो “वाचवा, वाचवा” ओरडत पळु लागतो,
सिंह त्याच्या जवळ आलेला असतो,
तो
गोरिलाच्या तोंडावर हात ठेवुन म्हणतो
गप्प बैस,
नाहितर दोघांचीही नोकरी जाईल..!!


ती आणि तो.
दोघेच.
सूर्यमावळताना समुद्रकिनारी बसले होते.
शांत एकदम....
समुद्राच्या लाटांचा तेवढा आवाज येत होता.
बराच वेळ असा गेला.
मग शेवटी न राहवून तिने त्याला विचारलेच."
का रे, एवढा शांत का??
काही बोलत का नाहीस?"
त्याने काही क्षण तिच्या डोळ्यात पाहिले आणि
शांत पणे किनार्यावरच्या वाळूत लिहिले.....
"तोंडात मावा आहे".





फोन वाजला .....
फोनवरचा आवाज - हॅल्लो , तुमचा फ्रिज चालतोय का ?
जोशी - हो चालतोय , तुम्ही कोण ?
फोनवरचा आवाज - पकडून ठेवा , नाही तर पळून जाईल . ( खट् ) ....
थोड्या वेळाने पुन्हा फोन वाजतो .
फोनवरचा आवाज - हॅल्लो , फ्रिज आहे का ?
जोशी - ( चिडून ) नाहीय ... का ?
फोनवरचा आवाज - सांगितलं होतं ना .. पकडून ठेवा नाही तर पळून जाईल





चम्प्याने एकदा कोंबडी विकत घेतली..
आणि तिला एका पिंजर्यात बंद केलं..
पण कोंबडी तर जिद्दी होती..लगेच मागच्या बाजूने
निघून गेली..
चम्प्याने तिला पकडला आणि परत पिंजर्यात
टाकलं..
पण कोंबडी तर जिद्दी..परत मागच्या बाजूने निखून
गेली..
चम्प्याला आला राग..त्याने त्या कोंबडीला पकडलं
आणि कापून खाऊन टाकलं..
पण कोंबडी तर जिद्दी होती......







गण्या तिच्या वर्गातील मुलीला मिनी स्कर्ट
मध्ये पाहतो आणि विचारतो तुला आई ओरडत
नाही का?
ती मुलगी :- हो, ओरडते ना....
.
.
.
.
.
.
'.
आजच ओरडली, तिचा ड्रेस घातला म्हणून..






चम्या एका लग्नात जेवण करत होता..
झंप्या - अबे एक तास झाला..
जेवतो येस तू..
अजून किती चरशील?
चम्या - अबे मी पण परेशान झालोय..
अजून तीन तास जेवायचंय..
झंप्या - ३ तास?
चम्या - हि बघ पत्रिका..
जेवणाची वेळ...
७ ते ११






पांडू हवालदाराने चार
शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले
पाहून इन्स्पेक्टर प्रधान हतबुद्धच
झाले.
त्यांनी विचारले, ''काय रे पांडू, हा काय प्रकार?''
'' अहो,
या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार
केला.''
...
इतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्रश्न्
पडून इ.
प्रधानांनी पोरांकडे मोहरा वळवला.
पहिल्या पोराला विचारलं, ''तुझं नाव
काय
आणि हवालदारानं पकडलं तेव्हा तू नेमकं काय करत होतास
राणीच्या
बागेत?''
पोरगा निरागस चेहऱ्यानं म्हणाला, ''माझं नाव नन्या.
मी
सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकण्याचा प्रयत्न
करत होतो.''
आता
दुसरा मुलगा. ''माझं नाव मन्या.
मीही सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे
टाकायचा प्रयत्न
करत होतो.''
तिसरा मुलगा. ''माझं नाव विन्या. मी
पण
सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत
होतो.''

चौथा मुलगा स्फुंदत स्फुंदत पुढे आला आणि म्हणाला, ''माझं
नाव
शेंगदाणे!





नवरी : जानु आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तू
मला कुठे नेशील ?

नवरा : अफ्रीकन सफारीला...

नवरी : मस्तच जानु.....
आणि लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला ?
.
.
.
.
.
नवरा : मी तुला अफ्रीकेहून परत आणेन








लग्न झाल्यानंतर कालांतराने बायकोमध्ये झालेला बदल..
:
:
पहिल्या वर्षी : मी म्हणते आता जेवून घ्या... किती वेळ झाला तुम्ही काही खाल्लपण नाहीये
.
.
.
.
दुसर्या वर्षी : अहो, जेवण तयार आहे वाढू का ?
.
.
.
तिसर्या वर्षी : जेवण तयार आहे.. जेंव्हा तुमची इच्छा असेल तेंव्हा खा
.
.
.
चौथ्या वर्षी : जेवण तयार आहे, मी बाजारात जात आहे, स्वतःच्या हाताने घेऊन खून घ्या
.
.
.
पाचव्या वर्षी : आज माझ्याकडून जेवण नाही बनणार... बाहेरच काही खाऊन घ्या
.
.
.
सहाव्या वर्षी : जेंव्हा बघू तेंव्हा खाणं...खाणं...खाणं... आत्ताच तर नाष्टा हादडला





संता: अरे खुशखबर! मित्रा मला मुलगी झाली.

बंता: वा! अभिनंदन.
अरे, पण आता मुलगी झाल्यावर पंचाईत आहे.
मोठेपणी सगळी मुलं तिची छेड काढणार.
मग, तू काय करणार?

.
.

संता: त्याची आयडिया आहे माझ्याकडे. म्हणून,
माझ्या मुलीचं नाव मी'ताई'असंच ठेवलंय.






डॉक्टर ला वाटते तुम्ही आजारी पडावे....
पोलिसाला वाटते तुम्ही काही तरी गुन्हा करावा....

वकीलाला वाटते तुम्ही कुठेतरी कधीतरी कसतरी कायद्याच्या कचाट्यात अडकावे....

शिक्षकांना वाटते तुम्ही अडाणीच जन्माला यावे....

अंतयात्रेचे सामान विकणार्याला वाटते तुम्ही मरावे....

फक्त आणि फक्त एका चोरालाच वाटते की तुम्ही खूप खूप श्रीमंत व्हावे.






एखाद्या घनदाट अरण्यात वाट चुकावी. आणि...
विश्रांतीसाठी म्हणून एखाद्या झाडाखाली बसावं. समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड उचलावा. दगडाखालून साप निघावा....
त्याने आपला पाठलाग करावा. पळताना ठेच लागून विहीरीत पडावं. विहीरीत मोठी मगर असावी... तिने वेग घेण्यापूर्वी, एखाद्या फांदीचा वेध घ्यावा. वर येण्याचा प्रयत्न करावा....
वरती भुकेला वाघ असावा. त्याच्या भीतीने फांदीचा हात सुटावा. फांदीवरील मधमाशांनी भडका करावा....

आणि.......

अशा अवस्थेत मधाच्या पोळ्यातून पडणारा, मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.......
यालाच ' वैवाहिक जीवन' म्हणतात.







एकदा शाळेत बाई (teacher) नवीन आलेली असते
ती मुलांना विचारते कि तुमच नाव
आणि छंद सांगा

1 मुलगा - माझ नाव गण्या ।
मला चंद्राला पाहायला आवडते ।।

२ मुलगा - माझ नाव राजू ।
मला चंद्राला पाहायला आवडते ।।

३ मुलगा - माझ नाव किरण ।
मला चंद्राला पाहायला आवडते ।।

•सगळ्यांची नावे वेगळी पण छंद
एक•

बाई (Teacher)आश्चर्यचकित होते आता मुलीँनी नाव सांगा

१ मुलगी - माझ नाव चंद्रा
Like ·  · Shar

No comments:

Post a Comment