Saturday, January 6, 2024

मौलाना अबुल कलाम आझाद



व्हाईसरॉय हिंद मौलाना अबुल कलाम आझाद साहेबांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला येतात.
मौलाना आझाद यांच्यासोबत एक अनुवादक बसलेला असतो. व्हॉईसरॉय जे काही बोलतात ते अनुवादक भाषांतर करून मौलाना आझाद यांना सांगतात. त्यानंतर, मौलाना आझाद जे काही बोलतात त्याचे भाषांतर करून व्हाईसरॉयला सांगतात.
त्याचे असे झाले की अनुवादकाला काही अनुवाद दुरुस्त करता आला नाही, म्हणून मौलाना आझाद यांनी त्याची चूक सुधारली आणि म्हणाले, असे बोल.
बैठक संपल्यावर व्हाईसरॉय मौलाना आझाद यांना म्हणाले, जर तुम्हाला इंग्रजी येत असेल तर तुमच्यासोबत अनुवादक का ठेवला?
मौलाना अबुल कलाम आझाद साहेब म्हणाले.
"पाच हजार मैल आले तरी तूम्ही तुमची भाषा सोडली नाही, घरी बसून मी माझी कशी सोडू?"







No comments:

Post a Comment