A message in its most general meaning is an object of communication. It is something which provides information or message; it can also be this information or message itself.
Saturday, March 23, 2024
भगतसिंह
फाशीच्या एक दिवस आधी म्हणजे २२ मार्च १९३१ ला आपल्या जवळच्या मित्रांना भगतसिंह ह्यांनी लिहिलेलं हे पत्र दुर्दम्य आशावाद आहे ह्या पत्रात मृत्यूलाही आव्हान होती ही माणसं...
जिवंत राहण्याची महत्त्वाकांक्षा नैसर्गिकरित्या माझ्यातही असायला हवी मी ती लपवू इच्छित नाही पण माझं जिवंत राहणं सशर्त आहे मी अटक होऊन किंवा जखडून जिवंत राहू इच्छित नाही...
माझं नाव हिंदुस्तानी इंकलाबी पार्टीचं मध्यवर्ती निशाण बनलं आहे आणि इन्कलाब पसंद पार्टीचे आदर्श आणि बलीदानांनी मला प्रचंड उंचीवर नेलंय एवढ्या उंचीवर की जिवंत राहून मी ह्याहून उन्नत कदापी होऊ शकणार नाही...
आज माझ्या कमजोरी लोकांसमोर नाहीत जर मी फाशी पासून स्वतःला वाचवलं तर मात्र त्या जगजाहीर होतील आणि इन्कलाबचं निशाण निस्तेज पडेल किंवा कायमचं नष्टही होईल परंतु माझी टेचात निर्भयपणे हसत हसत फाशीपर्यंत जाण्याची उमंग पाहून हिंदुस्तानी माता स्वतःच्या पोटच्या गोळ्यात भगतसिंह पाहतील आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची संख्या एवढी टिपेला पोहोचेल की इन्कलाब थांबवणं साम्राज्यवाद्यांच्या सर्वतोपरी प्रयत्नांच्याही हातात राहणार नाही...
होय, एक विचार मात्र आजही (मनाला) चुटपुट लावून जातो देश आणि मानवतेसाठी ज्या काही तीव्र इच्छा माझ्या मनात होत्या त्याचा हजारावा हिस्साही मी पूर्ण करू शकलो नाही जर जिवंत राहू शकलो असतो तर बहुतेक त्यांना पूर्ण करण्याची संधी मला मिळाली असती आणि त्या इच्छा मी पूर्ण करू शकलो असतो...
ह्या शिवाय कोणतंही लालूच माझ्या मनात फाशीपासून वाचून राहण्यासाठी कधी आलंच नाही माझ्यापेक्षा जास्त सौभाग्यशाली कोण असेल ? मला अश्यात स्वतःचा प्रचंड अभिमान वाटतो आताश्या प्रचंड अधीरतेनं शेवटच्या परीक्षेची मी वाट बघतोय इच्छा आहे ती अजून जवळ यावी...
―――――――――
#भगतसिंह
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment