Monday, June 2, 2025

हा कॅमेरा सापडला तर ?



१९५३ साली एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्के यांनी एव्हरेस्ट सर केले.ओपण फार पूर्वी म्हणजे १९२४ साली ब्रिटिश गिर्यारोहक जॉर्ज मॅलोरी आणि अँड्र्यू आयर्विन यांनी माउंट एव्हरेस्ट वर चढाई केली होती. दुर्दैवाने या मोहिमे दरम्यान हिमवादळात सापडून त्यांचा मृत्यू झाला.नोंदीनुसार या चढाईवर जाण्यापूर्वी जॉर्जने सोबत कॅमेरा सुद्धा नेला होता.जगाच्या दृष्टीने एव्हरेस्ट काबीज करणारा पहिला वीर एडमंड हिलरी असला तरी जॉर्जचा कॅमेरा सापडला तर कदाचित हिलरीचा क्रमांक दुसरा ठरू शकतो.कॅमेरामध्ये एव्हरेस्टच्या शिखरावरून घेतलेले फोटो मिळू शकतात.१९९९ मध्ये जॉर्ज मॅलोरीचे मृत शरीर सापडले पण त्याचा कॅमेरा सापडला नाही. कदाचित कॅमेरा आयर्विनसोबत असू शकतो पण आयर्विनचा मृतदेह अद्याप सापडला नाही.एव्हरेस्ट काबीज करणारा पहिला वीर कोण याचे गूढ अद्यापही कायम आहे आणि त्या एका कॅमेराच्या माध्यमातून ते समजू शकते म्हणून तो कॅमेरा आता अत्यंत मूल्यवान ठरला आहे.सोबतच्या फोटोत डावीकडून चौथा-जॉर्ज मॅलोरी











No comments:

Post a Comment