Wednesday, March 28, 2012

AKOLE, NAGAR

माझी अकोले नगरी


प्रवरेच्या तीरी माझी अकोले नगरी
नदीकिनारी अगस्तीच्या भक्त येती दरबारी


गंगाधर, सिद्धेश्वर मंदिर हि हेमाडपंती
दगडावर कोरलेली शिल्प पहा खुणावती


तीरावरी अलीकडे स्वामी समर्थांचा मठ
चाले जप-ताप तेथे ध्यानधारणा नित्यपाठ


प्रवरा हि मातृस्थानी सकळांचे तीर्थक्षेत्र
पिण्याला ती देते पाणी फुलविते ऊसक्षेत्र


गांधी, फुले, शिवजीनामे कितीतरी चौक
वाकडेतिकडे, उभे आडवे गल्ली बोळ कितीएक


पडके वाडे, घरे कौलारू, नगारखाना इमारत
चिरेबंदीच्या जुन्या खुणा अजूनही दिसतात


जुने गाव बदलले, चळवळीचा नाही जोम
साम्यवादी सूर हरवला, सर्वस्वाचा नाही होम


आधुनिकतेचे वारे वाहू लागले जोरात
अभ्यासाने कूस बदलली धडे गिरविती जोशात




Nandkumar Rasane ( Akole, Dist. Nagar )
  




     

No comments:

Post a Comment