Sunday, June 13, 2021

सडेतोड पु. ल. देशपांडे

स्वातंत्र्याचे एवढे यज्ञकुंड पेटलेले असताना हिंदुत्ववादी मंडळी कुठल्यातरी ऐतिहासिक जमान्यातल्या लुटूपुटूच्या युद्ध-कल्पनांत दंग होती. ब्रिटिशांविरुद्ध "ब्र' नव्हता. सारी शक्ती आणि बौद्धिके फक्त गांधी द्वेषाने भरलेली.
● *काही आसपासची वयोवृद्ध मंडळीही 'काय म्हणतोय तुझा तो गांधी' असं विचारून 'एकूण सगळा पोरखेळ चाललाय' असा शेरा मारून आम्हाला डिवचून जायचे.
● हिंदुत्ववाल्यांपैकी बहुतेकांचा 'आपण टिळक संप्रदायातले आहोत' असाही गैरसमज होता.
*गांधींच्या चळवळीतले सामर्थ्यच त्यांच्या लक्षात येत नसे.
● *गांधींचा मुसलमान धाजिर्णेपणा हे त्यांचे एकमेव पालुपद. गोऱ्या सार्जटांनी किंवा सोजिरांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधापेक्षा, मुसलमान गुंडांनी केलेल्या बलात्काराच्या वेळी त्यांच्या वाणीला आणि लेखणीला जोर चढे!
● *हिंदू-मुसलमानांच्या दंग्यात कधी ही मंडळी त्या मोहल्ल्यात जाऊन दहशत बसवून आली म्हणावं, तर तेही नव्हतं.
● हिंदू-मुसलमानांच्या दंग्यात मुंबईत आमचे कोकणी रामा आणि गिरणमजूर गुंडांची टाळकी सडकायला बाहेर पडत. सोडावॉटरच्या बाटल्यांची 'फ्री फाईट' होई. तिथे सरळ 'तू माझे डोके फोडतो की मी तुझे ते बघू या' हा कायदा होता.
● *पण हे हिंदूधर्मरक्षक मात्र हवेत लाठी फिरवून गनिमांची टाळकी फोडण्याची दिवास्वप्ने पाहत होते.*
● *मुंबईत दंगा उसळला होता. पार्ल्यात एखादा बत्तीवाला किंवा छत्रीदुरुस्तीवाला आणि काचवाला बोहरी वगळला तर मुसलमानांचा संबंध नव्हता. पण इथे 'आत्मरक्षणा'साठी हिंदू मंडळींनी गस्त सुरू केली.* 
● *सगळे डॉन क्विक्झोटचे भाऊ! उगीचच रात्री-अपरात्री लाठ्या आपटीत हिंडायचे. गनीमांशी लढायला मोक्याच्या जागी मोर्चे बांधावे लागतात म्हणून बंगल्याच्या गच्यांवरून पहारा !* 
● आम्ही मित्रमंडळी कसलातरी कार्यक्रम आटपून रात्री परतत होतो. जोरजोरात गप्पागोष्टी करीत येत होतो.
● *इतक्यात गच्चीवरून हिंदुत्वरक्षकाची आरोळी आली, 'शत्रू की मित्र ?'*
*आम्ही ओरडलो 'शत्रू !'*
आता वर पेच पडला होता, 'शत्रू' असा प्रतिवाद आला आहे, आता पुढे काय करायचे.
दोन-चार मिनिटे बालेकिल्ल्यात स्तब्धता होती.
पुन्हा आम्ही ओरडलो, 'शत्रू!'
*वरून आवाज आला... 'जाss'*

*- पु. ल. देशपांडे*
खिल्ली /
एका गांधी टोपीचा प्रवास /

पान क्रमांक - ५,६

No comments:

Post a Comment