ऊर्दूअर्बी अक्षर असलेलं क्यालेंडर भिंतीवर नको. म्हणून मराठी अंकअक्षरांच क्यालेंडर तंबाकूच्या खर्चात मागविणारी गल्लीमावशी
मदिनाखाला.
 कित्ती आजारातून आपण वाचलो म्हंजे
कित्ती आजारातून आपण वाचलो म्हंजे "मजे क्याच हुया नै,मेरे बच्चे ने हकीका कऱ्याता म्हणत सध्या खोकत बोलणारी शेंबडी
हुजराबी.
 थंडीधुक्याच्या तुरळक चौकात पिऊन पडणाऱ्या दिल्याला (दिलावरला) वटवट करत घरकु फरफटत नेणारी दांडगी
थंडीधुक्याच्या तुरळक चौकात पिऊन पडणाऱ्या दिल्याला (दिलावरला) वटवट करत घरकु फरफटत नेणारी दांडगी रूक्सार,
( रूक्मा म्हणत्यात तिला सगळे)
 आरश्यासारखं घरं लख्ख करून फुल्ल पदर डोक्यावरून घेत,कट्ट्यावर बसून पानपट्टी चालवणारी लंगडी ममताजबै.
आरश्यासारखं घरं लख्ख करून फुल्ल पदर डोक्यावरून घेत,कट्ट्यावर बसून पानपट्टी चालवणारी लंगडी ममताजबै. नवऱ्यामुलांना घाबरून बुरखा पांघरूण वरच्या मजल्यावरूनच गल्ली पाहणारी
नवऱ्यामुलांना घाबरून बुरखा पांघरूण वरच्या मजल्यावरूनच गल्ली पाहणारी डरकी प्यारनबू.
या सगळ्यांसारखं नै जगायचं म्हणून
खानावळीत चपात्या लाटून,समीनाला शिकवणारी राहतभाभी.
अशा सगळ्याजनी आपल्याच जगण्याच्या झग्ड्यात जगताहेत आसपास समोर जवळ इथंच..
या सगळ्यांच्या कित्तीतरी पुढं,आधीच पोहचली होती फातिमां.
काळ बदललाय,उलटचक्री फिरवताना त्या काळातल्या समजेसमोर नतमस्तक व्हावं
एवढंच उरत माझ्यासारख्याच्या समोर.
मी समजेचा परीघ वाढवत येसूदास च्या आवाजात ऐकत राहतो गाणं.
मधुबन खुशबू देता है...
#धीरेधीरेसबसुधरे

 साहिल कबीर
साहिल कबीर
No comments:
Post a Comment