मी साधारण ९ वर्षा चा असेन. एकदा माझ्या वडिलांच्या जवळच्या मित्राचे निधन झाले. त्या वेळी माझ्या वडिलांनी मला जबरदस्तीने त्यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी स्मशानभूमीत नेले. मी तर त्यांच्या मित्राला ओळखत देखील नव्हतो.
ज्या वेळी मी स्मशानभूमीत गेलो त्या वेळी सर्व कार्य चालू असताना एका कोपऱ्यात उभा राहिलो व होणारे विधी पहात राहिलो. तेवढ्यात एक जण माझ्या कडे आला व म्हणाला बाळा कायम सुखी राहण्याचा प्रयत्न कर, आनंदात आयुष्य जगून घे. माझ्याकडे बघ. माझ्याकडे सर्व साधने असताना सुद्धा मी आयुष्याचा उपभोग घेऊ शकलो नाही. एवढे बोलून माझ्या डोक्यावरून हात फिरवून तो निघून गेला.
थोड्यावेळाने माझ्या वडिलांनी मला पार्थिवाला नमस्कार करण्यास बोलविले. मी नमस्कार करताना पार्थिवाच्या चेहेऱ्याकडे बघितले व हादरलोच.... अरे हा तर तोच माणूस होता जो थोड्यावेळापूर्वी माझ्याशी बोलत होता.
या घटनेचा माझ्यावर भयंकर परिणाम झाला. मी त्या नंतर कित्येक वर्षे नीट झोपू शकलो नाही. बऱ्याच वेळा रात्री दचकून उठत असे. मला मानसिक त्रास सुरू झाला व बरीच वर्षे त्यावर उपाय सुरु होते. मला रात्री एकटे व दिवे बंद करून झोपायला भीती वाटत असे. माझ्या उमेदीची बरीच वर्षे यात निघुन गेली.
कित्येक वर्षांनी एक विस्मयकारक घटना अशी कळली की ज्याने माझे आयुष्यच बदलले
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्या माणसाला एक जुळा भाऊ होता.
आयचा घो त्या भावाच्या...
No comments:
Post a Comment