Friday, February 11, 2022

विचारार्थ!


 लेखिका: कात्यायनी (हिंदी कवयित्री)
मूळ हिंदी लेखाची लिंक https://www.facebook.com/katyayani.lko/posts/4985444128213250
अनुवाद: जयवर्धन
कर्नाटकातील मांड्या प्री-यूनिवर्सिटी कॉलेजमध्ये हिजाब घालून जात असलेल्या एका मुलीला लांडग्यांच्या आणि जंगली कुत्र्यांच्या जमावाप्रमाणे भगवा दुपट्टा गुंडाळून जे गुंड घेराव घालून जय श्रीराम च्या घोषणा देत आहेत त्या चेहऱ्यांना ओळखा! हे आजच्या भारतातील ओळखीचे चेहरे आहेत: खुनी-उन्मादी चेहरे! त्यांचे चेहरे अगदी बर्लिनमध्ये ज्यू लोकांच्या घरांवर हल्ला करणाऱ्या, आग लावणाऱ्या आणि मॉब लिंचींग करणाऱ्या हिटलरच्या नाझी पार्टीच्या एस.ए. व एस. एस. तुकड्यांच्या गुंडांसारखेच आहेत!
ह्याच जमावाने पहलू खान, जुनेद आणि अखलाख सारख्या कित्येक निर्दोष लोकांचा रस्त्यावर पाठलाग करत खून केला होता. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेशचे हत्यारे सुद्धा हेच होते! बागेत प्रेमीयुगुलांचा पाठलाग करणारे आणि रेस्टॉरंट्स मधून त्यांना हाकलून लावणारे जंगली हेच आहेत! ओडिसा मध्ये निर्दोष मुलींसहित पादऱ्याच्या संपूर्ण परिवाराला यांनीच जाळले होते! अयोध्यामध्ये 1992 साली बाबरी मशिद पाडण्यासाठी अशाच उन्मादींचा जमाव गोळा केला गेला होता आणि 2002 साली गुजरातमध्ये लूट, जाळपोळ, नरसंहार आणि सामूहिक बलात्कार करणारे तसेच गर्भवती महिलांचे पोट फाडून अर्भकांना त्रिशुलच्या टोकावर उचलणारे हेच होते! एवढेच नाही देशामध्ये रोज जिथे-तिथे दलितांवर अन्याय अत्याचार करणारे सुद्धा हेच चेहरे आहेत.
हे रुग्ण चेहरे व्यवस्थेच्या माराने निराश झालेल्या युवकांचा जमाव आहे ज्याच्यासमोर वित्तीय भांडवलाच्या सर्वात प्रतिक्रियावादी प्रतिनिधींनी एका काल्पनिक शत्रूला उभे करून सांगितले आहे की त्याच्या सर्व समस्यांचे मूळ तो शत्रू आहे. हा काल्पनिक शत्रू मुसलमान आहे, नंतर ख्रिश्चन आहेत, नास्तिक आहेत, कम्युनिस्ट आहेत आणि सनातन धर्माच्या चातुर्वर्ण्याला न मानणारे दलित आहेत आणि या सर्वांच्या बाजूने बोलणारे लोकशाही चेतना असलेले बुद्धीजीवी आहेत. हा पूर्णपणे एका 'खोट्या चेतनेच्या' जकडीत सापडलेला पशुसमान जमाव आहे ज्याच्या कडून कुठलेही बिभत्स काम करून घेतले जाऊ शकते. त्यांना विचारांशी, इतिहासाच्या तथ्यांशी काहीही देणे-घेणे नाही! इथपर्यंत की स्वतःच्या आपल्या धर्माचे सुद्धा एकपण पुस्तक त्यांनी वाचलेले नसते! धर्म आणि इतिहासाच्या संबंधात ते तेवढेच जाणतात जेवढे संघाच्या शाखेपासून तर व्हाट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना शिकविले जाते. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेसारख्या शब्दांशी त्यांना घृणा आहे आणि त्याला धर्माच्या विरोधात समजतात. या पिवळट-रुग्ण चेहऱ्यांच्या आणि घृणीत नजरेच्या पशुसमान जमावाच्या मागे जे निती-निर्माते, बुद्धिजीवी आणि शिक्षक बसले आहेत ते गुळगुळीट चेहऱ्यांचे फॅसिस्ट युद्ध विशारद आहेत आणि त्यांच्या मागे थंड डोक्याचे राजकारणी आणि भांडवलाचे सिद्धांतकार आणि थिंक टॅन्क्स आहेत. त्यामुळेच इतिहासाची वैज्ञानिक समजदारी असलेले लोक मानतात की फॅसिझम वित्तीय भांडवल आणि एकाधिकारी भांडवलाचे सर्वात प्रतिक्रियावादी (आणि आजच्या काळात भांडवलाचे सर्व छोटे मोठे भाग जवळपास समान रूपाने प्रतिक्रियावादी झालेले आहेत) रूप आहे आणि त्याच्या शक्तीचा मुळ स्त्रोत तृणमूल स्तरापासून संघटित अशा निम्नभांडवलदार वर्गाचे अत्यंत घनघोर प्रतिक्रियावादी सामाजिक आंदोलन आहे. या टोकाच्या प्रतिक्रियावादी सामाजिक आंदोलनाचा सामना केवळ आणि केवळ तृणमूल स्तरापासून कामगारवर्ग आणि संपूर्ण कामकरी लोकसंख्येचे व मध्यमवर्गाच्या रॅडिकल गटाचे सामाजिक आंदोलन संघटित करूनच केला जाऊ शकतो!
गेल्या 35 वर्षांवर जर आपण नजर टाकली तर एक गोष्ट स्पष्ट होते की शांती-आंदोलने, मेणबत्ती आंदोलने, निवेदने-अहवालांनी या रक्तपिपासू शक्तींचा प्रतिकार केला जाऊ शकत नाही! सर्वधर्म-समभावच नव्हे तर भांडवली धर्मनिरपेक्षतेचे हत्यार सुद्धा यांच्या विरोधात कामी येऊ शकत नाही! निवडणुकीत त्यांच्या पक्षाला हरवून सुद्धा त्यांचे निर्मूलन केले जाऊ शकत नाही. सत्तेत नसताना सुद्धा ते त्यांच्या विघातक कार्यात लागलेले राहतील आणि ज्याअर्थी भांडवली समाजाच्या संकटांच्या कहरापासून सामान्य जनतेला कुठलाच भांडवली किंवा संसदीय डावा पक्ष मुक्ती देऊ शकत नाही, त्यामुळे उन्माद आणि लोकरंजकतावादाच्या सहाय्याने हे इतिहास-द्रोही फॅसिस्ट परत-परत सत्तेत येत राहतील आणि गल्ल्यांमध्ये, रस्त्यांवर मानवी रक्त आणि दहशतीचा पूर येत राहील. जे भांडवली पक्ष आज यांच्या विरोधात आहेत ते उद्या यांच्यासोबतच युती करतात आणि या बाबतीत इतिहासामध्ये नेहमीच सर्वात वाईट चरित्र विविध प्रकारच्या सोशल डेमोक्रॅट्सचे राहिले आहे. एका लांब ऐतिहासिक कालखंडाचा विचार करता फॅसिझम विरोधातील लढाई वास्तवात भांडवलशाही विरोधातील लढाईचा एक भाग आहे आणि भलेही कितीही उशीर झाला असेल, भलेही आपण कितीही मागे पडलो असू, या झोंबींच्याविरुद्ध दीर्घकालिक 'पोजीशनल वार' ची तयारी आपल्याला याच रूपात करावी लागेल! आपल्यालासुद्धा वस्त्या मोहल्ल्यांमध्ये सामाजिक आंदोलनाच्या स्तंभाच्या रूपात संस्था आणि जनसमुदायांचे विविध मंच बनवावे लागतील आणि त्या दिवसाची तयारी करावी लागेल जेव्हा खूनी फॅसिस्ट जमावाला युवा श्रमिकांची तुकडी रस्त्यावर धडा शिकवेल. जर बसल्या बसल्या विचार करत राहिलो तर हे लक्ष दूरचेच बनून राहील. व्यावहारिक आशावादी तोच असतो जो काहीतरी करतो. कुंठीतावस्थेच्या काळात इतिहास काही दिवसांच्या कामांना दशकांमध्ये किंवा कधी कधी तर शतकांमध्ये पूर्ण करतो! आणि नंतर तो कालखंड येतो जेव्हा तो दशकांच्या कामाला काही दिवसांमध्ये पूर्णत्वास नेतो. इतिहासाची द्वंद्वात्मक गती अशीच असते!
आमचे हे स्पष्ट म्हणणे आहे की कुठलाही अल्पसंख्याक धार्मिक समुदाय बहुसंख्याक धार्मिक कट्टरतावादाचा सामना धर्माच्या झेंड्याखाली संघटित होऊन करू शकत नाही. त्याला लढाऊ धर्मनिरपेक्षतेच्या झेंड्याखाली संघटित व्हावे लागेल आणि या गोष्टीला समजावे लागेल की धर्मनिरपेक्षतेचा अर्थ धार्मिक आस्थेला सोडणे किंवा नास्तिक होणे नसतो. धर्मनिरपेक्षतेचा विचार प्रत्येक व्यक्तीच्या धार्मिकतेला किंवा अधार्मिकतेला मानण्याची पूर्ण हमी देतो आणि केवळ सामाजिक-राजकीय सार्वजनिक जीवनापासून धर्माला दूर ठेवण्याची गोष्ट करतो. जेव्हापण सार्वजनिक जीवनामध्ये धर्माचा प्रवेश होईल तेव्हा धार्मिक अल्पसंख्यांकांना दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून वागवले जाईल. धार्मिक अल्पसंख्यांकांचा धार्मिक कट्टरतावाद बहुसंख्याकांच्या धार्मिक कट्टरतावादाला मजबूत तर करतोच, पण सर्वसाधारणपणे धर्माच्या झेंड्याखाली सुद्धा जर धार्मिक अल्पसंख्यांक संघटित झाले तर अन्य धर्मांचे सामान्य लोक आणि धर्मनिरपेक्षता मानणारे लोक स्वतःला वेगळे करून घेतील आणि बहुसंख्यावादी धार्मिक कट्टरतावादाविरुद्ध संघर्षांमध्ये ते कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.
काही गोष्टी स्पष्ट केल्या गेल्या पाहिजेत! इथे हा प्रश्नच नाहीये की आम्ही किंवा तुम्ही हिजाब घालता किंवा नाही अथवा त्याला योग्य मानतात किंवा चुकीचे! जर कुठल्याही नागरिकावर राज्यसत्ता, धर्मगुरू किंवा आई-वडिलांद्वारे पोशाख सक्तीने थोपवला गेला नसेल तर पोशाखाचा प्रश्न पूर्णपणे एक व्यक्तिगत मामला आहे आणि आपण सक्तीने थोपवल्या जाण्याचा सुद्धा तेव्हापर्यंत विरोध करू शकत नाही जोपर्यंत त्याचे स्पष्ट पुरावे नाहीत आणि ज्याच्यावर थोपवल्या गेले आहे तेच त्याचा विरोध करत नसतील! कर्नाटकातील त्या मुलीच्या हिजाब घालण्यावर गुंडांनी नव्हे तर कायदा किंवा सरकारने सुद्धा बंदी लावली असती तर ते तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याचे उल्लंघन असते आणि ते तेवढेच चुकीचे असते. काही "शांतीप्रेमी" "भलेमाणसांचे" हेसुद्धा म्हणणे होते की त्या मुलीने 'अल्लाहू अकबर' ऐवजी 'जय भारत' बोलायला पाहिजे होते. असे सुचवणे म्हणजे सल्ल्याच्या आडून देशभक्ती थोपवण्याचा धूर्त प्रयत्न तर आहेच सोबतच त्या गुंडांसमोर आत्मसमर्पणाचा भ्याड सल्ला सुद्धा आहे. तुम्ही 'अल्लाहू अकबर' घोषणेशी सहमत असाल किंवा असहमत, परंतु जर 'जय श्रीराम' चा नारा चुकीचा किंवा असंवैधानिक नाहीये तर 'अल्लाहू अकबर' चा कसा काय? काय हे प्रकारांतराने कुण्या मुसलमानाकडून देशभक्तीचे सर्टिफिकेट मागण्यासारखे आणि संघींच्या ह्या तर्काला स्वीकार करण्यासारखेच नाही का की ते "देशभक्त" मुसलमानांच्या विरोधात नाहीयेत? आणि नंतर त्यांची पुढची गोष्ट ही असते की वास्तवात मुसलमान देशभक्त असतातच फार कमी! जर कोणी मुसलमान देशभक्त असेल तर तो वंदे मातरम बोलून आणि गाऊन याचा पुरावा देईल! हेच फॅसिझम चे लॉजिक आहे! धार्मिक बहुसंख्यांकांच्या बाजूने एक खोटा बौद्धिक जमाव देशभक्तीची एक कसोटी बनवतो आणि नंतर रस्त्यावर कोणीही गुंड किंवा गाढव-डुक्कर उभा राहून लाठी घेऊन धार्मिक अल्पसंख्यांक समुदायातील कोण्या व्यक्तीला देशभक्त असण्याचा पुरावा मागू लागतो! शेवटी एखाद्या मुसलमानाला हा हक्क का नाही की जय श्रीराम चा नारा लावणाऱ्या लोकांमध्ये तोसुद्धा 'अल्लाहू अकबर' चा नारा लावेल? अजब दुटप्पीपणा आहे हा!
हिजाब च्या मुद्द्यावर हिंदुत्ववादी गुंडांची गुंडशाही संपूर्ण कर्नाटकात पसरली आहे. पोलिस कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची फक्त औपचारिकता तशीच करत आहेत जशी भाजपशासित राज्यांमध्ये केली जाते! आत्तापर्यंत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी, मोदींनी, शाह किंवा योगीने किंवा कुठल्याच भाजपच्या नेत्याने किंवा संघाच्या कुठल्याच नेत्याने या गुंडशाही वर एकही शब्द बोललेलं नाही. या गुंड जमावाच्या मागे संघ आणि भाजपच नव्हे तर राज्यसत्तेची संपूर्ण मशिनरी नग्नतेने उभी आहे. त्याचा एक उद्देश्य हा तर आहेच की पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे अनेक प्रयत्न निष्प्रभ झाल्यानंतर आता अजून एक प्रयत्न करून बघितला जावा.
जयवर्धन मंढे









कर्नाटक के मांड्या प्री-यूनिवर्सिटी कॉलेज में हिजाब पहनकर जा रही एक अकेली लड़की को भेड़ियों और जंगली कुत्तों के झुण्ड की तरह भगवा गमछा लपेटे जो वहशी गुण्डे घेरकर 'जय श्रीराम' का नारा लगा रहे हैं, उन चेहरों को पहचानिए ! ये आज के भारत के परिचित चेहरे हैं : ख़ूनी, उन्मादी फ़ासिस्ट चेहरे ! इनके चेहरे हूबहू बर्लिन में यहूदियों के घरों पर हमले करते, आग लगाते और माब लिंचिंग करते हिटलर की नात्सी पार्टी के एस.ए. और एस.एस. के दस्तों के गुंडों जैसे ही हैं!
यही गिरोह था जिसने पहलू खान, जुनैद और अखलाक़ जैसे कई बेगुनाहों को सड़कों पर दौड़ाकर मौत के घाट उतारा था I दाभोलकर, पानसारे और गौरी लंकेश के हत्यारे यही थे ! पार्कों में प्रेमी जोड़ों का पीछा करने वाले और रेस्टोरेंट्स से उन्हें खदेड़ने वाले जंगली यही हैं ! उड़ीसा में मासूम बच्चियों सहित पादरी के पूरे परिवार को इन्होने ही जलाया था ! अयोध्या में 1992 में बाबरी मस्जिद गिराने के लिए ऐसे ही उन्मादियों की भीड़ जुटाई गयी थी और 2002 में गुजरात में लूटपाट, आगजनी, नरसंहार और सामूहिक बलात्कार करने वाले तथा गर्भवती स्त्रियों के पेट फाड़कर गर्भस्थ शिशुओं को त्रिशूल की नोक पर टाँगकर घुमाने वाले भी यही थे ! यही नहीं, देश भर में हर रोज़ यहाँ या वहाँ दलितों पर जो ज़ुल्म हो रहे हैं, उन्हें अंजाम देने वाले भी यही हैं !
यह पीले- बीमार चेहरे और फटी-फटी आँखों वाले, व्यवस्था की मार से निराश-पस्त युवाओं की वह आबादी है जिसे वित्तीय पूँजी के सबसे प्रतिक्रियावादी प्रतिनिधियों और उनके बौद्धिकों ने एक काल्पनिक शत्रु को इसके सामने खड़ा करके बता दिया है कि उनकी सारी समस्या की जड़ वही है ! यह काल्पनिक शत्रु मुसलमान है, फिर ईसाई हैं, नास्तिक हैं, कम्युनिस्ट हैं, और फिर सनातन धर्म की रीढ़ -- चातुर्वर्ण्य को न मानने वाले दलित हैं और इन सबके पक्ष में बोलने वाले जनवादी चेतना के बौद्धिक हैं ! ये पूरी तरह से एक "मिथ्या चेतना" की गिरफ़्त में जकड़ी पशुवत भीड़ है, जिससे कोई जघन्यतम, वीभत्सतम काम करवाया जा सकता है ! इन्हें विचारों से, इतिहास के तथ्यों से कोई मतलब नहीं ! यहाँ तक कि अपने धर्म की भी इन्होने एक भी पुस्तक नहीं पढ़ी होती है ! धर्म और इतिहास के बारे में ये बस वही जानते हैं जो शाखा से लेकर व्हाट्सअप यूनिवर्सिटी तक में इन्हें घुट्टी में पिलाई गयी है ! लोकतंत्र और सेकुलरिज्म जैसे शब्दों से ये रोम-रोम से नफ़रत करते हैं और इन्हें धर्म के ख़िलाफ़ समझते हैं ! पीले- बीमार चेहरों और फटी-वहशी आँखों वाली इस पशुवत भीड़ के पीछे जो नीति-निर्माता, प्रचारक और शिक्षक बैठे हैं, वे चिकने चेहरों वाले फासिस्ट युद्ध-विशारद हैं और उनके पीछे ठन्डे राजनीतिक और पूँजी के सिद्धांतकार और थिंक टैंक्स हैं ! इसीलिये इतिहास की वैज्ञानिक समझ से लैस लोग मानते हैं कि फासिज्म वित्तीय पूँजी और इजारेदार पूँजी के सबसे प्रतिक्रियावादी रूप ( और आज के युग में पूँजी के सभी छोटे-बड़े धड़े कमोबेश समान रूप से प्रतिक्रियावादी हो चुके हैं) की नुमाइंदगी करता है और इसकी शक्ति का मूल स्रोत यह है कि यह तृणमूल स्तर से संगठित निम्न-पूँजीपति वर्ग का घनघोरतम प्रतिक्रियावादी सामाजिक आन्दोलन है ! इस धुर-प्रतिक्रियावादी सामाजिक आन्दोलन का मुकाबला सिर्फ़ और सिर्फ़, तृणमूल स्तर से मज़दूर वर्ग और समूची मेहनतक़श आबादी तथा मध्य वर्ग के रेडिकल हिस्से का जुझारू सामाजिक आन्दोलन संगठित करके ही किया जा सकता है !
पिछले पैंतीस वर्षों पर ही अगर निगाह डालें तो यह बात साफ़ हो जाती है कि शान्ति-प्रदर्शनों, मोमबत्ती जुलूसों, ज्ञापनों-प्रतिवेदनों से इस पैशाचिक रक्तपायी शक्ति का मुकाबला नहीं किया जा सकता ! सर्व-धर्म-सद्भाव ही नहीं, बुर्जुआ सेकुलरिज्म के हथियार भी इनके ख़िलाफ़ काम नहीं आने वाले ! चुनाव में फासिस्टों की चुनावी पार्टी को हराकर भी इनका निर्मूलन नहीं किया जा सकता ! सत्ता में न रहते हुए भी ये अपनी दुष्टता में लगे रहेंगे और चूँकि बुर्जुआ समाज के संकटों के कहर से आम जनता को कोई भी बुर्जुआ या संसदीय वामपंथी पार्टी निजात नहीं दिला सकती, इसलिए उन्माद और लोकरंजकतावाद के सहारे ये खूनी इतिहास-द्रोही फासिस्ट फिर-फिर सत्ता में आते रहेंगे और गलियों में, सड़कों पर इंसानी लहू और आतंक की बाढ़ आती रहेगी ! जो बुर्जुआ दल आज इनके विरोध में हैं, कल इन्हींके साथ मोर्चा बना लेते हैं और इस मामले में इतिहास में हमेशा सबसे अधिक घिनौना चरित्र किसिम-किसिम के सोशल डेमोक्रेट्स का रहा है ! एक लम्बे ऐतिहासिक कालखण्ड की अगर बात करें तो फासिज्म के ख़िलाफ़ लड़ाई दरअसल पूँजीवाद के विरुद्ध लड़ाई की ही एक कड़ी है और चाहे जितनी भी देर हो चुकी हो; चाहे हम जितने भी पीछे छूट चुके हों, इन जोम्बियों के विरुद्ध दीर्घकालिक 'पोजीशनल वार' की तैयारी हमें इसी रूप में करनी होगी ! हमें भी बस्तियों-मुहल्लों में सामाजिक आन्दोलन के स्तम्भ के रूप में संस्थाएँ और जन-समुदाय के विविधरूपी मंच बनाने होंगे और उस दिन की तैयारी करनी होगी जब खूनी फासिस्ट दस्तों को सड़कों पर युवा श्रमिकों के दस्ते सबक सिखलाएँ ! अगर बैठे-बैठे सोचते रहेंगे तो यह लक्ष्य दूर की कौड़ी बना रहेगा I व्यावहारिक आशावादी वही होता है जो कुछ करता है I गतिरोध के दौरों में इतिहास चंद दिनों के कामों को दशकों, या कभी-कभी तो शताब्दियों में पूरा करता है ! और फिर वह कालखण्ड आता जब वह दशकों के काम को चंद दिनों में अंजाम दे देता है ! इतिहास की द्वंद्वात्मक गति ऐसी ही होती है !
हमारा यह स्पष्ट मानना है कि कोई भी अल्पसंख्यक धार्मिक समुदाय बहुसंख्यावादी धार्मिक कट्टरपंथ का मुकाबला धर्म के झंडे तले संगठित होकर नहीं कर सकता ! उसे जुझारू सेकुलरिज्म के झंडे तले ही संगठित होना होगा और इस बात को समझना होगा कि सेकुलरिज्म का मतलब अपने धार्मिक विश्वास को छोड़ देना और नास्तिक हो जाना नहीं होता ! सेकुलरिज्म के उसूल हर व्यक्ति के धार्मिक या अधार्मिक निजी विश्वास को मानने की पूरी गारंटी देते हैं और सिर्फ़ सामाजिक-राजनीतिक सार्वजनिक जीवन से धर्म को दूर रखने की बात करते हैं ! जब भी सार्वजनिक जीवन में धर्म का प्रवेश होगा तो धार्मिक अल्पसंख्यक दोयम दर्जे के नागरिक हो जायेंगे ! धार्मिक अल्पसंख्यकों का धार्मिक कट्टरपंथ बहुसंख्या के धार्मिक कट्टरपंथ को तो मज़बूत करता ही है, सामान्यतः धर्म के झंडे तले भी अगर धार्मिक अल्पसंख्यक संगठित हों तो अन्य धर्मों के आम लोग और सेक्युलर आबादी से अपने को अलग-थलग कर लेंगे और बहुसंख्यावादी धार्मिक कट्टरपंथ के विरुद्ध संघर्ष में कभी भी सफल नहीं हो सकेंगे !
कुछ बातें और साफ़ कर दी जानी चाहिए ! यहाँ यह सवाल है ही नहीं कि हम या आप हिजाब पहनते हैं या नहीं, अथवा उसे सही मानते हैं या गलत ! पहनावे का सवाल पूरीतरह एक व्यक्तिगत मसला है, अगर किसी नागरिक पर राज्य, धर्माधिकारी या माँ-बाप द्वारा उसे बलात थोपा न गया हो ! फिर हम बलात थोपे जाने का भी तबतक यूँ ही विरोध नहीं कर सकते जबतक इसके स्पष्ट प्रमाण न हों, और जिसपर थोपा गया हो वही इसका विरोध न कर रहा हो ! कर्नाटक की उस लड़की के हिजाब पहनने पर अगर गुंडे नहीं, बल्कि क़ानून या सरकार भी रोक लगाती तो यह उसकी निजी आज़ादी का हनन होता और उतना ही गलत होता ! कुछ "शांतिप्रेमी" लिजलिजे-गिजगिजे "भलमानसों" का यह भी कहना था कि उस लड़की को 'अल्ला-हु-अक़बर' की जगह 'जय भारत' बोल देना चाहिए था ! यह सुझाव की आड़ में बलात "देशभक्ति" थोपने की एक मक्कारी भरी कोशिश तो है ही, वहशी गुंडों के सामने आत्मसमर्पण की एक कायराना नसीहत भी है ! आप 'अल्ला-हु-अक़बर' के नारे से सहमत हों या असहमत, अगर 'जय श्रीराम' का नारा गलत या असंवैधानिक नहीं है तो 'अल्ला-हु-अकबर' भला क्यों है ? क्या प्रकारांतर से यह किसी मुसलमान से देशभक्ति का सर्टिफिकेट माँगने जैसा और संघियों के इस तर्क को स्वीकार करने जैसा नहीं है कि वे "देशभक्त" मुसलमानों के ख़िलाफ़ नहीं हैं? और फिर उनकी अगली बात यह होती है कि दरअसल मुसलमान देशभक्त होते ही बहुत कम हैं ! अगर कोई मुसलमान देशभक्त है तो वह 'बन्दे मातरम' बोलकर और गाकर इसका सुबूत पेश करे ! यही फ़ासिज्म का लॉजिक है ! धार्मिक बहुसंख्या की ओर से एक छद्म-बौद्धिक गिरोह खड़ा होकर देशभक्ति की एक कसौटी बनाता है और फिर सड़क पर कोई भी गुंडा-मवाली या गधा-सूअर खड़ा होकर लट्ठ तानकर धार्मिक अल्पसंख्यक समुदाय के किसी व्यक्ति से देशभक्त होने का सबूत माँगने लगता है ! आखिर किसी मुसलमान को यह हक क्यों नहीं है कि 'जय श्रीराम' के नारे लगाते लोगों के बीच वह भी 'अल्ला-हु-अक़बर' का नारा लगाए ? गजब दोगलापन है भाई !
हिजाब के मसले पर हिन्दुत्ववादी गुंडों का हुड़दंग पूरे कर्नाटक में फ़ैल चुका है ! पुलिस बस 'लॉ एंड ऑर्डर' को बनाये रखने की खानापूरी वैसे ही कर रही है जैसे भाजपा-शासित राज्यों में करती है ! अभीतक न तो कर्नाटक के मुख्यमंत्री ने, न मोदी, शाह या योगी या किसी भी भाजपाई नेता ने या संघ के किसी नेता ने इस हुड़दंग पर एक शब्द भी बोला है ! इन गुंडा गिरोहों के पीछे संघ और भाजपा ही नहीं राज्य की पूरी मशीनरी नंगई के साथ खड़ी है ! इसका एक मक़सद यह तो है ही कि पाँच राज्यों के विधानसभा चुनावों में साम्प्रदायिक ध्रुवीकरण के कई हथकंडे बेअसर होने के बाद अब एक और हथकंडे को आजमाया जा रहा
है !


No comments:

Post a Comment