Saturday, February 26, 2022

आजच्या सावरकर पुण्यतिथी निमित्त, त्यांचे मौलिक विचार






१) "गाय माणसाची माता कशी असू शकेल? ती बैलाची माता आहे"
२) युरोपियन लोकांची संस्कृती अप-टू-देट,अद्ययावती तर आमची श्रुती-स्मृती पुरोणोक्त म्हणजे जुनी पुराणी"
३) एकेकाळी मागासलेला युरोप, त्याने त्यांचे बायबल मिटताच हजार वर्षाने आमच्या पुढे गेला"
४) "धर्मबळाची नांगी ठेचिल असे एकच बळ आहे ते म्हणजे
विज्ञानबळ"
५) "यज्ञाने-अग्निपूजेने कोणतेही भौतिक हित साधत नाही"
६)"मागासलेल्या धर्मग्रंथांस त्रिकालाबाधित मानल्याने आम्ही त्यांच्या इतकेच मागासलेले राहिलो"
७)"बोरूच्या लेखणीपलिकडे पाच हजार वर्षात आम्ही दुसरे लेखनसाधन कल्पू शकलो नाही"
८)"काल काय झाले ते सांगण्याचा अधिकार धर्मग्रंथाचा असू शकेल पण आज काय योग्य आहे ते सांगण्याचा अधिकार,प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगक्ष्म विज्ञानाचा"
९) "आमच्या देशाने सहस्रवर्षं यज्ञातुन व अग्निहोत्रातून खंडोगणती तूप जाळले त्या देशात सतत महामारी,रोगराई, पण पळीभरही तूप असल्या आगीत न जाळणारे यूरोप-अमेरिकादि देश मात्र आयुर्मान"
१०)"ग्रंथ जेवढा प्राचीन,जुना तेवढे त्याच्यातील ज्ञान कालबाह्य झाल्याचा धोका मोठा असतो"
११)" गोपूजा काय किंवा पंचगव्य काय यांची भलावण करणे म्हणजे निव्वळ भाकडपणा आहे"
१२)"सारे नवग्रह मठ्ठ, त्यांना शतकानुशतके प्रार्थना-उपासना करून आम्ही काय मिळवले?"
१३) " गोमांस विषयक हिंदूंची पोथीनिष्ठता जितकी राष्ट्रास घातक तितकीच मुसलमानांची वराहमांस विषयक पोथीनिष्ठता राष्ट्रास घातकच आहे"
१४) "सजातीय विवाहतून झालेल्या संततीपेक्षा विजातीय विवाहातून झालेली संतती अनेकदा श्रेष्ठ ठरली आहे"
【संदर्भ : विज्ञाननिष्ठ निबंध】
स्वत:ला हिंदूत्ववादी व सावरकर-भक्त म्हणवणाऱ्यांना सावरकरांचे हे विज्ञाननिष्ठ विचार मात्र सोयिस्कर रित्या पचनी पडत नाही. तिथे मग त्यांच्या चरितार्थावर प्रश्नचिन्ह लागतो ना !
त्यांचा एकच घोषा असतो- सावरकर हे प्रखर देशभक्त व स्वातंत्र्यवीर होते. स्वतःच स्वतःला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर कितपत देशभक्त होते, हे त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांवरून स्पष्ट होते. इतर क्रांतिकारकांना "मारता मारता मरेस्तो (ब्रिटिशांशी) झुंजेन" अशी शपथ देणारे सावरकर हे मात्र जेंव्हा पन्नास वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेंव्हा त्यांचे हातपाय गळाठले व अंदमानात भरती होताच दोन महिन्यांत त्यांनी पहिले माफीपत्र दिले व नंतर अनेक माफीपत्रे ते ब्रिटिशांना लिहित गेले. त्यावर मखलाशी अशी की पन्नास वर्षं तुरुंगात सडून आयुष्य व्यर्थ घालवण्यापेक्षा तुरुंगातून बाहेर सुटून आल्यास भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी भरीव कामगिरी करून आयुष्य सत्कारणी तरी लावता येईल. दोन काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्या खतरनाक (?) सावरकरांना दहा वर्षांतच ब्रिटिशांनी अंदमानातून मुक्त का केले, याचे पटण्याजोगे स्पष्टीकरण मात्र सावरकर-भक्त देत नाही. त्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी मग ते सावरकरांना गांधीजींच्या( व नेहरुंच्या) तुलनेत किती जास्त दिवस तुरुंगात ठेवले, याचा तक्ता देऊन, ब्रिटिशांच्या गांधीजींना किती लाठ्या खाव्या लागल्या, यांचा वायफळ हिशोब मांडून, त्यावरून त्यांचे देशासाठीच्या योगदानाचे मोल ठसवू पहातात.
सावरकरांनी इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून (व आपण नामानिराळे राहण्याचा चतुरपणा दाखवत) हिंसेचा मार्ग अवलंबला होता तर गांधीजींनी कधीच शस्त्र हाती न घेता सविनय कायदेभंग व ब्रिटिशांविरोधात जनजागरणाचे काम केले होते. गुन्ह्याच्या प्रमाणात इतकी तफावत असतांना दोघांनाही समान शिक्षा कशी होऊ शकेल, हा साधा विचारही सावरकरभक्तीमुळे विवेक हरवलेल्यांना व तरीही स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्यांना कसा शिवत नाही, ह्याचे आश्चर्य वाटते. बरे, ज्या हेतूने अंदमानातून सुटका करवून घेतल्याचा दावा केला गेला तर ते इप्सित साधण्यासाठी अंदमानोत्तर काळात ब्रिटिश विरोधी एखादे तरी कृत्य त्यांनी केले होते काय, तर याबाबतीत नन्नाचाच पाढा ! उलट भारतीय संघराज्यात सामिल होऊ नये म्हणून भारतातल्या विविध संस्थानिकांना फूस लावण्याचे काम करूनही त्यांनी, आपली विवेकबुद्धी हरवलेल्या भक्तांच्या मनात, आपली स्वतःची फाळणी विरोधी व अखंड भारतवादी अशी प्रतिमा निर्माण करण्यात मात्र यश मिळवल्याचे दिसते. सावरकरांना ब्रिटनमध्ये सर्वात प्रथम चार महिन्यांचा कारावास का भोगावा लागला होता व त्यांची कथित पहिली पत्नी कासाबाई ही निराशाग्रस्त होत शंकरलाल कनौजिया यांचे बरोबर का पळून गेली, हे साधे प्रश्नही त्यांच्या भक्तांना पडत नाही. मदनलाल धिंग्रा यांना ब्रिटिश ऑफिसर वायली याचा खून करण्याची "प्रेरणा" त्यांनीच दिली की जे काम ते स्वतःही करू शकले असते. पण ते शेवटपर्यंत प्रेरणेचे पुरवठादार च्या भूमिकेतच वावरले. वायलीहत्येची कामगिरी फत्ते झाल्यानंतर त्यांनी त्या हत्येची जबाबदारी शिताफीने झटकली. धिंग्राने लंडनमध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत यावरून चिडून जाऊन सावरकरांना त्याने "भ्याड" म्हणून संबोधले होते. सावरकरांनी दिलेल्या प्रेरणेतून ज्या घटनांना अंजाम मिळाला त्यापैकी एकाही घटनेची जबाबदारी त्यांनी घेतली नाही. ज्यांनी त्या प्रेरणा कृतित उतरवल्या त्या धिंग्रा/कान्हेरे/पिंगळे/गोडसे हे फासावर चढले पण सावरकर मात्र प्रत्येकवेळी चतुराईने सही सलामत सुटत ८३ वर्षांचे पूर्ण आयुष्य जगले. सावरकरांनी दयाही ब्रिटिशांकडे या कृत्यांसाठी मागितली की ज्या कृत्यांसाठी धिंग्रा/अनंत कान्हेरे हे फासावर गेले. धिंग्रा/कान्हेरे/पिंगळे/गोडसे यांना फाशीच्या तख्तावर नेणाऱ्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी तात्यांनी टाळल्याचे दिसते. "१८५७ : भारताचे स्वातंत्र्यसमर" हे पुस्तक लिहून १८५७ च्या घटनांचे प्रथमच गौरवीकरण केल्याचे श्रेय त्यांनी घेतले पण कार्ल मार्क्स यांनी १८८३ या सावरकरांच्या जन्मसालाआधीच याच शीर्षकाचे पुस्तक लिहिले होते, ही गोष्ट चतुराईने लपवली गेली. म्हणजेच कॉंग्रेसच्याच वल्लभभाई पटेल/सुभाषबाबू/भगतसिंग (हो, भगतसिंग हेदेखील सुरुवातीस कॉंग्रेसचेच सदस्य होते व नंतर ते डाव्या विचारसरणीकडे आकृष्ट झाले.) वगैरे लोकोत्तर पुरुषांचा वारसा लाटण्याचा लुच्चेपणा जसा वर्तमान भाजपा शासन करते तसाच काहीसा लुच्चेपणाचा पायंडा हा त्यांना(च) वंदनीय नेत्याने आधीच घालून दिला होता तर ! तोवर भारताच्या स्वातंत्र्य समरात मुसलमानांचा ही खूप वाटा होता, असा गौरवास्पद उल्लेख करणाऱ्या तात्यांनी मुस्लिमांचा द्वेष करण्याचे १८०° तफावतीचे धोरण अंदमानोत्तर का अवलंबले व केवळ भारत हा हिंदूंचाच, असे का प्रतिपादन केले, हे कोडेच होते. बरं, त्याच मुस्लिमांच्या लीग सोबत भारतातील चार प्रांतात ते सत्तेत भागीदारी करून होते. किती विरोधाभास ! त्यांनी म्हणे सशस्त्र क्रांतीदल उभारले होते. पण स्वातंत्र्यापूर्वी नौखालीत मुस्लिमांनी जेंव्हा हिंदूंचे हत्याकांड चालविले होते तेंव्हा, जिथे सावरकरांची हिंदू महासभा मुस्लिम लीग सोबत सत्तेत सहभागी होते तिथे, ते क्रांतिदल हिंदूंच्या रक्षणार्थ का धावून गेले नाहीत? काय आचमने घेत बसले होते? तेथे हिंदूंच्या मदतीसाठी एकच जण निधडेपणाने केवळ पंचानिशी धावला ज्यांचा सावरकरांनी सातत्याने द्वेषच केला. सावरकरांची अंदमानातून सुटका करावी, यासाठी ह्याच महात्म्याने सुचवले होते, अशी लोणकढी थाप राजनाथसिंह यांनी "ठोकून देतो ऐसाजे" स्वरूपात मारली. इतिहासाची विकृत स्वरूपात मांडणी करणे, हा तर हिंदूत्ववाद्यांचा हातखंडा खेळ. सावरकरांनी जर गांधीजींनी सुचवल्यावरूनच माफी मागितली (अन्यथा ते संपूर्ण पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यास तत्परच होते जणू !) हे जर खरे होते तर आपणाविषयी सद्भाव बाळगणाऱ्याच्या हत्येचे प्रयत्न करणारे ते कृतघ्न देखील होते, हे सिद्ध होते. म्हणजेच ते केवळ माफीवीरच नाही तर कृतघ्न ही होते, हेही आपसूकच सिद्ध होते. असो, आम्हास हे ठाऊक आहे की कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच !
हे म्हणे सुभाषचंद्र यांचेही गुरू होते व त्यांनी सावरकरांकडूनच ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेतली, अशी लोणकढी हे सावरकर भक्त ठोकून देतात. १९३९ मध्ये सुभाषचंद्र यांनी सावरकरांची भेट घेऊन त्यांनी द्विराष्ट्रवादाला सोडचिठ्ठी द्यावी, असा आग्रह धरला. पण त्यांना निराशेने परतावे लागले. बोसांनी आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रात उद्विग्नतेने लिहिले, "हा माणूस (म्हणजे तात्या) अस्मितेच्या खोट्या कल्पनांनी व न्यूनगंडांनी इतका पछाडलाय की हा देशाचं विभाजन पत्करेल पण देशाच्या एकात्मतेसाठी काही करणार नाही !" त्या उद्विग्नतेतूनच सुभाषबाबूंनी त्या दिवशीची प्रस्तावित सभा रद्द केली. सावरकर हे सुभाषबाबूंचे गुरू असते तर आझाद हिंद फौजेत अनेक वरिष्ठ पदांवर मुस्लिम अधिकारी दिसलेच नसते. ब्रिटिशांनी १९२४ सालीच सावरकर हे रत्नागिरी येथे पत्नीसह वास्तव्य करतांना त्यांना पेन्शन देऊ केले. ते का, हा साधा प्रश्न त्यांच्या भक्तांना पडत नाही. एका काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्यांवर कुठलीही दयामाया ब्रिटिश दाखवत नव्हते, अनेकजण ठार वेडे होईपर्यंत शिक्षा भोगत होते आणि ह्या दोन काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्या आणि स्वतःलाच स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणाऱ्यावर ब्रिटिश मेहेरबान होत मासिक पेन्शन देऊ लागले ! Wonderful !!
दया, कुछ तो भी गडबड है. कहीं देश विभाजन करके स्वतंत्रता आंदोलन को ब्रेक लगाने की सुपारी तो ब्रिटिशों से इसने नहीं ली थीं ? वरना, पचास साल की कालापानी की सज़ा जिसपर थोपी गई थीं उसपर ब्रिटिश सल्तनत इतनी मेहरबान क्यों होती?

No comments:

Post a Comment