Saturday, April 30, 2022

गावातल हरवलेले अंगण(खळा)





मी शोधतेय हरवलेले अंगण
मला वाटतं शोधत असाल तुम्ही पण !
कुणी शोधून देईल का विचारलंही
जर नसेल तर कसे शोधणार आपण !
आधी कसं मोठं अंगण होत घरासमोर
शेणानं सावरलेलं छान दिसत असे दिवसभर
स्वागत करीत असे ते येणा-या जाणा-यांचे
तेच अंगण होते प्रतिक आमच्या श्रीमंतीचे !
आता कुठं हरवले हो हे अंगण
सावरायचं ही विसरले सारे जण
अंगणासाठी आम्ही जागा कुठं सोडली
एक एक इंच जागा घरासाठी व्यापली !
आली आता शहरात फ्लॅट संस्कृती
अंगण गेलं म्हणून आली असेल विकृती
चार इंच जागेत काढतात खोटी रांगोळी
गावाच्या अंगणात काढत होतो किती मोठी !
आता शोध करू नका अंगणाचा
शोध करू नका हरवलेल्या मनाचा
अंगण होते तोपर्यंत होता आनंद दारात
सावरलेल्या अंगणातुन तो येत असे घरात !






No comments:

Post a Comment