Wednesday, May 31, 2023

रामदास



न होत शिवाजी तो होत सभी की सुंता

म्हणाऱ्या लोकांना हे माहितच नाही की रामदास मुस्लमानांचे किती गोड़वे गात होते... कारण इस्लाम मधे असलेला समतावादी अध्यात्म रामदासांना नेमका कळला होता!! उगिच गुरुजी भिड़े द्वेष पसरवून "बोटे" करीत असतो- प्रा. जावेद पाशा
धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात जी शेकडो हस्तलिखित बाडं आहेत, त्यातील बाडांक ६६८ मध्ये समर्थांनी रचलेली मुसलमानी अष्टकं आहेत. ज्याप्रमाणे करुणाष्टकांना अष्टक का म्हटले ते कळत नाही त्याचप्रमाणे या ६६ श्लोकांना अष्टक का म्हटले ते कळत नाही. वस्तुतः हे ६६ श्लोक मनाच्या श्लोकांप्रमाणेच असून काही श्लोक अपवाद वगळता बहुसंख्य श्लोकांत भुजंगप्रयात वृत्त सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. या श्लोकांद्वारे प्रबोधन करताना समर्थांनी श्रोत्यांना 'भाई' म्हणून संबोधिले आहे. तर स्वतःचा उल्लेख करताना 'कहे रामदासो' अशी मुद्रा वापरली आहे. समर्थांच्या अन्य रचनांमध्ये भगवंताचा उल्लेख करताना श्रीराम, देव, परमेश्वर, आत्माराम, अंतरात्मा असे शब्द वापरले आहेत. मात्र या मुसलमानी श्लोकांमध्ये खुदा, इलाही, पैगंबर, पीर अल्ला यासारखे शब्द सर्रास वापरले आहेत. तसेच यातील श्लोकांत रामाने लंका घेतली असे न म्हणता रहीमने लंका घेतली, असे समर्थ म्हणतात किंवा माझ्या गळ्यात रामाची माळ आहे असे न म्हणता रहीमची माळ आहे असे म्हणतात. याचा अर्थ समर्थ राम आणि रहीम यांच्यात ते मुळीच भेद करत नाही, हे स्पष्ट होते.
पकर्बे राहा पिर पैगोंब्बरो के बडे हो गये है
न छोडि ईनो कि ईसिमो हि है रे भला फायदाहि
भला हे कहेगा सबोंहि.
पीर पैगंबराचा मार्ग धरल्यामुळे अनेकांचे हित झालेलं आहे.
तु हा मार्ग कधीही सोडू नकोस. त्यातच तुझंही हित आहे.
हेच मी इतरांनाही सांगेल.
दुन्या काहि धंदा सबों छोड देना।
दुन्या दो दिनोंकि दुन्याहि न होना।
अछि है राह पिर पैगोंबरोकि।
कहे रामदासो
मानवी जीवनाचे सार्थक क्षणभंगुर अशा जगाच्या खेळात रमण्यात नाही तर पैगंबराच्या रस्त्याने चालण्यात आहे, असे समर्थ म्हणतात, (मनाच्या श्लोकात आध्यात्मिक वाटचालीला ते राघवाचा पंथ म्हणतात तर मुसलमानी श्लोकांत त्याला ते पैगंबराचा मार्ग म्हणतात.)
घट घट साहि यारे आज्यब अल्लमियाँ रे
ये हिदु मुसलमान दोन्हो चलावे’
माणसाच्या अंतरात्म्यात अल्लाच वास करतो
तोच हिंदू, मुस्लिम या दोघांनाही जगवतो.
फतर्‍या फुटे गा खुदा सोज्यु दारे फुढेसा तुटॆसा नहि सो सही रे ल्युभित: पाहाडो किया है खुदाने फतर्पर्थरि नेत हिंदू दिवाने.
दगड हा फुटणारा आहे, यास्तव दगड म्हणजे खुदा नव्हे.
तो असा फुटणारा तुटणारा असत नाही, हे सत्य आहे.
त्यानेच पहाड निर्माण केले आहेत. पण वेडे हिंदू दगडातच देव आहे म्हणत त्याच्यावर आपली निष्ठा ठेवतात.
आडबसा महज्यब हिंदू दिवाना
ईनीका कहु सोसमज्बे तु माना
या अल्ला या अल्ला अमजज्सी कहेरे
कहे रामदासो पियारे सहि रे.
वेड्या हिंदूचा धर्म विचित्र आहे. हा धर्म जे सांगतो ते तु अगोदर समजावून घे व नंतरच त्याला मान. जेंव्हा तु या अल्ला - या अल्ला म्हणून नांव घेशील तेव्हा ते ईश्र्वराचे नांव समजुनच घे. प्यारे रामदास हे सत्य सांगत आहे.
अल्लख वो निरंजन कैसा यह रे आलखवो।
किसेहि सारिखा नाहीं क्या कहुरे।।
नहि रंग ना रूप रेखा कछुही।
मुँह से हि कहेसा नूहि वो ईलाहि।।
सभी ज्यातसे वो है रे नियारा।
कहे रामदासो चला वेहि सारा।।
सर्वोज्यात मोहि हहि बस्त यहि ।
ईनो कि कहुं ज्यात से कोण भाई।।
नहि त्यात ना गोतसे सो निराला ।
कहे रामदासो ये आला ये आला।।'
अल्ला हे सर्वश्रेष्ठ तत्त्व असून, ते अलख निरंजन म्हणजे डोळ्यांनी पाहता येण्यासारखे नाही. रंग, रुपरेखा नसलेल्या त्या इलाहीला ज्ञानचक्षूनेच पाहता येते, अल्ला ही संकल्पना धर्म, जात, गोत्र या सगळ्यांच्या पलीकडील आहे, सगळ्यांमध्ये तोच वास करतो, हे माझ्या पीरानेच मला समजावून सांगितले आहे. त्यामुळेच रामदास त्याचे नाव घतोय.
ज्याप्रमाणे मनाच्या श्लोकांत भक्ताची लक्षणं सांगितली त्याप्रमाणे मुसलमानी श्लोकातही भक्ताची लक्षणं सांगितली आहेत. भगवंताचा खरा भक्त कधीही दुसऱ्याला दुःख देत नाही. तो जसे बोलतो तसे वागतो. केवळ कफनी आणि माळ धारण करतो तो काही देवाचा खरा भक्त नव्हे. दोन भिन्न संप्रदायाची माणसे एकमेकाला भेटली म्हणजे भिन्न वेषावरून ते आपापसात भांडत राहतात. जर सारे जग भगवंतच चालवतो आहे तर वादविवाद आणि संघर्ष यांचे कारणच कुठे राहते? समर्थ म्हणतात,
सबोंमे कहे सो च्यलावे ईलाहि ।
ज्युदाहि नहि रे न कर्बे लडाई।।
नहि बाद बेबाद भाई तमण्ना।
रहिम्काहि बाना सबोंने च्यलाना।।
रहीमचा खरा बंदा 'कहे बात वैसा राह से चले सो' असा असतो. संसाराचा व्याप सोडून तो भगवंताचे चिंतन करीत राहतो.
माणसाने फकीर व्हायचे असते ते अल्लाला समजावून घेण्यासाठी. फकीर होऊन जो वादामध्ये पडतो त्याला खरा देव कळलेलाच नसतो. समर्थ म्हणतात,
'खुदाकेहि वास्ते फकिरिही लेना।
सबो से भलाई लडाई न कर्ना ।।
भला साधु सो वो हरामि न लेवे।
खुसि हालसेंहि मिला तोहि खावे।'
खरा परमेश्वर सर्वत्र व्यापून असून तोच हे सारे जग चालवित आहे असे समर्थ म्हणतात. आपल्या मराठी रचनेत सद्गुरु कृपेने आपल्याला ज्ञान झाले असे समर्थ सांगतात, मात्र मुसलमानी श्लोकांत पीराने आपल्याला हे ज्ञान दिले असे ते म्हणतात. समर्थाच्या शब्दात सांगायचे झाल्यास -
'पिरोंके पगोंसे हमें ने सुन्हों साथ भाई कहुं येहि माना।
कहे रामदासो अकल्से पछाना।'
#साभार - रूपाली गिरमे




No comments:

Post a Comment