Thursday, October 30, 2025

एका मुस्लिम बांधवाने लिहिलेला लेख आपल्या फॉल्वोर्स ने मला वॉटसॉपवर पाठवला.




*हिंदू स्वतःची संस्कृती का नष्ट करत आहेत ?*
एका मुस्लिम लेखकाने या लेखाद्वारे *हिंदू समाजाला चपराक* मारली आहे….
तुमच्या *विवाहित, अविवाहित* युवतींनी
*साडी नेसणे बंद* केले आहे. त्यांना कोणी *रोखले* आहे? आम्ही नाही.
*याला मुस्लिम जबाबदार नाहीत. खरं नाही का ?*
*कपाळावरचे कुंकू* ही एके काळी तुमची *ओळख* होती. तुम्ही लोक *रिकाम्या कपाळाला* पूर्वी *अशुभ* मानत होता.
घरातून बाहेर पडण्याआधी तुम्हीच *पुरुषांनी* कपाळावर *गंध* लावणे सोडले आहे.
तुमच्या स्त्रियांनीही फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली *कपाळावर गंध/तिलक* लावण्याची प्रथा बंद केली आहे.
याला *मुस्लिम* कसे जबाबदार आहेत ?
तुम्ही लोकांनी तुमच्या *पारंपरिक सणांऐवजी* वाढदिवस, डेज साजरे करायला सुरुवात केली आहे. यात *मुस्लिमांची* चूक कुठे आहे ?
आमच्या समाजात लहान मूल जेव्हा *चालायला* शिकते तेंव्हा ते आपल्या वडिलांची बोटे धरून *मस्जिदमध्ये इबादत/नमाजसाठी जाते* आणि *इबादत/नमाज* हे आपले आयुष्यभराचे कर्तव्य मानते...
तुम्ही लोकांनी *मंदिरे पाहणेही* सोडून दिले आहे. काही जण फक्त ५-१० मिनिटांसाठी जेंव्हा *स्वतःला देवाकडून कांही हवे* असते किंवा दुःखात असतील तेंव्हाच देव आठवतो आणि देवळात जातात.
आता जर *तुमच्या मुलांना* मंदिरात जाण्याचे *कारण माहित नसेल,*!
मंदिरात *काय करावे* माहित नसेल, पूजा हे *कर्तव्य* आहे. हे ही माहिती नसेल, तर ह्यात *मुस्लिमांचा* दोष आहे का ?
तुमची मुलं *कॉन्व्हेंट* शाळेत शिकून कविता करतात, याचा तुम्हाला अभिमान वाटतो. पण तुमच्या मुलांनी *गीता श्लोकांचे* पठण केल्याचा तुम्हाला *अभिमान* वाटायला हवा.
त्याने *शुभम् करोती* कल्याणनम् अथवा गीतेचे *श्लोक* म्हटले *नाहीत* तर तुम्हाला *अपराधी वाटत नाही* आणि
*दु:खही वाटत नाही*
घरातील लहान मूल *बोलायला* लागल्यावर आम्ही त्याला मोठ्यांना *"सलाम"* म्हणायला शिकवतो.
पण *तुमची राम राम, नमस्कार, प्रणाम* करण्याची जागा हॅलो, हाय ने घेतली आहे. याला *जबाबदार* कोण ?
कॉन्व्हेंट मधून परतल्यावर आमची मुलं *उर्दू,अरबी* सुद्धा शिकतात आणि आमची *धार्मिक पुस्तके* वाचायला लागतात.
*तुमची मुले रामायण किंवा भगवद्गीता* वाचत नाहीत. त्याला *संस्कृत* येत नाही, आणि ब-याचदा *मातृभाषाही* येत नाही.
*हा आमचा दोष आहे का?*
तुमच्याकडे *आध्यात्मिक संस्कृती, सभ्यता, इतिहास, परंपरा* इत्यादी सर्व कांही आहे, पण तुम्ही आधुनिकतेच्या नावाखाली आंधळेपणाने
*त्या सर्वांचा त्याग केला.*
मात्र आम्ही *त्यांना विसरलो नाही.* आपल्यात हाच फरक आहे. तुम्ही *तुमच्या परंपरेशी असलेले नाते तोडले आहे. पण आम्ही आमची मूळं आजही सोडली नाहीत*
आणि कधीच सोडणार नाही.
तुम्ही स्वतः *तिलक,भस्म,यज्ञोपवित घालणे टाळता, .*
तुमच्या स्त्रियांना
*कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र*
घालायला लाज वाटते. तुम्ही लोक याला अनावश्यक समजता.
*या पद्धतींची ओळख दाखवायलाही* तुम्हाला लाज वाटते.
आधुनिकतेच्या नावाखाली *तुम्ही लोकांनी पहाटे ४-५ वाजता* लवकर उठण्याची प्रथा सोडली आहे आणि *तुमचे संस्कार, चालीरीती, परंपरा, भाषा, तुमचा पेहराव*
याला मागासलेपणाचे समजत आहात.
*याला मुस्लिम जबाबदार कसे ?*
तुमच्या समाजाने स्वतःची *ओळख जपण्यासाठी सजग असायला* हवे पण दुर्दैवाने हे तुम्ही तुमच्या समाजाला पटवून देण्यात असमर्थ ठरला आहात.
*तुमची सभ्यता व संस्कृती* नष्ट होण्यामागची खरी कारणे काय आहेत? याचा विचार करा.
*आम्ही कारणीभूत आहोत का ?*
खरी अडचण ही आहे की *तुमचा समाज जागृत व्हावा*
अशी तुमची पण इच्छा आहे, पण तुम्ही स्वतः त्यासाठी पुढाकार घेत नाही. इतर लोकही तुमच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगताना दिसत नाहीत. त्यामुळे *केवळ समाजच नव्हे तर तुमच्या कुटुंबातील सदस्यही तुमचे धार्मिक भाषण* ऐकायला तयार नसतात. त्यामुळे तुमच्या समाजात कोणीही कोणाचे ऐकत नाही. यात कुणाचा दोष आहे का ?
*आम्ही योगासनासोबतच दिवसातून पाच वेळा नमाजही पडतो.*
अनेक दशकांपासून
*तुमचीच हिंदू अस्मिता नष्ट करण्याची* स्पर्धा सुरू आहे. आजही तुम्ही तेच करत आहात.
*पण जाळीदार टोपी व पेहरावाची आमची ओळख* आम्ही आजही कायम ठेवली आहे.
जर तुम्ही *तुमच्या परंपरा* टिकवण्यात अपयशी ठरला असाल, तर मग
*तुमच्या अपयशाचा आणि निष्काळजीपणाचा* *ठपका इतरांवर का ठेवता?*
*याऐवजी परंपरेचे संरक्षण कसे करावे हे तुम्ही शिकणे आवश्यक आहे.*
*आपल्या सभ्यतेच्या अभिमान बाळगण्यासाठी* *प्रथम आपल्या समाजामध्ये आपली संस्कृती रुजवा.*

No comments:

Post a Comment