जगात जीतकेही मुस्लिमसदृश दहशतवादी आहेत, ते फक्त ७२ हूर मिळविण्याकरिताच स्फोट करत असल्याचा आरोप केला जातो, विशेष करून सोशल मीडियावर हा आरोप वारंवार केला जातो. यासाठी काही अनधिकृत हदिस (प्रेषितवचन)चाही संदर्भ दिला जातो. हा या हदिसी किती अधिकृत आणि किती अनधिकृत आहेत, याची मिमांसा करण्यापूर्वी एक तात्विक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक उदाहरण घेऊ या. मागील अनेक दशकांत काही सुरक्षा अधिकार्यांकडून फेक एन्कान्टर केले गेल्याची माहिती समोर आली होती. सुवर्ण पदके किंवा बढती मिळविण्याकरिता ते फेक एन्काउन्टर घडविल्याचा आरोप केला जातो. आता हे जर खरं असेल तर यावर उपाय काय? फेक एन्काउन्टर्स करणार्यांवर कडक कारवाई हा उपाय आहे की, मूळात सुवर्ण पदके पुरस्कार देण्याची पद्धतच बंद करणे हा उपाय आहे? फेक एन्काउन्टर्ससाठी जबाबदार काय आहे? त्या सुरक्षा अधिकार्यांची स्वार्थी वृत्ती की सुवर्ण पदके? यावरून स्पष्ट होते की, एखाद्या कामगीरीसाठी घोषित केलेले बक्षिस हे चांगली कामं जास्तीत जास्त करावीत यासाठी असतो, त्या चांगल्या कामाच्या नावाने वाईट कामं करण्यासाठी नव्हे.
अगदी याचप्रमाणे सत्याच्या बाजुने असत्याविरूद्ध सरकारी सैन्यात सामील होऊन युद्धभूमीवर शहीद होणार्या शूर सैनिकांसाठी अल्लाहने जन्नतमध्ये बक्षिस म्हणून अनेक देणग्या घोषित केलेल्या आहेत. त्याचपैकी एक म्हणजे काही सुंदर महिलांशी त्यांचं लग्न लाऊन दिले जाईल. त्याच सुंदर महिलांना हूर संबोधलेले आहे. आता हे बक्षिस मिळावं म्हणून जर खरंच कुणी एखाद्या सार्वजनिक बससमध्ये कुणी बाँब पेरून ठेवत असेल आणि स्फोटानंतर त्यातले अनेक लहान मुलं, महिला, वृद्ध आणि निरपराध लोकं तडफडून मरण पावले तर तो बाँब पेरणारा कसा काय जन्नतमध्ये जाऊ शकतो? कारण ़कुरआनात तर एक जीव घेणे हे समस्त मानवतेचा जीव घेण्याइतकं पाप मानलं गेलंय. आता हे बाँब पेरणारे खरंच मुस्लिम असतात की आणखी कुणई हा वाद वेगळा, तो आपला इथे विषय नाहिये, पण खरंच असं कुणी करत असेल तर त्यासाठी ़कुरआनात घोषित केलेल्या बक्षिसांच्या तरतुदीचा काय दोष? असं असेल तर मग फेक एन्काउन्टर्ससाठी सुवर्ण पदकांना दोष देणार की ते देणार्या सरकारला दोष देणार? मूळात निर्दोषांचा जीव घेणारे अतिरेकी जन्नतमध्येच जाणार नाहीत, तर त्यांना हूर मिळण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांना जन्नतमध्ये पत्नी म्हणून हूर मिळणार आहेत, ते सत्यासाठी शहीद झालेले सैनिक असतील, क्रांतीकारी असतील, अतिरेकी नव्हे. पण असले आरोप करणार्यांचा तर्क, सदसदविवेकबुद्धी यांच्याशी काडिमात्र संबंध नसतो, तर ते इस्लामविषयी पूर्वग्रहदुषित झालेले असतात.
मूळात खरंच ़कुरआन किंवा हदिस ग्रंथांत ७२ हूरांचा उल्लेख आहे का? संबंधी जमाअत ए इस्लामी हिंदचे प्रसिद्ध इस्लामी विचारवंत मौलाना ऱजी उल इस्लाम यांनी जे म्हटलं आहे, ते जशास तसं आम्ही इथे हिंदीत देत आहोत –
‘‘क़ुरआन में हूरों की संख्या का कहीं उल्लेख नहीं है। कुछ प्रामाणिक हदीसों से मालूम होता है कि हर ईमानवाले को जन्नत में दो हूरें मिलेंगी (संदर्भ: हदिसग्रंथ बुख़ारी शरीफ, हदिस क्र. ३२४५, हदिसग्रंथ मुस्लिम शरीफ, हदिस क्र. २८३४) मुहद्दिसीन (हदीसों के विशेषज्ञों) ने लिखा है कि जैसे क़ुरआन में दो जन्नतों और दो चश्मों (जलस्रोतों) का उल्लेख है उसी तरह हदीस में दो बीवियों का ज़िक्र किया गया है। जहाँ तक ७२ हूरों का सम्बन्ध है, इसका उल्लेख किसी प्रामाणिक हदीस में नहीं है। हदीसों के मशहूर विशेषज्ञोंने यह बात स्पष्ट रूप से कही है, उदाहरण के लिये अल्लामा इब्ने-तैमिया (मजमउल-फ़तावा : ६/४३२), अल्लामा इब्ने-कसीर (२०/३४१), अल्लामा इब्ने-हजर (फ़तहुल-बारी : ६/३२५) आदि अल्लामा इब्ने-क़य्यिम अल्जौज़िया की एक किताब है ‘हादिअल-अरवाह लिबिलादिल-अफ़राह’। इसमें जन्नत और उस की इनामात का उल्लेख बहुत विस्तार से किया गया है। इसमें अल्लामा इब्ने-क़य्यिम ने स्पष्ट किया है कि, प्रामाणिक हदीसों में दो पत्नियों से ़ज्यादा का उल्लेख नहीं है। (पृ॰१५७) यह बात सही है कि बहुत-सी हदीसों और उल्लेखों में ७२ हूरों का उल्लेख है। यही नहीं, बल्कि कुछ हदीसों में सौ, पाँच सौ, चार हज़ार, बल्कि आठ हज़ार हूरों का उल्लेख है, लेकिन ये तमाम हदीसें ज़ईफ़ (अप्रमाणित), बल्कि उनमें बहुत सी मौज़ू यानी मनगढ़न्त हैं। इस्लाम दुश्मन लोग क़ुरआन में तो फेर-बदल न कर सके और उसका एक अक्षर भी बदलने पर समर्थ न हो सके तो उन्होंने निराधार और मनगढ़न्त हदीसें फैला दीं।’’
(संदर्भ: मौलाना ऱिजउल इस्लाम यांच्या सोशल मीडियावरील पेजवरून साभार)
एक गोष्ट लक्षात घ्या की, जन्नतमध्ये काही फक्त आधुनिक युगातलेच लोकं जाणार नाहीयेत, तर लाखो वर्षांच्या प्रचंड मोठ्या कालखंडातले विविध युगांतले, पृथ्वीच्या विविध प्रदेशातील विविध संस्कृतीतील इमानवंत जाणार आहेत. म्हणून एकपत्नीवाद हा अगदी अलिकडची संकल्पना आहे. प्राचीनकाळी भारतासहीत जगभरात हे फार अपवादानेच सापडते. म्हणून जन्नतमध्ये जणु सगळे युग एकत्रितच येणार आहेत.
बरं सवतीचा इर्ष्या किंवा सांसारिक आवड निवड, प्रेमात वाटेकरी अथवा घरगुती स्वयंपाक वगैरे तिथे नसेल. पुरूषांना हवी तितकी लैंगिक शक्ती तिथे उपलब्ध असतील. थोडक्यात म्हणजे बहुपत्नीत्वामुळे इथ्ो ज्या काही तथाकथित संभावित समस्या काही ठिकाणी उपस्थित होण्याची शंका काही जणांना उपस्थित होण्याची भीती वाटत राहते, तशी कोणतीही समस्या तिथं राहणारच नाही. म्हणून या लौकिक जगातल्या आधुनिक युगाच्या चष्म्यातून जन्नतचीही अगदी तशीच व्यवस्था असेल अशी कल्पना करणे योग्य नाही.
जन्नतमध्ये हूरशी लग्न लाऊन दिले जाईल, या बक्षिसाच्या आकर्षणाचा फायदा असा झाला की, तिथल्या हूरसाठी इथल्या हूरचा आदर ठेवणे ही अट असल्याने वेश्यावृत्तीच्या आहारी गेलेले मोठमोठे ठरकी लोकं हे तौबा (पश्चाताप) व्यक्त करून नीतीमान पाच वेळचे नमाजी बनले, आपल्या पत्नीशी प्रामाणिक राहू लागले, महिलांचा सम्मान करू लागले. त्यानंतर त्यांना कळले की, जन्नतची खरी देणगी हूर नसून अल्लाहचं दर्शन, त्याचा साक्षात्कार आहे, जो अल्लाह सर्व इमानवंतांना जन्नतमध्ये देणार आहे. त्याचं दर्शन सर्व सुखांपेक्षा जास्त सुख देणारं आहे. त्याशिवाय इतर सुखांचं दाखविलेले आकर्षण तर लौकिक जीवनातील चंगळवादातून माणसाला बाहेर काढण्यासाठी आहे, पण ते आकर्षण खोटं नसून ते मिळणार नक्कीच इन्शाल्लाह, पण फक्त इमानवंतांनाच! महिलांना जन्नतमध्ये अनेक पती का नाही? असा प्रश्न विचारला जातो. तर जन्नतमधील देणग्या या नितीमान मानवी स्वभावानुसार आहे. अन्यथा अल्लाहनं क़ुरआनात स्पष्ट म्हटलेले आहे की,
‘‘अन् त्यांना तिथे (जन्नतमध्ये) हवं ते मिळेल.’’
(संदर्भ : क़ुरआन, अध्याय ५० ; अध्याय क्र. ३५)
पण आपल्याला दोन दोन किंवा त्यापेक्षा जास्त पुरूष हे पती म्हणून मिळावे असं कोणत्या ‘नीतीमान’ महिलेला वाटेल? तुम्हाला खरंच दोन नवरे हवे का, असं मजाकितही कुणी एखाद्या नीतीमान महिलेला विचारलं तर ती ती भयंकर चिडून रागावू शकते. त्यामुळे हा प्रश्नच काल्पनिक ठरतो.
इस्लाम व्यतिरीक्त काही विचारधारांमध्ये ‘अप्सरा’चा उल्लेख आढळतो. या अप्सरा नृत्यांगणा होत्या, असं सांगितलं जातं. अनेक चित्रपट, धारावाहिक, नाटकं व कादंबर्यांमध्ये त्या अप्सरा फक्त काही जणांचं मनोरंजन करत असल्याचं दाखविण्यात आलं. अनेकवेळा त्या अप्सरा कमी कपड्यांत, अतिशय मादक हालचाली करून काही जणांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही दाखविण्यात आलेलं आहे. त्या अप्सरांचं रीतसर विवाह होऊन त्या सुखवस्तु घरंदाज महिलांसारखं कौटुंबिक जीवन जगत असल्याचा फारसा जास्त उल्लेख सापडत नाही. काही हिंदी चित्रपटांतही परी, हूर वगैरेंची पात्र अशीच मोठमोठे पंख असलेली आणि मादक नृत्य करत असलेली दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हा गैरसमज दृढ होण्यास मदत मिळाली की हूर म्हणजेच या परी किंवा अप्सरा वगैरे असतात की काय म्हणून. उपरोक्त संदर्भात सांगितल्याप्रमाणे या हूर म्हणजे दुसर्या तिसर्या काही नसून याच लौकिक जीवनातील पुण्यवान महिला असतील, ज्यांचा सहवास एकतर त्यांच्याच पुण्यवान पतीसोबत असेल, पण जर पती नरकात गेलेला असेल तर मग त्यांचं लग्न इतर दुसर्या पुण्यवान पुरूषांसोबत केले जाईल. प्रसिद्ध इस्लामी विचारवंत मौलाना अबुल आला मौदुदी यांनी त्यांचे ़कुरआनावरील प्रसिद्ध भाष्य ‘तफहिम-उल-़कुरआन’च्या तळटिपांत यासंबंधी अनेक भाष्ये केलेली आहेत. त्यापैकी काही इथे संदर्भ देत आहोत –
‘‘असे असेल त्यांचे (जन्नतमधील लोकांचे) वैभव. आणि आम्ही गोर्यापान मृगनयनी स्त्रियांशी (हूरांशी) त्यांच्या जोड्या बनवू (विवाह करून देऊ).’’
– ़कुरआन (४४:५४)
भाष्य:
‘‘अरबी शब्द आहे ‘हुरून-ईन’ हूर बहुवचन आहे ‘हौरा’चे आणि हौरा अरबी भाषेत ‘गोर्या स्त्री’ला म्हणतात. ‘ईन’ बहुवचन आहे ‘ऐना’चे आणि हा शब्द मोठमोठ्या डोळ्यांच्या (मृगनयनी) स्त्रीसाठी वापरला जातो.’’
– तळटिप क्र. ४२ (संदर्भ: तलखीस तफहिमुल ़कुरआन, भाग २, भाष्यकार: मौलाना अबुल आला मौदुदी, भाषांतर: प्रा. अब्दुल रहमान शेख, प्रकाशक: इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंबई, आवृत्ती २०१३ पान नं. ८१८)
‘‘या ऐश्वर्यादरम्यान लाजाळू नजरवाल्या असतील, ज्यांना या स्वर्गस्थ (जन्नती) लोकांच्या अगोदर कधी कोणा मानवाने अथवा जिन्नाने स्पर्श केलेला नसेल’’
– ़कुरआन (५५:५६)
भाष्य:
‘‘याचा अर्थ जगाच्या जीवनात एखादी स्त्री कुमारीका म्हणून मृत्यु पावली असेल किंवा कुणाची पत्नी राहिली असेल, तरूणी अथावा वृद्धा असतांना मृत पावली असेल. जेंव्हा पारलौकिक जीवनात या सदाचारी स्त्रिया जन्नतमध्ये दाखल होतील तेंव्हा तरूण व कुमारिका बनविल्या जातील. तिथे त्या नेक (पुण्यवान) स्त्रीला ज्या नेक पुरूषाची जीवन साथी बनविले जाईल ती जन्नतमध्ये दुसर्या पुरूषाच्या उपभोगात पत्नी म्हणून आली नसेल.’’
– तळटिप क्र. ४६ (संदर्भ: तलखीस तफहिमुल ़कुरआन, भाग २, भाष्यकार: मौलाना अबुल आला मौदुदी, भाषांतर: प्रा. अब्दुल रहमान शेख, प्रकाशक: इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंबई, आवृत्ती २०१३ पान नं. १०११)
‘‘निश्चितच ईशपरयाणांसाठी यशाचे एक स्थान आहे. उद्याने आणि द्राक्षे आणि समवयस्क नवयुवती’’
– ़कुरआन (७८:३३)
भाष्य:
– तळटिप क्र. २० (संदर्भ: तलखीस तफहिमुल ़कुरआन, भाग २, भाष्यकार: मौलाना अबुल आला मौदुदी, भाषांतर: प्रा. अब्दुल रहमान शेख, प्रकाशक: इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंबई, आवृत्ती २०१३ पान नं. १३०५)
हे तर या लौकिक जीवनाच्या दृष्टीने माणसाला काही आकर्षणं सांगितली गेली आहेत, जेणेकरून त्याने सदाचारांकडे वळावं. जन्नतमध्ये नक्वâीच अनेक देणग्या मिळतील, पण सर्वात मोठी देणगी कोणती? त्या सृष्टिकर्त्याचा साक्षात्कार … त्याचं दर्शन … हे कोणत्याही हूरपेक्षा किंवा मोठ्यात मोठ्या देणगीपेक्षा कितीतरी जास्त पटिने महान देणगी आहे, शाश्वत सुख देणारं आहे. जन्नती लोकांना अल्लाह आपलं दर्शन घडवणारा आहे, दुसर्या शब्दांत सांगायचं म्हणजे तो त्याच्या अस्तित्त्वाची वास्तविकता स्पष्ट करणार आहे. (संदर्भ: हदिसग्रंथ बुखारी शरीफ, हदिस (वचन) क्र. ६०६८, हदिसग्रंथ मुस्लिम शरीफ, हदिस क्र. २६७ तसेच बुखारी शरीफ, हदिस क्र. ६८८३, मुस्लिम शरीफ, हदिस क्र. १००२)
त्याच्या दर्शनासाठी माणसाने इमानेइतबारे त्याचे आज्ञापालन केले पाहिजे, तोच खरा सदाचार आहे. त्यासाठी ़कुरआनात त्याच्या आज्ञा कोणत्या आहेत, ते समजून उमजून अभ्यासने गरजेचे आहे. ज्यांनी असा अभ्यास केला आहे, त्यांनी ते इतरांना सांगणेही गरजेचं आहे, तेंव्हाच कुठे हुरांविषयी जसे गैरसमज आहेत, तसे इतर गैरसमजही दूर होतील इन्शा अल्लाह!
– नौशाद उस्मान, औरंगाबाद
No comments:
Post a Comment