Monday, November 10, 2025

महात्मा गांधी ने खिलाफत आंदोलन



महात्मा गांधी ने खिलाफत आंदोलनाला पाठिंबा दिला होता आंदोलनात सहभागी झालेले डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी एक वर्षाची शिक्षा झाली होती
मुहम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर जगातील सर्व मुस्लिम धर्माचा खलिफा असल्याचे मानले जाते. खिलाफत ही धार्मिक राजकीय इस्लामिक संज्ञा आहे. पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तानचे सुलतान खलिफा वर ब्रिटिशांनी लादलेल्या अटीविरुद्ध भारतीय मुसलमानाने ही चळवळ सुरू केली या चळवळीने महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीला पाठिंबा दिला.
काँग्रेस पक्षाचे मध्य प्रदेश प्रायव्हसीचे प्रदेश सचिव डॉ. केशव बळीराम हेडगेवार 1921 ते 1922 खिलाफत चळवळीच्या बाजूने ब्रिटिशाविरुद्ध आंदोलन करीत असताना हेडगेवार यांनी अत्यंत भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी ब्रिटिश सरकारने राजद्रोहाच्या आरोपाखाली एक वर्षासाठी तुरुंगात टाकले.
संघ शाखेवर मुस्लिम द्वेषाचे पाठांतर करून घेतल्या जाते. त्यामुळे डॉ.हेडगेवारानी स्वातंत्र्यपूर्व काळातील महात्मा गांधींनी पुकारलेल्या खिलाफत चळवळीमध्ये भाग घेतला होता हे संघ स्वयंसेवक सांगू शकत नाहीत.
ब्रिटिश तुरुंगातील कैद्यांना भूक आजार कठोर परिश्रमामुळे कमकुवत झालेले असत .जेलमध्ये असलेले निकृष्ट दर्जाचे अन्न कोंदट वातावरणामुळे तुरुंगातील कायद्यांना टी.बी. सारख्या आजार जडले जात असत. तुरुंगातील हालअपेष्टामुळे भारतीय कैदी तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याची तब्येत ही कमजोर आणि एखाद्या आजाराने जडलेली असायची.
ब्रिटिश जेलर सर जाठर हा अत्यंत कठोर आणि उग्र स्वभावाचा म्हणून ओळखला जात होता .हेडगेवार यांनी त्यांच्याशी सौहार्दपुर्ण संबंध निर्माण केले. इतर कायद्याचे जेलमधील हाल अपेष्टामुळे वजन कमी झालेले असायचे मात्र हेडगेवार यांची वजन 11 किलोने वाढलेले होते.
1925 ला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली
हेडगेवार यांनी आपल्या संघ कार्यकर्त्याला स्वातंत्र्य आंदोलनापासून दूर राहण्यास सांगितले स्वतः मात्र सहभागी झाले ते आरएसएस चे प्रमुख म्हणून नाही तर प्रमुख पद दुसऱ्याला देऊन केवळ हेडगेवार म्हणून आंदोलनात भाग घेऊन जेलमध्ये गेले.
हेडगेवार यांचा दुसऱ्यांदा जेलमध्ये जाण्याचा उद्देश हा होता की काँग्रेसचे कार्यकर्ते हे आपल्या आरएसएस मध्ये सहभागी करून घेण्याचा त्यांचा उद्देश होता. एकही काँग्रेस कार्यकर्ता हेडगेवार यांच्या नादाला लागला नाही.
दोन ऑक्टोबर 2025 रोजी आर एस एस ला 100 वर्षे झाले पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरएसएस आणि हेडगेवार वर लेख लिहिले कुणाच्याही लेखांमध्ये हेडगेवार यांनी खिलाफत चळवळीत भाग घेतला हे लिहू शकले नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य गाभा हा इतर धर्मियांचा द्वेष करणे हा आहे. मुस्लिम द्वेषातून आर एस एस भाजप सत्य पर्यंत पोहोचलेले आहेत .त्यामुळे त्यांचा खरा इतिहास ते कधीही स्वतःहून सांगणार नाहीत.
जय हिंद जय भारत जय संविधान जय काँग्रेस .
हरिभाऊ सोळंके.
सादोळा ता माजलगाव जि बीड




No comments:

Post a Comment