ब्राम्हणी भाट दिवाळीचा संबंध रामाशी जोडतात. त्यांच्या मते राम लंकेहून अयोध्येला गेला, तेव्हा अयोध्येतील लोकांनी दिवे पेटवून आनंद साजरा केला, पण खुद्द वाल्मिकी रामायणात असे कुठेही लिहिलेले नाही. तसेही रामकथा दहाव्या शतकानंतर हळूहळू जनमानसात प्रचारीत होत गेली. रामानंद सागर यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात रामायण ही मालिका बनवली आणि त्याकाळच्या एकमेव चॅनेलवरून अर्थात दूरदर्शनवरून त्याचे प्रसारण केले, त्यानंतर रामायणाची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढली. असो.
दिवाळीचा संबंध जर रामाशी असता तर दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी रामाचे पूजन केल्या गेले असते, पण पूजन तर लक्ष्मीचे होते. ही लक्ष्मी हत्तीसह दाखवली जाते म्हणून तिला गजलक्ष्मी असे म्हणतात. गज म्हणजे हत्ती. पुरातत्वीय पुराव्यांचा विचार केल्यास गजलक्ष्मीची पहिली प्रतिमा मध्यप्रदेशातील भरहुत आणि त्यानंतर सांची येथील बौद्ध स्तूपावर कोरलेली आढळते. हे दोन्ही स्तूप सम्राट अशोकाच्या काळातील मानल्या जातात. शुंगकाळात या दोन्ही स्तूपांचे आणखी विस्तारीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, लक्ष्मी ही तर ब्राम्हणधर्मातील एक देवता मानली जाते, मग तिची प्रतिमा बौद्ध वास्तूंवर कशी काय कोरली गेली? तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, आज जिला लक्ष्मी वा गजलक्ष्मी म्हणून ओळखले जाते, ती मुळात गौतम बुद्धाची माता महामाया आहे. बुद्ध धम्मात हत्ती हे बुद्धाचे प्रतीक मानल्या जाते. भारतात ज्यांना विनायक - गणेश - गणपती या नावाने संबोधल्या जाते, त्यालाच बौद्ध देशांत Elephant Headed Buddha असे संबोधल्या जाते. ब्राम्हणी चोरांनी हत्ती व लक्ष्मी ही प्रतिकेही इतर अनेक चोऱ्यांप्रमाणे बौद्ध धम्मातून चोरी केली आहेत हे सत्य आपण समजून घ्यायला हवे.
नेपाळमधील बौद्धधर्मीय लोक दिवाळीच्या काळात ’तिहार’ नावाचा उत्सव साजरा करतात. हा उत्सव पाच दिवस साजरा केला जातो. त्यात पहिल्या दिवशी कावळ्याची पूजा केली जाते. कावळा हा यम वा निर्ऋती यांचा दूत मानला जातो. दुसऱ्या दिवशी कुत्र्याची पूजा केली जाते. कुत्र्याला यमराजाचा सहाय्यक मानल्या जाते. तिसऱ्या दिवशी गजलक्ष्मीची पूजा केली जाते. तिला बुद्धमाता महामाया मानले जाते. तिच्यासोबत पांढऱ्या हत्तीच्या प्रतिमेचेही पूजन केल्या जाते. पांढरा हत्ती हा बुद्धजन्माचे प्रतीक मानल्या जातो. चवथ्या दिवशी गाय आणि बैलाची पूजा केली जाते. यातून शेतीत समृद्धी येते असे मानल्या जाते. पाचवा दिवस ’भाई टीका’ म्हणून मनवल्या जातो. यादिवशी बहीण भावाला एका आसनावर बसवून त्याला टीका लावते आणि भाऊ तिला काहीतरी भेटवस्तू देतो.
नेपाळमधील बौद्ध समुदायाच्या या ’तिहार’ सण साजरा करण्याच्या पद्धतीवरून चोरांनी चोरी कुठून आणि कशी केली ते आपल्या लक्षात आले असेलच.
इसवीसनाच्या अकराव्या शतकात भारतात आलेल्या अल बरुनी या परकीय प्रवाशाने आपल्या प्रवासवर्णनात दिवाळीसंदर्भात लिहिले आहे.
तो म्हणतो, ”कार्तिक (मास) की 1ली, या अमावस्या का दिन, जब सूर्य तुलाराशि में जाता है, दीवाली कहलाती है। तब लोग स्नान करते, आमोद के वस्त्र पहनते, एक दूसरे को पान और सुपारी उपहार देते हैं, वे सवार होकर दान देने के लिए मन्दिरों को जाते और दोपहर तक एक दूसरे के साथ हर्ष से खेलते हैं। रात को वे प्रत्येक स्थान में बहुत बड़ी संख्या में दीपक जलाते हैं, जिससे वायु पूर्ण रूप से निर्मल हो जाती है। इस पर्व का कारण यह है कि वासुदेव की स्त्री लक्ष्मी विरोचन के पुत्र बलि को जो सातवें पाताल में बन्दी है वर्ष में एक बार बन्धन-मुक्त करती और संसार में जाने की आज्ञा देती है। इसलिए यह त्योहार ’बलिराज्य अर्थात बलि का आधिपत्य’ कहलाता है। हिन्दू कहते हैं कि, ’कृतयुग में यह समय सौभाग्य का समय था’ और वे प्रसन्न होते हैं, क्योंकि प्रस्तुत उत्सव का दिन कृतयुग के उस समय के सदृश है।”
बळीराजा हा असूर राजा होता. ब्राम्हणी ग्रंथांमध्ये बौद्ध आणि जैनांना असुर म्हटल्या गेले आहे. याचाच अर्थ दिवाळी हा सण बौद्ध - जैन अशा श्रमनसंस्कृतीशी संबंधित धर्मियांचा आहे. ब्राम्हणधर्मीयांचा या सणाशी काहीही संबंध नाही. आपल्या नेहमीच्या उचलेगिरीच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी हा सणही चोरला आहे आणि त्यात स्वतःच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी ब्राम्हणी कर्मकांड मिसळले आहेत, त्यामुळे या चोरांपासून आणि त्यांच्या स्वार्थी कर्मकांडांपासून आपण दूर राहायला हवे. तेव्हा आज संध्याकाळी तुम्ही जेव्हा लक्ष्मीपूजन कराल, तेव्हा खऱ्या लक्ष्मीचे अर्थात बुद्धमाता महामायाचे आणि बळीराजाला सन्मान प्रदान करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या आईचे अर्थात माँसाहेब जिजाऊंचे पूजन व स्मरण करावे ही विनंती.
BG Balasaheb Bhimrao Garud
संदर्भ :१. वाल्मिकी रामायण
२. अलबरुनी का भारत
