Wednesday, April 4, 2012

आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात




तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख
घेणारे बरेच असतील पण ,
" ओढणी सांभाळ "
सांगणारा कदाचित मी एकटाच
असेन !
तुला हसवणारे बरेच असतील पण ,
तुझ्यासाठीच तुझ्यावर
चिडणारा कदाचित मी एकटाच
असेन !
लगबगीत
चालताना तुझ्या स्पर्शाची वाट
पाहणारे बरेच असतील पण ,
" जपून चाल "
सांगणारा कदाचित मी एकटाच
असेन !
हसत -हसवत तुला ताली देणारे
बरेच असतील पण ,
तू रडताना,तुझा... हात हातात
घेवून धीर देणारा कदाचित
मी एकटाच असेन !
तुला कळाव म्हणू
तुझी काळजी घेणारे बरेच
असतील पण ,
तुझ्या नकळत
तुझी काळजी घेणारा मी एकटाच
असेन...आठवणी हसवतात... आठवणी रडवतात... काहीच न बोलता आठवणी निघून जातात... तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात... मित्रांनो हे पेज लाईक कराच...

marathi kavita

No comments:

Post a Comment