A message in its most general meaning is an object of communication. It is something which provides information or message; it can also be this information or message itself.
Wednesday, June 4, 2025
रायगड उत्खननात सापडले ‘यंत्रराज’
रायगड उत्खननात सापडले ‘यंत्रराज’; रायगडाच्या बांधकामामागे खगोलशास्त्राचा आधार असल्याचा पुरावा
खगोलशास्त्रीय साक्ष! रायगडाच्या इतिहासात नवा ठसा
दुर्गराज रायगडाच्या वास्तूशैलीमागे शास्त्रीय विचार आणि खगोलशास्त्राचा वापर झाला होता, याचे महत्त्वपूर्ण पुरावे आता प्रत्यक्षात सापडले आहेत! रायगडावरील पुरातत्त्व उत्खननामध्ये प्राचीन ‘यंत्रराज’ – सौम्ययंत्र (Astrolabe) हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे.
हे उपकरण भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त उत्खननात कुशावर्त तलावाच्या वरील भागात सापडले. सौम्ययंत्र हे प्राचीन काळी ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास, दिशांचा वेध घेणे आणि वेळ मोजणे यासाठी वापरले जाणारे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.
या उपकरणावर कोरलेली ‘मुख’ आणि ‘पूंछ’ ही अक्षरे तसेच साप/कासवासारखे आकृतीचित्र, यावरून उत्तर-दक्षिण दिशा समजून बांधकामाच्या नियोजनात त्याचा वापर झाला असण्याची दाट शक्यता आहे. यंत्रराजाचा वापर करून रायगडाच्या वास्तुविशेषांचे नियोजन खगोलशास्त्रीय निकषांवर आधारित होते, हे या शोधातून स्पष्ट होते.
मागील तीन-चार वर्षांपासून सुरू असलेल्या उत्खनन कार्यामध्ये रोपवे स्टेशनपासून कुशावर्त तलाव, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर परिसरातील सुमारे १०–१२ ठिकाणांवर उत्खनन करण्यात आले असून, हे नवे साधन त्या कार्यातून उजेडात आले आहे.
हा सापडलेला अमूल्य ठेवा केवळ रायगडाच्या ऐतिहासिक महत्त्वात भर घालणारा नाही, तर भारतीय खगोलशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या प्रगततेचा वस्तुपाठ ठरतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment