long sleeve T-shirt ,half pant shoes cap



वरळी मध्ये एका "महिलेने" भाजपच्या महिला आरक्षण बिल रॅलीचा फज्जा उडवला.ही महिला एक तासापेक्षा जास्त वेळ ट्रॅफिकमध्ये अडकून होती.तिने पायी चालत पुढे येऊन भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या इतर सहकारी मंत्री नेते आणि महिला नेत्यांना खडे बोल सुनावले.अक्षरश: हाकलून लावले असं व्हिडिओत दिसत आहे.
ती महिला सुशिक्षित आहे,पेहराव पाहून long sleeve T-shirt ,half pant shoes cap आणि car यावरून ती उच्चभ्रू वर्गातील आहे हे स्पष्ट आहे. शिवाय ती इंग्रजी शिवाय इतर काही बोलत नव्हती.
यामुळे मंत्र्यांचा तसेच भाजपच्या इतर नेते महिला,अशा सर्वांचा नाईलाज होताना दिसत होता, कुणालाही तिच्यासोबत इंग्रजीत बोलता येत नसल्याचे दिसून आले. अर्थात ती भाषा यायलाच पाहिजे असं काही नाही.
सगळे फक्त हाताने,आणि मानेने तिला शांत व्हा,जातो जातो म्हणत होते.
महिला अधिक चिडत होती.
यात महत्वाचा मुद्दा हा की महिला म्हणाली की, तिकडे मैदान आहे तुम्ही तिकडे जाऊन प्रोटेस्ट करा काही अडचण नाही,तुम्ही ट्रॅफिक का अडवले आहे?
तिला आपल्या मुलाला पीकअप करायला जायचं होतं.
कदाचित या महिलेला माहिती असेल,आणि असावं कारण ती सुशिक्षित आहे तर महिला आरक्षण बिल च्या संदर्भातील जे काही प्रहसन नाट्य सुरू आहे ते तिला लक्षात आले असावे.
तेव्हा एक पोलिस अधिकारी या महिलेवर ओरडताना दिसून येत होते,त्यानाही इंग्रजी येत नव्हते,ते हिंदीत बोलत होते,आणि सतत महिला पोलिस असं कुणीतरी बोलत आहे.
जर ही महिला मराठी असती,गरीब असती शेतकरी कुटुंबातील असती तर पोलिसांनी तिला तिथेच झोडपून काढले असते का? हा प्रश्न मला सतावतो आहे.
जेव्हा व्हिडिओ पाहिला,आणि अनेक दलित मोर्चे ,स्त्रीवादी संघटनांचे मोर्चे आणि अंतरवाली सराटी सगळे आठवत होते.
त्या पोलिस अधिकाऱ्यांचे वागणे मला आवडले नाही.ज्याप्रकारे त्यांनी महिलेले हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला होता.ते अगोदर म्हणाले तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे.खरंतर ती महिला त्यांच्या समोरच हे सर्व करत होती,ओरडत होती,पण आपल्याकडे अशीच पद्धत आहे ना.अगोदर दम द्यायचा दमात घ्यायचे मग झोपडून काढायचे..एक सुशिक्षित नागरिक म्हणून आपण असा देश बनवला आहे हे पाहून वाईट वाटते.




No comments:

Post a Comment